Skip to main content

डिजीटल बॅनर लावतांना विजेचा शॉक लागला

 


किनवट तालुका बातमीदार:-

शहरातील जिजामाता चौकात ३० वर्षीय युवकास डिजीटल बॅनर लावतांना तहसील कार्यलया समोरील न.प. च्या गाळ्यावर बॅनर लावतांना डिजीटल प्रिन्टर आर्ट येथे  कामाला असलेला ३० वर्षीय  शुभंम कुमरे रा. गोकुंदा या युवकास जिवंत तार कट असल्याने स्पर्श झाला व शॉक लागला .

जेव्हां शॉक लागला तेव्हां आरडा ओरड एैकुन सेतु चालवणारे रमेश राशलवार,रवी दिसलवार, भगवान भाऊ आदींनी जाऊन मदत केली त्याच्या अगांवर पडलेला सिमेंट पोल काढला व लाकडाच्या सहाय्याने तार हटवला सदरील युवकास साने गुरुजी इस्पितळात दाखल करण्यात आले पुढील उपचार डॉ. अशोक बेलखोडे हे करीत असुन प्रकृती स्थीर आहे अशी माहिती त्यांनी दिली सुदैवाने जीवित हानी टळली मदत करणाऱ्याचे किनवट शहरात कौतुक करण्यात येत आहे.

Comments