Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे उपक्रम कौतुकास्पद - तहसीलदार राजेश लांडगे


भोकर, नांदेड :  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, भोकर तालुका कार्यकारिणीने राबविलेला माजी सैनिक, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान हा कार्यक्रम अतिशय कौतुकास्पद असल्याचे तहसीलदार राजेश लांडगे यांनी प्रतिपादन केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, भोकर तालुका कार्यकारिणीच्या वतीने दिनांक १५  ऑगस्ट रोजी भोकर येथील लक्ष्मणराव घिसेवाड महाविद्यालयात माजी सैनिक व दिव्यांगाचा सन्मान व ७५ विद्यार्थ्यांना वही पेन वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोकरचे तहसीलदार राजेश लांडगे तर प्रमुख अतिथी म्हणून भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राणी भोंडवे व काँग्रेसचे नेते तथा माजी सभापती नागनाथराव घिसेवाड उपस्थित होते. यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना तहसीलदार राजेश लांडगे म्हणाले की भारताचा अमृत महोत्सव साजरा करत असताना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, भोकरच्या वतीने घेतलेले कार्यक्रम अत्यंत कौतुकास्पद असून पत्रकारांनी दिव्यांग बांधव आणि माजी सैनिकांचा सन्मान म्हणजे आजपर्यंतच्या सर्व कार्यक्रमापैकी उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन केले. यानंतर पोलीस उपनिरीक्षक राणी भोंडवे लोकनेते नागनाथ ईश्वर यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास पत्रकार अनिल डोईफोडे सरपंच गागदे, कन्हेवाड, गीतेस बोटलेवाड, सेनेचे संतोष आलेवार, विशाल बुद्धेवाड, पांडुरंग कटकमवार आदींची उपस्थिती होती. यावेळी तहसीलदार राजेश लांडगे व पोलीस उपनिरीक्षक राणी भोंडवे यांच्या हस्ते माजी सैनिक बबन राऊत व देश सेवा करताना शहीद झालेले स्वर्गीय प्रफुल्ल गोवंदे यांच्या स्मरणार्थ त्यांचे वडील गणपतराव गोवंदे, १२ दिव्यांग बांधवाचा यथोचित सन्मान करण्यात आला. तसेच ७५ विद्यार्थ्यांना वही व पेन वाटप करण्यातही आले.

बहुजन तथा काँग्रेसचे नेते नागनाथ घिसेवाड यांचा आज वाढदिवस असल्याने त्यांच्या या वाढदिवसा निमीत्त मान्यवरांच्या हस्ते प्रेस व संपादक पत्रकार सेवा संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संघाचे सचिव सुभाष नाईक किनीकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संघाचे तालुका अध्यक्ष उत्तम कसबे, उपाध्यक्ष दत्ताभाऊ बोईनवाड, सचिव सुभाष नाईक, संघटक माधव गायकवाड यांनी प्रयत्न केले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी, माजी सैनिक, ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधव उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...