Skip to main content

गोदावरी अर्बनच्या “हर ब्रॅच तिरंगा” उपक्रम प्रतिसाद व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर; यांची माहिती ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

 


नांदेड, दि. १३ (प्रतिनिधी)-  या वर्षी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "हर घर तिरंगा" अभियानात प्रत्येक नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून गोदावरी अर्बन परिवाराने देखील "हर घर तिरंगा" अभियानांतर्गतन गोदावरी अर्बनच्या पाच राज्यातील ९१ ब्रँचमध्ये हर ब्रँच तिंरंगा हा उपक्रम उत्स्फूर्तपणे राबविल्याची गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी माहिती दिली.

                 गोदावरी अर्बनचे संस्थापक तथा हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील, गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाच राज्यातील गोदावरीच्या ९१ शाखांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला असून, तरोडा नाका येथील गोदावरी अर्बनच्या सहकारसूर्य या मुख्यालयाचे कार्यालयात शनिवारी (ता.१३) हा उपक्रम मोठ्या उत्साहत साजरा करण्यात आल्याचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी सांगितले आहे.  पुढे ते म्हणाले की, गोदावरी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटी लि.च्या महाराष्ट्रासह, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात व कर्नाटक या पाच राज्यातील ९१ शाखांमध्ये नियमितपणे सांस्कृतीक व समाजपयोगी उपक्रम राबविले जातात. यंदा भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त आजादी का अमृत महोत्सव हा उपक्रम देशातील सर्व राज्यात व केंद्रशासित प्रदेशात १२ मार्च २०२१ पासून पुढील ७५ आठवडे राबविण्यात येत आहे. आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत विविध कार्यकर्माचे आयोजन करावयाचे आहे. याच धर्तीवर गोदावरी अर्बनच्या वतीने देखील हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत राष्ट्रीय ध्वजाचे वाटप करण्यासोबतच राष्ट्रीय ध्वजाचा कुठल्याही प्रकारचा अवमान होणार नाही याची पुरेपूर खबरदारी घेऊन हा "हर ब्रँच तिरंगा" उपक्रम मोठ्या उत्साहत सांजरा करण्यात आला. गोदावरी अर्बनचे संस्थापक तथा हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील, गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी अर्बन सहकारी मल्टीस्टेट को. आपरेटिव्ह सहकारी पतसंस्थेच्या वतीने गोदावरी अर्बनच्या पाच राज्यातील ९१ शाखांमध्ये हर ब्रँत तिरंगा हा उपक्रम राबविण्यात आला. यास चांगलाच प्रतिसाद मिळाला.

या प्रसंगी गोदावरी अर्बन मुख्यालय मुख्य व्यवस्थापक सुरेखा दवे,  मुख्यालयाचे मुख्यालय प्रधान व्यवस्थापक विजय शिरमेवार, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक रवी इंगळे, विपणन व्यवस्थापक महेश केंद्रे, शाखा व्यवस्थापक सर्वश्री भारत राठोड , विनोद आदे , धनंजय क्षीरसागर, विजय मोडक , अनिरुद्ध पाथ्रडकर, राहूल कोल्हे ,  शिवराज वल्लेवाड , पंकज ईंदूरकर , गणेश जाधव, अशोक चोपडे, अरविंद महाजन  मुख्य शाखा व्यवस्थापक अविनाश बोचरे पाटील,  चिखलवाडी  शाखेचे  गुरुतेज सिंग, गोपाल जाधव लेखा विभाग प्रशांत कदम , देविदास पोळकर , आयटी विभाग पवन यादव यांच्यासह मराठवाडा आणि विदर्भातील गोदावरी अर्बनचे शाखाप्रमुख अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...