Skip to main content

स्वातंत्र्यदिनी किल्ल्याच्या दर्शनी भागावर राष्ट्रध्वज फडकवा अन्यथा उपोषण माजी नगरसेवकाचा निवेदनाद्वारे उपोषनाचा इशारा



माहूर / प्रतिनिधी:


माहूर गडावर असलेल्या किल्ल्यावर भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासून राष्ट्रध्वज फडकविला जात होता. सुमारे दहा वर्षांपूर्वी अतिवृष्टी झाल्याने किल्ल्याचा दर्शनी भाग जेथे राष्ट्रध्वज फडकविला जात होता त्या जागेची पडझड झाली होती.


शाषणाकडून त्या ठिकाणच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधीचा निधी देवून त्या जागेची दुरुस्ती करून जागा राष्ट्रध्वज फडकविण्या योग्य बनविण्यात आली. ही बाब पुरातत्व विभाग व सा.बा. विभागाने लेखी तहसीलदार कार्यालयात कळविलेली आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी किल्ला व किल्ल्याच्या परिसरातील बऱ्याच वास्तूंची दुरुस्ती करण्यातयेऊन किल्ला पर्यटकांसाठी आकर्षनाचे केंद्रबनला आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून माजी नगरसेवकाणे तहसीलदार पोलीस निरीक्षक आणि इतर संबंधित सर्व विभागाकडे निवेदना द्वारे

किल्ल्याच्यादर्शनी भागावर राष्ट्रध्वज फडकवावा म्हणून मागणी करत आहे परंतु काही ना काही कारण पुढे करून पूर्वीच्या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकविला जात नाही. गेल्या ५ वर्षांपासून प्रत्येक दि. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, १७ सप्टेंबर, १ मे रोजी अपणासह इतर सर्व अधिकाऱ्यांना निवेदने देऊन किल्ल्याच्यादर्शनी भागावर पूर्वीच्याठिकाणी राष्ट्रध्वज फडकवावा अशी विनंतीकरीत आहे परंतु कुणीही अर्ज गांभीर्याने घेतला नाही. माजी नगरसेवक इलियास बावाणी यांनी वेळोवेळी दिलेल्या अर्जाला केराची टोपली दाखविली गेली होती. आता जिल्ह्यात हर घर झेंडा अभियान मोहीम, (राष्ट्रीय कार्यक्रम) घोषित केला आहे ही सर्वात मोठ्या अभिमानाची बाब आहे. त्यामुळे मला आता खात्री वाटत आहे की आपण या कामाला प्राथमिकता देऊन किल्ल्याच्यादर्शनी भागावर पुरवीप्रमाणे राष्ट्रध्वज फडकवून राष्ट्रध्वजाची गरिमा कायम ठेवसालअसेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दिलेल्या अर्जाचा विचार करून दि. १३ ऑगस्ट पर्यंत लेखी न कळविल्यास १४ आगस्ट रोजी माहुरच्या तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणाला बसावे लागेल असा इशारा जिल्हाधिकारी, तहसीलदार, सा.बा. उप विभागीय अभियंता, मुख्याधिकारी माहूर यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. गेल्या पाच वर्षांपासून मी आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय

तसेच सर्व संबंधिताकडे पत्रव्यवहार करत असून झाडे वाढली झेंड्याचा खांब नादुरुस्त आहे थांबायला जागाजागा नाही अशी कारणे दाखवून टाळाटाळ केली जात आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...