Skip to main content

गोदावरी अर्बन सहकार क्षेत्रातील हायटेक संस्था -पाशा पटेल, यांची गोदावरी अर्बनच्या सहकारसूर्य मुख्यालयास भेट

 


नांदेड, ता.६ (बातमीदार) – सहकार क्षेत्रात अनेक संस्था आहेत. परंतू संस्था सुरु करण्यामागचा अनेकांचा हेतू स्पष्ट नसतो. या उलट खासदार हेमंत पाटील व राजश्री पाटील यांनी सुरु केलेल्या गोदावरी अर्बन संस्थेचा पाच राज्यात झालेला विस्तार बघून त्यांचा सामान्य व्यक्तीस सहकारातून मदतीचा हात देण्याचा उद्देश अगदीच स्पष्ट दिसून येतो. यामुळे गोदावरी अर्बन हि सहकार क्षेत्रात अल्पावधितच राज्यातीलच नव्हे परराज्यातील सामान्य ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली एकमेव हायटेक संस्था असल्याचे कृषी मुल्य आयोगाचे माजी सदस्य पाशा पटेल यांनी म्हटले आहे.



     सध्या नांदेड दौऱ्यावर असलेले पाशा पटेल यांनी शनिवारी (ता.सहा) तरोडा नाका परिसरातील गोदावरी अर्बनच्या सहकारसूर्य  मुख्यालयास भेट दिली. यावेळी गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी श्री पटेल यांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला. सोबतच बँक आफ महाराष्ट्र लातूर शाखेचे चिफमॅनेजर बिझनेस हेड मार्केटिंग नितीन श्रोत्री, बिझनेस डेव्हलमेंट आफिसर सोहम खरात, शिवसेनेचे प्रल्हाद इंगोले यांची उपस्थिती होती. दरम्यान पाशा पटेल यांनी सहकारसूर्य मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संवाद साधत संस्थेच्या हायटेक कामकाजाविषयी माहिती जाणून घेत असतानाच खासदार हेमंत पाटील व राजश्री पाटील यांनी मुहूर्त मेढा रोवलेल्या गोदावरी अर्बन सहकारी संस्थेला सहकार क्षेत्रात वेगळ्या उंचीवर नेऊन जाण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असणारे गोदावरी अर्बन संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या कार्याचे विशेष कौतुक करायला ते विसरले नाहीत. त्यानंतर गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांच्यासह  सहकारसूर्य मुख्यालयाच्या विविध विभागात जाऊन पाहणी केली व अगदी दहा वर्षापूर्वी दोन खाल्यांमध्ये सुरु केलेल्या गोदावरी अर्बनचा हा प्रवास आज पाच राज्यात जोमाने पसरल्याचे बघून समाधान व्यक्त केले. 

           दरम्यान बँक आफ महाराष्ट्र लातूर शाखेतील अधिकारी श्री श्रोत्री यांनी देखील गोदावरी अर्बन  संस्थेने सहकार क्षेत्रात घेतलेल्या उत्तुंग भरारीची तोंडभरुन प्रशंसा केली. व गोदावरीच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी गोदावरी अर्बन मुख्यालयाचे मुख्यालय प्रधान व्यवस्थापक विजय श्रीमेवार, मुख्य शाखा व्यवस्थापक अविनाश बोचरे पाटील, गोपाल जाधव यांच्यासह संस्थेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येनी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...