Skip to main content

स्वातंत्र्यदिनी रमेश राशलवार यांचा आत्मदहनाचा इशारा

 



किनवट ता. बातमीदार:-

किनवट नगर परषिदे द्वारा बेल्लोरी किनवट येथील पुरग्रस्त मातंग अनुसुचीत जाती समाजाला गत २० वर्षापासून नियोजित वस्तीवाढ राखीव क्षेत्र मौजे किनवट बेल्लोरी येथील भू. क्र १३०/१ क्षेत्रफळ ०.४९ आर जमीन न. प. च्या ताब्यात घेण्यात आली. परंतु पात्र पुरग्रस्त मातंग (अ.जा.)समाजाला वस्तीसाठी प्लाटींग वाटप न करता खोट्या आश्वासने देत वेळकाढूपणा चालू आहे. त्यामुळे राशलवार यांनी असा इशारा दिला आहे की, १५ आगष्टपर्यत ह्या मागणीचा विचार न झाल्यास त्याच दिवशी कुठल्याही प्रशासकीय कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल असे दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे.


गत २००२ पासुन ते आज पर्यंत हया समाजाला दरवर्षी महापूराचा तडखा बसून अन्न धान्य व घराची नासधूस होऊन जिवण मरण्याची कसरत करावी लागत आहे. गेल्या २० वर्षापासून न.प. प्रशासन संबंधीत पूरग्रस्त मांतग समाजाला २००२ ला आश्वासन दिले होते कि, नियोजित वस्तीवाढ करु प्लाटींग करुन वस्ती स्थलांतरीत करणार असे लेखी आश्वासन दिले असे अनेक आश्वासनाचे लेखी प्रत आजही उपलब्ध आहेत. लोकशाही मार्गाने कित्येकवेळा आमरण उपोषण व आंदोलने केली. प्रत्येक वेळी लोक प्रतिनीधिंनी व न.प प्रशासनाने आश्वासन देत पुरग्रस्त मांतग (अनुसुचीत जाती) समाजाला दिशाभूल केले आहे. सदर प्रकरणात किनवट बेल्लोरी येथील भु क्र १३०/१ क्षेत्रफळ ०.४९ आर जमिन आरक्षीत करण्यात आली सदर जमिनीत दलितवस्ती ऐवजी जनवरांचे व मानसाचे विष्टाराने भरलेला दिसतो मग हा आमच्या (अ.जा.)दलित समाजावर अन्याय नाही का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे. करीता हया समाजाला न्याय मिळावा म्हणून दिनांक १५/८/२०२२ पर्यंत हया मागण्य्याची पूरतर्ता करावी अन्यथा नाईलाजास्तव आक्रमक भुमिका घेण्यात येईल. असेही त्यांनी सादर केलेल्या निवेदनात उल्लेख केला आहे. सदर प्रकरणात काही मानसिक व शारीरीक नूकसान झाल्य्यास संपूर्ण जबाबदारी न. प. प्रशासनावर राहील असे रमेश राशलवार त्यांनी सादर केलेल्य्या लेखी निवेदनात दिले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...