Skip to main content

शिक्षणाचा मांडला बाजार




 किनवट: १३हजार रुपये प्रवेश शुल्क भरून प्रवेश घ्या, प्रशिक्षण घेण्याची गरज नाही,परीक्षाही नाममात्रच होईल व एका वर्षानंतर पदविका प्रमाणपत्र तुमच्या हाती देण्यात येईल,असा शिक्षणाचा बाजार मांडण्याचा प्रकार मागील काही वर्षांपासून गोकुंदा(ता किनवट)येथे कार्यालय असलेल्या गोपीनाथ मुंडे आय.टी.आय.प्रशिक्षण संस्थेने मांडला आहे.फक्त कागदोपत्री प्रशिक्षित प्रशिक्षणार्थि विद्यार्थी तयार करून एकप्रकारे शिक्षणाचा खेळखंडोबा करणाऱ्या सदरील संस्थेची मान्यता संबंधितांनी रद्द करून संस्था चालकांना कोठडीची हवा दाखवावी,अशी मागणी किनवट या आदिवासी तालुक्यातील अनेक जागृत पालकांनी केली आहे.

     गोपीनाथ मुंडे आय.टी.आय.प्रशिक्षण संस्थेमार्फत गोकुंदा येथे स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटर चालविण्यात येते.या सेंटरमध्ये १० वी व १२वी पास विद्यार्थ्यांसाठी पुर्णवेळ असलेला एक वर्षाचा वायरमन - प्रवेश क्षमता २५ व बांधकाम पर्यवेक्षक - प्रवेश क्षमता ५०, असे दोन मान्यताप्राप्त पदविका अभ्यासक्रम आहेत.

    या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना शुल्क घेऊन प्रवेश देण्यात येतो.यानंतर मात्र त्यांना प्रशिक्षित पुर्ण करण्याची गरज नसते.क्रमिक पुस्तके विद्यार्थ्यांना देण्यात येतात.त्याचा अभ्यास त्यांनी वर्षभर घरी राहूनच करावा.नंतर शासकीय आय.टी.आय.मध्ये वार्षिक परिक्षा होते.परंतु, या परीक्षेची चिंता करण्याची गरज नाही,परीक्षा या अर्थपुर्ण व्यवहारातून मेनेज केल्या जातात, असे विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत सांगीतल्या जाते,हे विशेष आहे.

    राज्यातील बहुजन समाजाचे शक्तीशाली नेते राहीलेल्या गोपीनाथ मुंडे यांच्या नावे असलेल्या प्रशिक्षण संस्थेतून बहुजन विद्यार्थ्यांना बोगस प्रशिक्षण देऊन त्यांची व शासनाची फसवणूक करणाऱ्या संस्था चालकाबदल वंजारी समाजातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.ही बाब आपण पंकजा मुंडे यांच्या कानावर घालणार असल्याचे समाजाच्या एका कार्यकर्त्यांनी सांगितले.

  या प्रकरणी संस्था चालकाकडून अधिक माहिती घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा मोबाईल कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर दाखवत होता.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...