Skip to main content

Posts

Showing posts from August, 2021

सैनिक टाकळी येथील ‘सुभेदार’ कुटुंबाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद

  कोल्हापुर: सैनिक टाकळी (प्रतिनिधी) इसविसन १९१४ ते २०२१ अशी १०७ वर्षे देशाला १४ सैनिक देणारे सैनिक टाकळी येथील सुभेदार कुटुंब सैनिक सैनिक टाकळी येथील ‘सुभेदार’ कुटुंबाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद  येथील ‘सुभेदार’ कुटुंबाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद  वैशिष्टयपूर्ण कुटुंब ठरले असून त्यांचा नुकताच महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् च्या वतीने यथोचित गौरव करण्यात आला. सैनिक टाकळी येथील माजी सैनिक कल्याण मंडळाच्या सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ऑ. ले. बी. एस. पाटील होते. कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यातील टाकळी या गावातील घरटी एक तरी व्यक्ती सैन्यात असल्यामुळे या गावाला ‘सैनिकांचे गाव’ म्हणून ओळखले जाते.  इसविसन १९६८ साली देशभक्त डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या सहकार्याने भारताचे लष्करप्रमुख जनरल पी. पी. कुमार मंगलम, जनरल एस. पी. थोरात आणि ले. जनरल मोती सागर टाकळी गावात आले होते. त्यावेळी गावच्या आजी-माजी सैनिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले होते. फौजी गणवेश परिधान करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहिलेले जवान पाहताना लष्करप्रमुख

बेलखेड येथे महाकवी वामनदादा कर्डक यांची जयंती उत्साहात

  उमरखेड ता. प्रतिनिधी( सुमेध घुगरे):- भारतीय बौद्धमहासभा ता.उमरखेड व अक्षरोदय साहित्य मंडळ शाखा उमरखेड यांच्या वतीने कविसंमेलन प्रश्नमंजुषा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे दि.29/08/2021रोजी बेलखेड येथे आयोजन करण्यात आले.  कार्यक्रमाचे उदघाटन मा.अतुल पाटिल उपसरपंच बेलखेड यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष -धम्मदिप काळबांडे तालुका अध्यक्ष भा. बौ. म.उमरखेड तर कविसंमेलनाध्यक्ष नरेंद्र धोंगडे सुप्रसिद्ध साहित्यिक नांदेड हे होते.प्रमुख पाहुणे  प्रज्ञानंद खडसे सभापती पं. स. उमरखेड, राहुल कऱ्हाळे प्रकल्प अधिकारी यवतमाळ, चिमणाजी काळबांडे बौद्धाचार्य ,सुधाकर लोमटे साहित्यिक उमरखेड ,एल. एस. काळबांडे कवी गीतकार,हे उपस्थित होते. कविसंमेलनात  सहभागी कवी   दगडू घुगरे,मारोती काळबांडे, यशवंत काळबांडे, डी. बी. शिंगणकर, पंडित काळबांडे, प्रा.गजानन दामोधर,सुधाकर लोमटे, एल.एस.काळबांडे,सुमेध घुगरे, सुभाष शिंगणकर, सज्जन बरडे यांनी बहारदार रचना सादर केल्या. सांस्कृतिक गायनाच्या कार्यक्रमात  प्रबोधनकार कैलास राऊत आणि संच हदगाव व गायिका वर्षाताई काळबांडे उमरखेड ,किसन मनवर,सहदेव शिंगणकर,पंडित काळबांडे,नार

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या१०१ व्या जंयती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

  (बापुराव वावळे बोधडी प्रतिनिधी ):-  ता.३० साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या१०१ जयंतीचे औचित्य साधून बोधडी खुर्द येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोधडी खुर्द येथील सरपंच सौ.सुमनबाई काळे म्हणुन उपस्थित होत्या त्यांच्य हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले  रक्तदान शिबिराचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बोधडी खुर्द येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक गावकरी यांनी मोलाचे सहकार्य केले  रक्तदान शिबिराचा कार्यक्रम योग्य रित्या पार पडला. रक्तदान करण्यासाठीं युवक मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.नामदेवराव कराड यांनी जयंती मंडळाच्या अध्यक्ष, सदस्य, यांचे आभार मानून रक्तदान शिबिराची सांगता केली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, अध्यक्ष,जिवा गादेकर, अविनाश वाघमारे,प्रविण देवकुळे, सुमित पैले, विनोद सुर्यवंशी, बालाजी गायकवाड, रोहीत गायकवाड आदींनी परिश्रम घेतले या शिबिरात एकुण २२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र (किनवट) तालुका उपाध्यक्षपदी राजेश पाटील यांची निवड

ता. प्र. किनवट:- गेल्या अल्प काळात महाराष्ट्र विदर्भाच्या काना कोपऱ्यात पोहचलेली प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य हि रजीस्टर्ड संघटना संस्थापक , अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, जिल्हा संपर्क प्रमुख आंनद भालेराव यांच्या मार्गदर्शनानुसार किनवट प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ तालुका उपाध्यक्षपदी टाईम्स ऑफ महाराष्ट्र पोर्टलचे संपादक तथा दै. मराठवाडा केसरी शहर प्रतिनिधी किनवट यांच्या कार्याची दखल घेऊन मा. आनंद भालेराव यांनी त्यांच्यावर हा  विश्वास दाखवला आहे व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या बद्दल पत्रकार , संपादक, व मुद्रित व इलेक्ट्रॉनिक प्रेस मिडीया व प्रसार माध्यम व मित्र मंडळी प्रफुल  आढागळे, लक्ष्मीकांत कापसे, संजय नरवाडे, गजानन बावणे, शिवाजी सिडाम, राजु पांडे, अविनाश ठमके, योगेश कल्याणकर, अंबर ठमके, आकाश बोलेनवार, आकाश मारपवार, सुरेश आईलवार, विक्रम वाघाडे, सलीम भाई, सयद नदीम, अक्षय चिकाटे, अमोल बावणे, अमोल जुनगुरे, अमोल सावते अमोल शेंद्रे, संतोष आरूलवार, अविनाश शेरे, बाळु खिल्लारे, लक्ष्मीकांत दुथडे, गजानन पडलवार, जवाह

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्रची तालुका कार्यकारणी जाहीर

  ✒️ राजेश पाटील/प्रतिनिधी किनवट:- गेल्या दोन वर्षापासुन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहचलेली शासनमान्य व नोंदणीकृत संघटना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्रची किनवट तालुका  कार्यकारणी  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्रचे  संस्थापक ,अध्यक्षडी. टी. आंबेगावे यांच्या मार्गदर्शनानुसार व  जिल्हा संपर्क प्रमुख आनंद भालेराव यांच्या नेतृत्वाखाली हि निवडण्यात आली. यावेळी तालुक्यातील विविध वृत्तपत्र, व समाज माध्यमासाठी कार्य करणाऱ्या सुशिक्षित पत्रकारांना संघठन बळकट करण्यासाठी व पत्रकारांचे प्रश्न समस्या सोडवण्यासाठी तसेच समाजातील विविध सामाजिक प्रश्न अडचणी प्रसार माध्यमाच्यां लेखणीतुन सोडवण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्रची तालुका कार्यकारणी निवड करण्यात आली. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्रची किनवट तालुका कार्यकारणी पुढील प्रमाणे आशिष शेळके( तालुका अध्यक्ष) नसीर तगाले( तालुका सचिव) सय्यद नदीम( तालुका कार्याध्यक्ष) राजेश पाटील( तालुका उपाध्यक्ष) शेख अतीफ( तालुका उपाध्यक्ष) गौतम कांबळे( तालुका सरचिटणीस) रेहान खान( तालुका कोषाध्यक्ष) प्रणय कोवे( ता.

किशनराव ठमके व साहेबराव हलवले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न व वामनदादा कर्डक संगितरत्न पुरस्कार प्रदान

  राजेश पाटील/शहर प्रतिनिधी किनवट: साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जंयती निमित्त किनवट येथील फुले शाहू आंबेडकर चळवळीचे सुप्रसिद्ध कवी गायक कलावंत किशनराव ठमके व साहेबराव हलवले यांना तेलंगणातील अदिलाबाद येथे राष्ट्रीय आबेंडकरी कला महोत्सव अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन मंडळाच्या वतीने बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संगितरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार हा आयोजन समितिचे अध्यक्ष मधु बावलकर यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी समितीचे प्रशांत वनजारे, माया खिल्लारे, मंगला कावळे, आम्रपाली वाठोरे आदी मान्यवर उपस्थित होते या पुरस्कारा बद्दल किनवट तालुक्यातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

किनवट शहरात मोकाट जनावरांचा सुळसुळाट नगर परिषदेचे दुर्लक्ष

  तालुका प्रतिनिधी किनवट:- किनवट शहरात सध्या मोकाट जनावरांचा सुळसुळाट दिसुन येत आहे यामुळे नागरीकांना ये- जा करणे कठीण होऊन बसले आहे जिकडे पाहावे तिकडे मोकाट गाढव, ढोर, पिसाट कुत्री फिरत असतात तसेच शिवाजी चौक मध्ये तर रस्त्यात ठाण मांडून बसतात तसेच गाढवांचा प्रणय क्रीडा रस्त्यावर बघायला मिळतो त्यामुळे जनतेच्या नाकी नऊ आले आहे . तसेच या मुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे गाढवाचे मालक गाढवांना वाळू उपसा करण्यासाठी वापरतात व रस्त्यावर सोडून देतात त्याचा नाहक त्रास लोकांना होतो व रहदारीची समस्या निर्माण होते म्हणुन लवकरात लवकर या मोकाट जनावरांना नगर पालीकेच्या कोडंवाड्यात डांबुन बंद करावे व दंड आकारून त्यांचा नगर परिषदेने बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेतुन होतांना दिसुन येत आहे.

किनवट रेल्वे स्थानकावर टिकिट काऊंटर सुरु रेल्वे प्रवाशांची गैरसोय लक्षात घेऊन द.म. रेल्वेचा निर्णय

  (राजेश पाटील किनवट, श.प्र.) २४:आदिलाबाद - नांदेड इंटरसिटी ऐक्सप्रेस साठी आजपासून(ता.२४) या मार्गावरील प्रत्येक रेल्वे स्टेशनवर तिकीट विक्री सुरु करण्यात आली आहे. प्रवाशांनी तिकिट काढून प्रवास करावा,असे आवाहन किनवट रेल्वे संघर्ष समितीचे सचिव उध्वराव रामतिर्थकर यांनी केले आहे. यापूर्वी प्रवाशांना तिकीट रीजर्वेशन करूनच प्रवास करावा लागत असे.बऱ्याच प्रवाशांना रिझर्वेशन करण्याची प्रक्रिया माहीत नसल्याने अनेक प्रवासी हे टी.सी.ला पैसे देऊन किंवा विना तिकिट प्रवास करत होते.त्यामुळे रेल्वेचे मोठे नुकसान होत होते,आता ते नुकसान टळणाळ आहे.

निधन वार्ता:-संघपाल शेंडे या युवकाचे अल्पश वयात डेंगु आजाराने निधन

  किनवट शहरातील बि एस पी चे पार्टीचे , सुप्रसिद्ध गितकार, लेखक, कवी  सुरेश शेंडे यांचा मुलगा संघपाल सुरेश शेंडे दि.२३ ऑगष्ट २०२१ रोजी वय(१८) व्या वर्षी ऐवढ्या अल्प वयात डेंगु या आजाराने दु:खद निधन झाले या मृत्युमुळे किनवट परिसरात शोककळा पसरली आहे

किनवट पेंटर असोशियशन च्या अध्यक्षपदी पेंटर हनीफ यांची तर सचिवपदी अनिल उमरे यांची निवड

  दि.22, किनवट/प्रतिनिधी : किनवट पेंटर असोशियशन च्या अध्यक्षपदी पेंटर हनीफ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ज्येष्ठ पेंटर तथा किनवट न. प. चे माजी नगराध्यक्ष अरुण आळणे यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ पत्रकार शकील बडगुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत संथागर वृध्दाश्रम किनवट येथे दि.22 रोजी बैठक घेण्यात आली.      अध्यक्षीय भाषणात अरुण आळणे म्हणाले की नवीन कार्यकारिणी तयार झाल्याने पेंटर व चित्रकार कलाकारांना चांगली कामे मिळतील. ज्या पेंटर ने काम घेतले असेल तर कामासाठी दुसऱ्या पेंटर ने कमी पैशात काम करू नये. दरवर्षी अध्यक्ष बदलल्याने जोमात काम करता येते.      माहूर चे रणजीत वर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मोलाचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सर्व पेंटर गरिबीतून वर आलेले आहेत. सर्व कलाकारांचे पोट पेंटिंग व्यवसायावर अवलंबून आहे. असोशियेशन ने सर्वांना आर्थिक मदत कशी करता येईल याकडे लक्ष द्यावे असे सांगितले.  पेंटर नागनाथ भालेराव यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, पेंटर कलाकारांनी आपला व आपल्या परिवाराचा विमा काढून घ्यावा. कामगार फॉर्म भरून केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, मी

गोदावरी अर्बनच्या वतीने जागतिक जेष्ठ नागरिक दिन साजरा

( किनवट) जेष्ठ नागरिकांसाठी विशेष व्याजदर योजना:- जेष्ठ नागरिक हे समाजाचे महत्वपूर्ण घटक असून त्यांचे जगणे सुसह्य होण्यासाठी जागतिक दिनाचे औचित्य साधत गोदावरी अर्बनने नागरिकांसाठी  पाऊण टक्का(०.७५) वाढीव व्याजदर दिले आहे.त्यासोबतच पाचही राज्यातील शाखेमध्ये सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आले आहेत. याप्रसंगी किनवट शाखेच्या वतीने नारायण कटकमवार,अन्नाभाऊ शेलके,केशवराव दासरवार,मुकुंदराव कुसनेनिवार,पद्मावती निलावर,रमेशचंद्र दारमवार,दीपक शिवनकर यांचा सत्कार करण्यात आला. गोदावरी अर्बनचे संस्थापक खासदार हेमंत पाटील व अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या नियोजनात गोदावरी अर्बनने  जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून पाऊण टक्के (०.७५) अधिक व्याजदराची योजना अंमलात आणली आहे.जेष्ठ नागरिक आयुष्यभर काबाडकष्ट करीत आपल्या   वृद्धपकाळातील गरजां भागविण्यासाठी जमापुंजी जमा करीत असतात व निवृत्तीनंतर ती रक्कम बँकेत ठेऊन त्यावरील येणाऱ्या  व्याजाच्या रक्कमेत आपला उदरनिर्वाह करीत असतात त्यांच्या या गरजेची दखल घेत गोदावरी अर्बनने त्यांच्यासाठी विशेष यो

पाडुळी बु येथे टिपु सुलतान ब्रिगेड महाराष्ट्र देश सेवा व मानव सेवे साठी समर्पित असणारी शाखा उघडण्यात आली

   जालना:- आज दि. 21/08/2021 रोजी पाडुळी बु. तालुका घनसावंगी जिल्हा जालना   येथे टिपु सुलतान ब्रिगेड चे प्रदेश अध्यक्ष डॉ. जहीरुदीन यांच्या हस्ते टिपु सुलतान ब्रिगेड ची शाखा उदघाटन करण्यात आली. या वेळीए आलेले प्रमुख अतिथी   नांदेड जिल्हा अध्यक्ष , नदीम भाई सय्यद  व जालना जिल्हा अध्यक्ष, सय्यद करीम बिल्डर.  जिल्हा उपाध्यक्ष, इरफान पठाण,   ता. अध्यक्ष, सलमान पठाण  व आमेल कारके , आसेफ पठान,  पाडुळी बु. चे ( सरपंच ) रणजीत उढाण  व सर्व ग्रामपंचायत सदस्य    शेख जावेद. रामेश्वर घुले. गौरव गायकवाड. आत्माराम घुले.  व शेख मजीद मोलाना. शेख अनीस. शेख अजमत. शेख खय्युम. शेख मोसीन. अशोक घुले. बाळासाहेब बोडखे. बंडु घुले. कुंडलीक घुले. बाळासाहेब आर्डळ. व समस्त गावकरी उपस्थित होते.

किनवट मध्ये वाढला पावसाचा जोर

✍🏽 राजेश पाटील ता. प्र. किनवट: तब्बल एक महीन्याच्या विश्रांती नंतर पावसाने दमदार हजेरी लावली आहे ३६.५१ सरासरी पाऊस झाला असुन पाऊस थांबला असल्यामुळे पिके करपण्यास सुरवात झालती परंतु पुन्हा पाऊस सुरु झाल्याने पिकावरील किड रोग होण्या पासुन वाचले आहे तसेच नदी नाले ओसंडुन वाहत आहेत. तालुक्यातील विविध मंडळात जादा पावसाची नोंद झाली आहे बोधडी-८०१.१ इस्लापुर-८०४.७ जलधरा-९५.६० शिवणी-९१०.० मांडवी-७४३.४ दहेली-७०१.२ अशी मिमि नोंद झाली आहे . तालुक्यात सरासरी ८२४.१ मिली मिटर पाऊस पडला येत्या १६ ऑगष्ट नंतर २२ तारखे पर्यंत दरम्यान मध्यम ते मुसळधार पावासाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे त्यामुळे शेतातील पिकांचे नुकसान होणार हे नाकारता येणार नाही

महावितरणचे कर्मचारी करताय जिवावर उदार होऊन काम

  ( किनवट तालुका प्रतिनिधी ): सध्या सगळीकडे पाऊस, वारा, विजांचा कडकडाट चालु आहे पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत पण किनवट येथील महावितरणचे कर्मचारी या सर्व संकटांवर मात करुन काम करत आहे परंतु वरीष्ठ अधिकारी या बाबीकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहे किनवट- गोकुंदा रोडवर असलेली रोहित्र( डीपी) हि सतत पाण्याखाली असते या बद्दल वांरवार वरीष्ठांना कर्मचाऱ्यांनी तोंडी कळवले व विनंती केली पण वरीष्ठ अधिकारी या गंभीर परीस्थीतीकडे दुर्लक्ष करतात असे महावितरण मध्ये  गुडघाभर पाण्यात अवघड ,धोकादायक परीस्थीती मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे म्हणने आहे.  काही तांत्रीक कारणांनी शॉट सर्कीट होऊन डिपीचा फेज जर गेला तर महावितरण कर्मचार्यांना तारेवरची कसरत करावी लागते आहे

किनवट शहराच्या वार्डा वार्डात कॉंग्रेस शाखा स्थापण करण्याचा युवक शहराध्यक्ष वंसत राठोड यांचा मानस

  शहर प्रतिनिधी: किनवट: नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली व आमदार अमर राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली किनवट शहरात वार्ड वार्ड काँग्रेस पक्षाची शाखा स्थापन करून काँग्रेसला बळकटी प्राप्त करण्यासाठी शाखा स्थापन करणार असल्याचा आत्मविश्वास येथील युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष वसंत राठोड सरदारनगरकर यांनी केला आहे.                 किनवट शहर हा पूर्वी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता पर्यंत मध्यंतरी चा कालावधी सोडला तर हा तालुका वाडी तांड्यात पाड्यात काँग्रेस पक्षाचा बोलबाला आहे. येणाऱ्या किनवट नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये युवकांना जास्त प्रमाणात संधी दिल्यास निश्चित चमत्कार घडेल असा आत्मविश्वास युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष वसंत राठोड यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे. राठोड पुढे म्हणाले की किनवट शहराच्या प्रभागा प्रभागांमध्ये काँग्रेसचे वातावरण अनुकूल असून खऱ्या अर्थाने नगरपरिषदेत युवकांना संधी दिल्यास निश्चित किनवट नगरपरिषदेत काँग्रेसचा झेंडा फडकवुन चमत्कार घडवू असे ते म्हणाले, निष्ठावंत कार्यकर्त्यांना निश्चित संधी दिल्

सेल्फ डिफेन्स शोटोकान कराटे डो असोसिएशन किनवटची बेल्ट एक्झाम संपन्न

  (शहर प्रतिनिधी किनवट/ राजेश पाटील) शोटोकान कराटे डो असोसिएशन तर्फे अनेक विद्यार्थी जिल्हा, राज्य, देश व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले नाव लौकीक करत आहेत तसेच या कराटे स्पोर्ट माध्यमातुन अनेकांनी सैनिकी दलात दाखल झाले व आपले जिवनातील स्वप्न पूर्ण केले . शोटोकान कराटे असोसिएशन प्रशिक्षणा सोबतच शिस्त व आत्म संरक्षणाचे धडे देतो व विद्यार्थ्यामध्ये चिकाटी निर्माण करतो तसेच संयम बाळगायचे देखील शिकवतो . नुकतेच  शोटोकान कराटे डो असोसिएशन तर्फे  बेल्ट एक्झाम घेण्यात आली मुख्य प्रशिक्षक संदिप प्रल्हाद यशिमोड ब्लॅक बेल्ट 3 डॅन यांच्या मार्गदर्शनाखाली हि परीक्षा घेण्यात आली तर सह प्रशिक्षक सचिन राठोड,मारोती येशीमोड संकेत दरडे,रोहित भरणे,गोदावरी येशीमोड,रोमा गादेकर, आदींनी यांनी त्यांना सहकार्य केले व विविध प्रकारच्या बेल्ट साठी विद्याथ्यांची फिजीकल , सेल्फ डिफेन्स परीक्षा घेतली या मध्ये यल्लो बेल्ट, ऑरेन्ज बेल्ट, ग्रीन बेल्ट, ब्लु बेल्ट, ब्रॉऊन बेल्ट, आदिचा समावेश आहे. यात प्रामुख्याने यल्लो बेल्ट साठी पात्र  उतीर्ण विद्यार्थी आदर्श संतोष , बालाजी मदुरे , ओमकार दीपक पिल्लेवार , शिवेद्र प्रवीण पिल्ल

जागतिक आदिवासी दिनानिमित्त जनसेवा आदिवासी युवा प्रतिष्ठान व गोंडवाना युवा जंगोम दल यांच्या संयुक्त विद्यमाने संथागार वृद्धाश्रमात येथे वस्त्र वाटप

  Time's of Maharashtra : आज दि ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्य किनवट येथे महामानव भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला हार अर्पण करून जनसेवा आदिवासी युवा प्रतिष्ठान व गोंडवाना युवा जंगोम दल यांच्या वतीने किनवट येथील संथागार वृध्दालय येथे समस्त युवा बांधवांच्या वस्त्र वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला व यावेळी  संतोष गुहाडे,पवन मडावी,आशिष उर्वते,अंकुश आडे,संतोष पहुरकर, संदीप मेश्राम,अजय सिडांम,ओमप्रकाश आडे,नितेश सलाम,अविनाश कुमरे,कपिल मडावी,आशिष कुमरे,गौरव आत्राम,गजू कुडमते,शिवा सिडाम,आदी सदस्य उपस्थित होते

नव्यानेच रुजु झाल्या बद्दल तहसिलदार डॉ. मृणाल जाधव व सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. किर्ती कुमार पुजार यांच्या वाढदिवसा निमित्त इलेक्ट्रॉनिक प्रेस मिडीयाच्या वतीने सत्कार

( किनवट : सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. किर्ती कुमार पुजार यांच्या वाढदिवसानिमित्त व नुतन तहसिलदार डॉ. मृणाल जाधव ह्या किनवट तहसिल कार्यालयात नव्याने रुजु झाल्या बद्दल  त्यांचा इलेक्ट्रॉनिक प्रेस मिडीया किनवट तर्फे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यांना पुढील कार्यासाठी वउज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या .  यावेळी इलेक्ट्रॉनिक प्रेस मिडीयाचे पदाधिकारी डॉ. आनंद भालेराव, शेख परवीन बेगम, राजेश पाटील,सय्यद नदीम, गंगाधर कदम, गोकुंद्याच्या माजी सरपंच मनीषा चौधरी या वेळी उपस्थित होते तसेच जागतिक अदिवासी गौरवदिना निमित्त क्रांतिकार बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीची महीला कार्यकारणीची बैठक संपन्न

ता. प्र. किनवट:  वंचित बहुजन आघाडी  महिला आघाडीच्या वतीने महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा कौशल्या ताई रणवीर, जिल्हा प्रभारी निरंजना ताई आवटे नांदेड शहराध्यक्षा चंद्रकला ताई चापलकर, रेखाताई ढोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज दिनांक 7 ऑगस्ट रोजी गोकुंदा तालुका किनवट येथील गोपीकिशन मंगल कार्यालयात वंचित बहुजन आघाडी च्या महिला कार्यकारिणी गठित करण्याच्या अनुषंगाने चर्चा व पुढील दिशा ठरविण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन होऊ घालण्यात आले होते या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष मा. किशनरावजी राठोड साहेब महासचिव मा. विलास भालेराव तालुका सचिव मा. राहुल कापसे ज्येष्ठ नेते मा दत्ताजी गडलवाड मा.देवरावजी सोनकांबळे साहेब युवा नेते दया भाऊ पाटील आदित्य भवरे अजित खान पठाण सम्राट कावळे दत्ता भालेराव महेंद्र वासाटे आंत्रोश पेटकुले सेवानिवृत्त मुख्याध्यापक आनंद चंद्र विमलताई पांडे वंदना कोकाटे अनिता मंगाम संगीता कपाटे जयश्री नालावार संगीता सांग पेलीवार कल्पना मुनेश्वर महानंदा कांबळे वैशाली नगारे शांताबाई मुनेश्वर यांच्यासह असंख्य महिलांनी आपली उपस्थिती दर्शविली होती

०७ ऑगस्ट रोजी विश्व आदिवासी दिनाची सुट्टी जाहीर करा.... जितेंन्द्र अ . कुलसंगे

तालुका प्रतिनिधी ः-  संपुर्ण विश्वातील आदिवासीना एकत्रित  आणुन सर्वांगीण विकासाचे सन्मार्ग शोधण्याच्या हेतूने गठित संयुक्त राष्ट्रसंघाने दि. 23 डिसेंबर 1994 च्या बैठकी मध्ये 49/214 च्या ठरावानुसार दरवर्षी 9 आगस्ट हा दिवस विश्व आदिवासी दिवस म्हणुन साजरा करण्या बाबत सर्वानुमते घोषित केले आहे. तेंव्हा पासुन विश्व आदिवासी दिवस हा संपुर्ण भारतभर आदिवासी जमातीकडून मोठ्या उत्सहाने दि. 9आगस्ट रोजी प्रत्येक वर्षी साजरा केला जातो.महाराष्ट्र या राज्यात ही हा दिवस अतिशय जल्लोषात व मोठ्या उत्साहात प्रचंड प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी संपुर्ण आदिवासी जमाती एकत्र येतात आणि सांस्कृतिक ठेवा प्रकट करत महामानवाला व दैवताला अन निसर्गाला वंदन करतात.या दिवसाचे औचित्य साधून आनंदात नृत्य व वेशभुषा व्यक्त करत सांस्कृतिक अस्मिता जपतात.संविधानिक हक्क अधिकार , शिक्षण आरोग्य अशा विषयावर विचार मांडतात.         नुकतेच राजस्थान सरकारने  विश्व आदिवासी दिवस 9 आगस्ट 2020 रोजी या दिवसाची सार्वजनिक सुट्टी घोषित करून तेथील आदिवासी जमातीच्या जन भावनेला न्याय दिले आहे. राजस्थान सरकारने घेतलेल्या या निर्णयाच्या धर्तीवर म

खासदार हेमंत पाटील यांचे केंद्रीय रस्ते- वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांची महामार्गाचे काम जलद गतीने करण्यासंदर्भात घेतली भेट

  ✍🏻 राजेश पाटील किनवट शहर प्रतिनिधी : हिंगोली, किनवट, उमरखेड, हदगाव, कळमनुरी, वसमत, या हिंगोली लोकसभा मतदारसंघा अंतर्गत राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या खूपच संथ गतीने सुरु आहे.  त्यामुळे या मार्गावर अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत . संथ गतीने सुरु असलेली कामे जलद गतीने पुर्ण  करण्या संदर्भात महामार्गाचे व संबंधित कंपनीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन त्यांना काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात यावेत अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय  रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे .                                  नागपूर-बोरी -तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रीट करणाचे काम सुरु आहे . परंतु या महामार्गावर हिंगोली लोकसभा मतदारसंघात महागाव ते नांदेड दरम्यान खूपच संथ गतीने काम चालू आहे . त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले असून आतापर्यंत अनेकांना  आपले प्राण गमवावे लागले आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही काहीच कार्यवाही करण्यात येत नाही याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय रस्

किनवट शहरात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व डेगुंचा प्रसार होवू नये या करीता किनवट नगर परिषदेच्या वतीने औषध फवारणी करण्यात आली त्याचे हे बोलके छायाचित्र

 किनवट शहरात डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व डेगुंचा प्रसार होवू नये या करीता किनवट नगर परिषदेच्या वतीने औषध फवारणी करण्यात आली त्याचे हे बोलके छायाचित्र