Skip to main content

गोदावरी अर्बनच्या वतीने जागतिक जेष्ठ नागरिक दिन साजरा



( किनवट)

जेष्ठ नागरिकांसाठी विशेष व्याजदर योजना:-

जेष्ठ नागरिक हे समाजाचे महत्वपूर्ण घटक असून त्यांचे जगणे सुसह्य होण्यासाठी जागतिक दिनाचे औचित्य साधत गोदावरी अर्बनने नागरिकांसाठी  पाऊण टक्का(०.७५) वाढीव व्याजदर दिले आहे.त्यासोबतच पाचही राज्यातील शाखेमध्ये सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आले आहेत.


याप्रसंगी किनवट शाखेच्या वतीने नारायण कटकमवार,अन्नाभाऊ शेलके,केशवराव दासरवार,मुकुंदराव कुसनेनिवार,पद्मावती निलावर,रमेशचंद्र दारमवार,दीपक शिवनकर यांचा सत्कार करण्यात आला.



गोदावरी अर्बनचे संस्थापक खासदार हेमंत पाटील व अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांच्या नियोजनात गोदावरी अर्बनने  जेष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून पाऊण टक्के (०.७५) अधिक व्याजदराची योजना अंमलात आणली आहे.जेष्ठ नागरिक आयुष्यभर काबाडकष्ट करीत आपल्या   वृद्धपकाळातील गरजां भागविण्यासाठी जमापुंजी जमा करीत असतात व निवृत्तीनंतर ती रक्कम बँकेत ठेऊन त्यावरील येणाऱ्या  व्याजाच्या रक्कमेत आपला उदरनिर्वाह करीत असतात त्यांच्या या गरजेची दखल घेत गोदावरी अर्बनने त्यांच्यासाठी विशेष योजना आखली आहे.


संस्था कायमच जेष्ठ नागरिकांचा सन्मान करत असते,जागतिक महामारी कोरोना काळात देखील संस्थेने आपल्या जेष्ठ ठेवीदारांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेत घरपोच सेवा दिली आहे.इतकेच नव्हे तर वर्षभर पाचही राज्यातील शाखांच्या माध्यमातून त्यांच्या परिसरात असलेल्या जेष्ठ नागरीक कट्टा,संघटना यांच्यासाठी विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते असते.यासोबतच परिसरातील वृद्धाश्रमात मोफत नेत्र तपासणी,आरोग्य शिबीर,बैठकीचे बाकडे,पिठाची गिरणी,कॉट, रेफ्रिजरेटर,अन्न धान्य आशा त्यांना आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तू संस्थेच्या माध्यमातून विविध दिनाचे औचित्य साधून दाईत्वाच्या उदार भावनेतून देण्यात येते.


यावेळी प्रभारी शाखाधिकारी प्रकाश बेक्कमवार,आनंद जंगम, संदेश कटकमवार, गीतेश कोरटकर आदी कर्मचारी वृंद उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...