Skip to main content

खासदार हेमंत पाटील यांचे केंद्रीय रस्ते- वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांची महामार्गाचे काम जलद गतीने करण्यासंदर्भात घेतली भेट

 



✍🏻 राजेश पाटील

किनवट शहर प्रतिनिधी : हिंगोली, किनवट, उमरखेड, हदगाव, कळमनुरी, वसमत, या हिंगोली लोकसभा मतदारसंघा अंतर्गत राष्ट्रीय महामार्गाचे काम सध्या खूपच संथ गतीने सुरु आहे.  त्यामुळे या मार्गावर अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत . संथ गतीने सुरु असलेली कामे जलद गतीने पुर्ण  करण्या संदर्भात महामार्गाचे व संबंधित कंपनीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन त्यांना काम वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात यावेत अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय  रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे . 



                                नागपूर-बोरी -तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट काँक्रीट करणाचे काम सुरु आहे . परंतु या महामार्गावर हिंगोली लोकसभा मतदारसंघात महागाव ते नांदेड दरम्यान खूपच संथ गतीने काम चालू आहे . त्यामुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात अपघाताचे प्रमाण वाढले असून आतापर्यंत अनेकांना  आपले प्राण गमवावे लागले आहेत. याबाबत राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना वारंवार सूचना देऊनही काहीच कार्यवाही करण्यात येत नाही याबाबत खासदार हेमंत पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन अशी मागणी केली आहे कि, राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी आणि काम करणाऱ्या संबंधित कंपनीचे अधिकारी यांची संयुक्त बैठक बोलावून हे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश त्यांना  देण्यात यावेत . तसेच  हिंगोली लोकसभा मतदारसांघातील नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातून जाणाऱ्या किनवट- हिमायतनगर-भोकर फाटा -आणि हिंगोली जिल्ह्यातील वसमत- परभणी पर्यंत जाणाऱ्या महामार्गाचे काम सुद्धा मागील चार वर्षांपासून खोळंबले आहे . यामुळे यंदाच्या पावसाळयात नांदेड - किनवट मार्गावर बांधण्यात आलेले तात्पुरत्या स्वरूपातील पूल वाहून गेल्यामुळे  वाहतूक अनेक तास बंद करण्यात आली होती. हि बाब सुद्धा खासदार हेमंत पाटील यांनी मंत्री महोदयाच्या निदर्शनास आणून दिली .एकंदरीत हिंगोली लोकसभेतील सुरु असलेल्या कामाबाबत गांभीर्याने लक्ष देऊन सर्व सामान्य नागरिकांना होणाऱ्या अडचणी दूर कराव्यात असेही खासदार हेमंत पाटील म्हणाले .

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...