तालुका प्रतिनिधी किनवट:-
किनवट शहरात सध्या मोकाट जनावरांचा सुळसुळाट दिसुन येत आहे यामुळे नागरीकांना ये- जा करणे कठीण होऊन बसले आहे जिकडे पाहावे तिकडे मोकाट गाढव, ढोर, पिसाट कुत्री फिरत असतात तसेच शिवाजी चौक मध्ये तर रस्त्यात ठाण मांडून बसतात तसेच गाढवांचा प्रणय क्रीडा रस्त्यावर बघायला मिळतो त्यामुळे जनतेच्या नाकी नऊ आले आहे .
तसेच या मुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे गाढवाचे मालक गाढवांना वाळू उपसा करण्यासाठी वापरतात व रस्त्यावर सोडून देतात त्याचा नाहक त्रास लोकांना होतो व रहदारीची समस्या निर्माण होते म्हणुन लवकरात लवकर या मोकाट जनावरांना नगर पालीकेच्या कोडंवाड्यात डांबुन बंद करावे व दंड आकारून त्यांचा नगर परिषदेने बंदोबस्त करावा अशी मागणी जनतेतुन होतांना दिसुन येत आहे.
Comments
Post a Comment