Skip to main content

किनवट पेंटर असोशियशन च्या अध्यक्षपदी पेंटर हनीफ यांची तर सचिवपदी अनिल उमरे यांची निवड




 दि.22, किनवट/प्रतिनिधी : किनवट पेंटर असोशियशन च्या अध्यक्षपदी पेंटर हनीफ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. ज्येष्ठ पेंटर तथा किनवट न. प. चे माजी नगराध्यक्ष अरुण आळणे यांच्या अध्यक्षतेखाली व ज्येष्ठ पत्रकार शकील बडगुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत संथागर वृध्दाश्रम किनवट येथे दि.22 रोजी बैठक घेण्यात आली.

     अध्यक्षीय भाषणात अरुण आळणे म्हणाले की नवीन कार्यकारिणी तयार झाल्याने पेंटर व चित्रकार कलाकारांना चांगली कामे मिळतील. ज्या पेंटर ने काम घेतले असेल तर कामासाठी दुसऱ्या पेंटर ने कमी पैशात काम करू नये. दरवर्षी अध्यक्ष बदलल्याने जोमात काम करता येते. 

    माहूर चे रणजीत वर्मा यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मोलाचे मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सर्व पेंटर गरिबीतून वर आलेले आहेत. सर्व कलाकारांचे पोट पेंटिंग व्यवसायावर अवलंबून आहे. असोशियेशन ने सर्वांना आर्थिक मदत कशी करता येईल याकडे लक्ष द्यावे असे सांगितले. 

पेंटर नागनाथ भालेराव यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले की, पेंटर कलाकारांनी आपला व आपल्या परिवाराचा विमा काढून घ्यावा. कामगार फॉर्म भरून केंद्र शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, मी सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. असे त्यांनी सांगितले. 


     पेंटर रमेश दिसलवार म्हणाले की, पेंटर कडून कामे करून घेतल्या जातात परंतु अडवान्स दिल्यानंतर बाकीची रक्कम बुडविली जाते. असे सांगितले.


यावेळी देविदास पेंटर, जावेद पेंटर, अशोकराज पेंटर, सुदर्शन पेंटर, लोखंडे पेंटर यांनी अनुभव कथन करून भावी कलाकारांना प्रोत्साहन दिले. आपल्या सोबत घडलेल्या भावना व्यक्त केल्या.


     कार्यक्रमा नंतर सर्वानुमते कार्यकारिणी घोषित करण्यात आली ती अशी,


अध्यक्ष-शेख हनीफ पेंटर 


उपाध्यक्ष-राठोड पेंटर / दुर्गादास भालेराव


सचिव-अनिल उमरे पेंटर/ रामेश्वर घुले पेंटर


सहसचिव-शिलरत्न पाटील / संदीप वाघाडेकोषाध्यक्ष- प्रतिरूप पेंटर


सहकोषाध्यक्ष-नौशाद पें


सदस्य- रमेश दिसलवार पेंटर, अजिंक्य आळणे, विनोद भालेराव, सुमेध कापसे


मार्गदर्शक- अरुण आळणे, शकील बडगुजर, बालाजी इंदुरकर, सुदर्शन मारपवार, नागनाथ भालेराव.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रंचालन पेंटर अनिल उमरे यांनी केले. आभार पेंटर दिशलवार यांनी मानले.


बैठकीस वरिष्ठ पेंटर मेश्राम, पेंटर शे. मुस्तफा, अमोल भगत, लोखंडे पेंटर, पेंटर सुरेशवार, विनोद कातले, सतराम पवार, चोबुल खान पठाण, सुरेश पेंटर, विनोद भालेराव युवा कलाकार अजिंक्य आळणे उपस्थित होते. नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आल्याने सर्वांचे अभिनंदन होत आहे.



Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...