किशनराव ठमके व साहेबराव हलवले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न व वामनदादा कर्डक संगितरत्न पुरस्कार प्रदान
राजेश पाटील/शहर प्रतिनिधी किनवट:
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व महाकवी वामनदादा कर्डक यांच्या जंयती निमित्त किनवट येथील फुले शाहू आंबेडकर चळवळीचे सुप्रसिद्ध कवी गायक कलावंत किशनराव ठमके व साहेबराव हलवले यांना तेलंगणातील अदिलाबाद येथे राष्ट्रीय आबेंडकरी कला महोत्सव अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य व संस्कृती संवर्धन मंडळाच्या वतीने बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजरत्न पुरस्कार व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संगितरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला पुरस्कार हा आयोजन समितिचे अध्यक्ष मधु बावलकर यांच्या हस्ते देण्यात आला यावेळी समितीचे प्रशांत वनजारे, माया खिल्लारे, मंगला कावळे, आम्रपाली वाठोरे आदी मान्यवर उपस्थित होते या पुरस्कारा बद्दल किनवट तालुक्यातुन त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment