Skip to main content

सैनिक टाकळी येथील ‘सुभेदार’ कुटुंबाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद

 



कोल्हापुर:

सैनिक टाकळी (प्रतिनिधी)

इसविसन १९१४ ते २०२१ अशी १०७ वर्षे देशाला १४ सैनिक देणारे सैनिक टाकळी येथील सुभेदार कुटुंब सैनिक सैनिक टाकळी येथील ‘सुभेदार’ कुटुंबाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद


 येथील ‘सुभेदार’ कुटुंबाची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् मध्ये नोंद





 वैशिष्टयपूर्ण कुटुंब ठरले असून त्यांचा नुकताच महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् च्या वतीने यथोचित गौरव करण्यात आला. सैनिक टाकळी येथील माजी सैनिक कल्याण मंडळाच्या सभागृहात झालेल्या या समारंभाच्या अध्यक्षस्थानी ऑ. ले. बी. एस. पाटील होते.

कोल्हापूर जिल्ह्यामधील शिरोळ तालुक्यातील टाकळी या गावातील घरटी एक तरी व्यक्ती सैन्यात असल्यामुळे या गावाला ‘सैनिकांचे गाव’ म्हणून ओळखले जाते. 

इसविसन १९६८ साली देशभक्त डॉ. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या सहकार्याने भारताचे लष्करप्रमुख जनरल पी. पी. कुमार मंगलम, जनरल एस. पी. थोरात आणि ले. जनरल मोती सागर टाकळी गावात आले होते. त्यावेळी गावच्या आजी-माजी सैनिकांनी त्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले होते. फौजी गणवेश परिधान करून रस्त्याच्या दोन्ही बाजूला उभे राहिलेले जवान पाहताना लष्करप्रमुख भारावून गेले. टाकळी गावची महती त्यांनी स्वतः जाणून घेतली. त्यावेळी त्यांनी 'इस गाव का नाम सिर्फ टाकळी नही, सैनिक टाकळी होना चाहिए' असे गौरवपूर्ण उद् गार काढले. तेव्हापासून गावाला ‘सैनिक टाकळी’ म्हणून ओळखले जाऊ लागले.

आर्मी, नेव्ही, एअरफोर्स आणि पोलिस दलाच्या माध्यमातून येथील अनेक लोक आजही देशसेवा करतात. या गावचा जवान नाही असा एकही लष्करी तळ देशात नाही असे अभिमानाने सांगितले जाते. अगदी ब्रिटीश काळापासून येथील तरुणांनी लष्कराची वाट धरली. पहिल्या जागतिक महायुद्धाच्या काळात ब्रिटीश सरकारने राजे, महाराजे, नबाब, जमीनदार यांना आपल्या इलाक्यातून जवान पाठवण्याचा हुकूम काढला. त्यावेळी सैन्यात भरती होणार्‍या व लढाईवर जाणार्‍यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून जमिनी इनाम दिल्या गेल्या. कुस्ती, तलवारबाजी, दांडपट्टा, मलखांब, लेझीम अशा इतर मैदानी खेळात तरबेज असणारे जवान भरती झाले.  

सैनिक टाकळी येथील रावसाहेब मालोजीराव जाधव हे पहिल्या महायुद्धात सहभागी झाले होते. ते टाकळी गावातील पहिले सुभेदार होते तत्तपश्चात या कुटुंबाला 'सुभेदार' या टोपन नावाने ओळखले जाऊ लागले. दुसर्‍या महायुद्धामध्ये त्यांचा मुलगा ज्ञानदेव रावसाहेब जाधव यांनी सहभाग घेतला होता. ते सुभेदार मेजर पदावर कार्यरत होते. त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांनी प्रभावीत होऊन इंग्रजांच्या नोकरीचा त्याग केला आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी आझाद हिंद सेनेत प्रवेश केला. यांचाही मुलगा ऑ. कॅप्टन बापूराव जाधव यांनी इसविसन १९६५ व इसविसन १९७१ च्या भारत-पाक युद्धात भाग घेतला. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी गावातील आजी-माजी सैनिकांना एकत्र करून 'माजी सैनिक कल्याण मंडळ' ची स्थापना केली. आजपर्यंत झालेल्या वेगवेगळ्या युद्धात शहीद झालेल्या टाकळी गावच्या १८ जवानांचे स्मारक उभे केले. गावातील वीर माता, वीर पत्नी व आजी-माजी सैनिकांच्या समस्या शासनासमोर मांडल्या. त्यांचा मुलगा भरतकुमार बापूराव जाधव बॉम्बे इंजिनिअरींग ग्रुपमध्ये नाईक पदावर होता. त्यांनी इसविसन १९८४ पासून इसविसन २००१ पर्यंत देशसेवा केली. सध्या सुभेदार कुटुंबातील पाचव्या पिढीतील अक्षय भरतकुमार जाधव हाही इसविसन २०१६ पासून सिपाई या पदावर भरती झाला आहे.

इसविसन १९१४ पासून इसविसन २०२१ अशी १०७ वर्षे देशाला १४ सैनिक देणारे हे महाराष्ट्रातील एक अत्यंत उल्लेखनिय कुटुंब ठरले आहे. त्याबद्दल सुभेदार कुटुंबाचे प्रतिधिनी म्हणून नाईक भरतकुमार बापूराव जाधव यांना महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस् चे मुख्य संपादक डॉ. सुनील दादा पाटील यांनी शाल, श्रीफळ, मेडल, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मानीत केले. यावेळी उपसरपंच सुदर्शन भोसले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख मधुकर पाटील, श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक विनोद पाटील, गाव कामगार पोलिस पाटील सौ. सुनिता पाटील, लेखक मनोहर भोसले, अनुवादक राज धुदाट, इतिहास संशोधक अन्सार रमजान पटेल, सौ. संजीवनी सुनील पाटील, सौ. शीतल मनोहर भोसले, सौ. रोझमेरी राज धुदाट आदी सह निवडक ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन उदय पाटील यांनी केले. नाईक भरतकुमार बापूराव जाधव यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...