(बापुराव वावळे बोधडी प्रतिनिधी ):-
ता.३०
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या१०१ जयंतीचे औचित्य साधून
बोधडी खुर्द येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोधडी खुर्द येथील सरपंच सौ.सुमनबाई काळे म्हणुन उपस्थित होत्या त्यांच्य हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले
रक्तदान शिबिराचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बोधडी खुर्द येथील सर्व ग्रामपंचायत सदस्य गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक गावकरी यांनी मोलाचे सहकार्य केले रक्तदान शिबिराचा कार्यक्रम योग्य रित्या पार पडला. रक्तदान करण्यासाठीं युवक मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.नामदेवराव कराड यांनी जयंती मंडळाच्या अध्यक्ष, सदस्य, यांचे आभार मानून रक्तदान शिबिराची सांगता केली.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी,
अध्यक्ष,जिवा गादेकर, अविनाश वाघमारे,प्रविण देवकुळे, सुमित पैले, विनोद सुर्यवंशी, बालाजी गायकवाड, रोहीत गायकवाड आदींनी परिश्रम घेतले या शिबिरात एकुण २२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
Comments
Post a Comment