Skip to main content

Posts

Showing posts from September, 2024

१९ व्या कोल्हापुर समेंलनात सौ.रुचीरा बेटकर शब्दकुंज प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

  नांदेड प्रतिनिधी:- नांदेड येथील प्रसिद्ध कवयित्री तथा लेखिका सौ. रुचीरा बेटकर सह शिक्षिके सोबत साहित्य क्षेत्रात सुद्धा काम करतात त्यांच्याच कामाची पोहच पावती म्हणून कोल्हापूर येथील १९ व्या संमेलनात 'शब्दकुंज प्रेरणा पुरस्काराने' सन्मानित करण्यात आले. कवि सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी  आयोजित कोल्हापूर येथे  १९ व्या राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनात 'शब्दकुंज प्रेरणा पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले.     सदरचा पुरस्कार डॉ. श्रीकांत पाटील प्रसिद्ध कांदबरीकार यांचे  हस्ते आणि संमेलन अध्यक्ष प्रा. पी. एस. पाटील, डॉ रामचंद्र चोथे दादासाहेब शेख ' भाऊसाहेब कांबळे अशोक मोहिते, शैलजा परमणे प्रा. संतोष जोईल, सुशिल डवर आणि संमेलन आयोजक कवि सरकार इंगळी यांच्या उपस्थीत २९ सप्टेंबर २४ रोजी देऊन सन्मानीत करण्यात आले या बद्दल नांदेड येथील साहित्यिक मंडळी कवीकट्टा, अक्षरोदय साहित्य मंडळ, कॉमेडी कट्टा व नांदेड जिल्ह्यातील साहित्यीक मंडळींनी अभिनंदन केले आहे.

आपली भाषा हि काळजात रुजणारी भाषा असते- प्रा. डॉ. तपन कुमार मिश्रा

  नांदेड: प्रतिनिधी श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित हिंदी विभाग यशवंत महाविद्यालय नांदेड येथे हिंदी दिवसाचे औचित्य साधून पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले होते. ज्या मध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे कौशल्य दाखवले व सहभाग घेतला या पंधरवाडयाचा समारोप हिंदी दिवस व हिंदी साहित्य परिषदच्या उद्घाटनाने झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा उद्घाटक म्हणून सरस्वती विद्या मंदिर महाविद्यालय किनवटचे प्राध्यापक डॉ. तपन कुमार मिश्रा हे उपस्थित होते. आपल्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी भाषा उत्पत्ती पासून ते भाषा हि काळाजात रुजलेली भाषा आहे असे प्रतिपादन त्यांनी केले जी की सर्व भारताला जोडण्याच काम करते भारतीय परंपरा भाषा यांचा संयोग कसा आहे ते समजावून सांगितले तथा सर्वेश्वर दयाल सक्सेना यांची रचना जब भी भुख से लडने कोई खडा हो जाता है सुंदर दिखने लगता है! या कवितेने समारोप केला तर अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे उपप्राचार्या कविता सोनकांबळे यांनी महाराष्ट्रात हिंदी भाषा अधिक बोलल्या जाते अटल बिहारी वाजपेयी यांची कविता उम्र की ऐसी की तैसी या माध्यमातून ह

एम. ए. मराठी द्वितीय वर्षासाठी समीक्षा ग्रंथाची संदर्भग्रंथ म्हणून निवड

( राजेश पाटील/किनवट ता. प्र.) मांडवी : येथून  असलेल्या शिरपूर (ता.किनवट) येथील रहिवासी तथा प्रज्ञा प्रतिष्ठान अध्यापक महाविद्यालय नांदेड येथील प्राचार्य डॉ राजू मोतेराव यांच्या समीक्षा ग्रंथांचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे एम. ए. मराठी द्वितीय वर्षासाठी संदर्भ ग्रंथ डॉ. राजू मोतेराव म्हणून निवड करण्यात आली आहे. त्यांच्या आदिवासी साहित्य : जाणीव जागर या पुस्तकाची निवड झाली आहे. तसेच कादंबरी आस्वाद आणि आकलन या समीक्षा ग्रंथाचे उस्मानिया विद्यापीठ हैदराबाद येथे एम. ए. मराठी विषयासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून निवड केलेली आहे. एकाच समीक्षा ग्रंथाचे दोन विद्यापीठात संदर्भ ग्रंथ म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचे प्रज्ञा प्रतिष्ठान अध्यापक महाविद्यालयाचे अध्यक्ष मा. डॉ. माधवराव पाटील किन्हाळकर डॉ. वृषाली किन्हाळकर, डॉ. वैजयंता पाटील, प्राचार्य पंजाब चव्हाण, प्राचार्य केशव इंगोले, प्राचार्य गोपाल पवार, प्राचार्य घुले, प्राचार्य मोरे, प्राचार्य पुंडगे, डॉ. खुरपे, प्राचार्य पाईकराव, डॉ. के. जी. टेंभुर्णीकर, डॉ. एडके, डॉ. मस्के, डॉ. श्रीनिवास येनगुवार, डॉ. पंजाब शेरे, डॉ. हेमंत सो

आतिशी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री

  नवी दिल्ली : आतिशी मार्लेना यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दिल्लीचे उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. त्यामुळे आतिशी दिल्लीच्या तिसऱ्या आणि सर्वांत कमी वयाच्या मुख्यमंत्री ठरल्या आहेत. आतिशी या ४३ वर्षांच्या आहेत. त्यामुळे त्या सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरल्या आहेत. आतिशी यांच्यासोबत आपचे आमदार गोपाल राय, सौरभ भारद्वाज, कैलाश गहलोत, इमरान हुसैन आणि मुकेश अहलावत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. सुल्तानपूर माजरा येथील आमदार मुकेश अहलावत पहिल्यांदाच दिल्ली सरकारमध्ये मंत्री बनले. गोपाल राय, सौरभ भारद्वाज, कैलाश गहलोत, इमरान हुसैन हे यापूर्वीच्या अरविंद केजरीवाल सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदावर कार्यरत होते. अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आतिशी यांनी आज दिल्लीची सूत्रे हाती घेतली.

खासदार हेमंत पाटील यांची कॅबीनेट मंत्री पदी निवड झाल्या बद्दल नांदेड येथे सत्कार

(नांदेड/किनवट प्रतिनिधी) शिवसेनेचे क्रियाशील खासदार तथा उपनेते हेमंत पाटील यांची कॅबीनेट पदी वर्णी लागल्या बद्दल किनवट तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे पाटील , शहर प्रमुख सुरज सातुरवार, युवासेना तालुका प्रमुख अजय कदम पाटील यांनी पेढा भरवुन व शाल श्रीफळ देऊन सत्कार केला या वेळी असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

भंते अनागारिक धर्मपाल यांची जयंती व भय्यासाहेब आंबेडकर स्मृत्तीदिना निमित्त अभिवादन कार्यक्रम

किनवट: येथुन जवळच असलेल्या गोकुंदा येथील सम्राट अशोक बुद्ध विहार राजर्षी शाहू नगर येथे भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा किनवट च्या वतीने दि.१७सप्टेंबर रोजी चैत्यभूमी चे शिल्पकार सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन व अनागारिक धम्मपाल यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.प्रारंभी प्रतिमा पुजन करुन संस्कार उपाध्यक्ष प्रा.सभाष गडलिंग व संस्कार सचिव बौद्धाचार्य अनिल उमरे यांनी वंदना घेतली.रिपाईचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरी बद्दल नांदेड येथे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित भारतीय बौध्द महासभेचे तालुका अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांचा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा व वार्ड शाखेचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते प्रमुख अतिथी सावित्री बाई फुले विचारमंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके यांच्यासह भव्य सत्कार करण्यात आला .प्रमुख अतिथी भारतीय बौध्द महासभेचे तालुका सरचिटणीस प्राचार्य राजाराम वाघमारे, अखिल भारतीय बौध्द उपासक संघाचे नांदेड जिल्हा अध्

पुण्याच्या मराठवाडा समन्वय समितीचा डॉ.अशोक बेलखोडे यांना 'मराठवाडा भूषण' पुरस्कार जाहीर

  किनवट,दि.  : मराठवाडा समन्वय समिती, पुणे च्या वतीने देण्यात येणारा सामाजिक क्षेत्रातील 'मराठवाडा भूषण' पुरस्कार किनवट येथील जेष्ठ समाजसेवक डॉ. अशोक बेलखोडे यांना नुकताच जाहीर झाला आहे.हा पुरस्कार  येत्या दि.१९ ला पुण्यात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.   मराठवाडा समन्वय समितीच्या वतीने २००९ सालापासून दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर पुणे, येथे मराठवाडा मुक्ती दिन महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमात मराठवाड्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्वान व्यक्तींना पुण्यातील तमाम मराठवाडा वासीय व पुणेकरांच्या वतीने 'मराठवाडा भूषण' पुरस्कार देऊन गौरवण्यात येते.   डॉ.बेलखोडे हे सामाजिक क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व आहेत. ते मागील तीस वर्षाहून अधिक काळ नांदेड जिल्ह्यातील किनवट परिसरातील आदिवासी समाजासाठी खूप मोठे सेवा कार्य करत आहेत. समाजातील विविध घटकांसाठी सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयी डॉ.बेलखोडे हे करत असलेले सेवा कार्य अतिशय प्रेरणादायी आहे. त्यांच्या  बहुमूल्य योगदानासाठी 'मराठवाडा

श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय दहेली येथे सेवानिवृत्त शिक्षकांचा निरोप समारंभ व सपत्नीक सत्कार

  किनवट/ प्रतिनिधी: श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय दहेली येथे सेवानिवृत्त शिक्षक श्री एस.जी.जावळे व जी.आर. पोटफळे यांचा निरोप समारंभ व सपत्नीक सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला.       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील पांडुरंग जोगी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्याध्यापक श्री पी आर वाडेकर, ( माजी मुख्याध्यापक), श्रीनिवास जाधव (तंटामुक्ती उपअध्यक्ष), आनंद भालेराव( संपादक किनवट टुडे न्यूज), शिवदास आप्पा लाटकर (सरपंच शेवडी), लक्ष्मण रामराव पोटफळे (भाजप जिल्हा उपाध्यक्ष नांदेड ग्रामीण), युसुफ पटेल (नगरसेवक नांदेड), नवनाथ शेळके (पंचायत समिती सदस्य लोहा), मोतीराम दरेगावे सावकार (सरपंच), शेख हुसेन मामू (सदस्य ग्रामपंचायत शेवडी), बालाजी मारोतराव पोटफळे ,विलासराव शिंदे भगवती, श्री गणेश सूर्यवंशी सर,  शिवाजी तूपकरी सर,कैलास डोळस सर,श्री भोपे सर, सर सौ.सुनिता भोपे, निलेश जावळे,शितल पोटफळे, श्री भालके सर, श्री राजेंद्र ठाकरे सर सिंदखेड,एम एस.जाधव सर,मंगेश परमेश्वर चव्हाण, धीरज मुळे, सौ दिपाली वाडकर, सुनिता शेंदलवार,सौ.  सविताताई शिवराज जावळे, शोभाताई  गंगाधर पो

नांदेड येथील शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत किनवटच्या विद्यार्थ्यांचे यश

किनवट/प्रतिनिधीः क्रीडा व युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय नांदेड  दि. २६/२७  नांदेड येथे शालेय जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा संपन्न झाली. यात किनवटच्या खेळाडूंने उत्तुंग भरारी मारत यश संपादन केले. यात १४ वर्षाखालील विद्यार्थी आदित्य मांजरमकर प्रथम  स्वयं लोखंडे द्वितीय श्वेता इंदल राठोड १४ वर्ष प्रथम अर्णव राठोड प्रथम १७ वर्षाखालील विद्यार्थी राजनंदनी पवार प्रथम आदर्श बोईनवाड द्वितीय भावेश माने द्वितीय रंजीत पवार द्वितीय संस्कृती मेश्राम प्रथम तनिष्का चिल्लावर प्रथम अद्विका पेंटावर द्वितीय साईनाथ पवार प्रथम वैष्णवी बेंद्रे प्रथम यांना राहुल जाधव द्वितीय क्रमांक सार्थक चाटे द्वितीय निशांत शिरपुरे द्वितीय अथर्व मुंडे प्रथम : समीक्षा मुनेश्वर प्रथम संचिता बाडगुरे प्रथम प्रथमेश साळुंके द्वितीय: द्वारिका राठोड द्वितीय. या सर्व स्पर्धा क जिल्हा क्रीडा संकुल नांदेड येथे संपन्न झाल्या या सर्व खेळाडूंचे मुख्य प्रशिक्षक संदीप येशी मोडमोड व सहप्रशिक्षक दर्शन चव्हाण यांनी मार्गदर्शन केले .  या यशाबद्दल नांदेडचे जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंबरे साहेब व

गणेश चतुर्थी निमित्त बाजार पेठेत लगबग

  किनवट: दरवर्षी प्रमाणे यंदाही पारंपारिक पद्धतीने श्री गणेश चतुर्थीनिमित गणपती बसवण्यात येत आहे याची लगबग सुरू झाली आहे छ.शिवाजी चौकात गणेश स्थापनेसाठी लागणारे हराळी , फुले, मक्का, डाळींब पाने , फळे, सजावटी साठी लागणारे साहित्य घेण्यासाठी गणेश भक्त तयारीत दिसत आहे गणेश चतुर्थी निमित छ. शिवाजी चौकात आगमनाच्या तयारीत  सज्ज असलेली गणेश मुर्ती हे छायाचित्र टिपले आहे पत्रकार राजेश पाटील यांनी.

व्हॉईस ऑफ मीडियाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी डॉ. गणेश जोशी

  व्हॉईस ऑफ मीडियाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी डॉ. गणेश जोशी नांदेड : व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या राष्ट्रीय संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी प्राचार्य डॉ. गणेश जोशी यांची निवड शिर्डी येथील अधिवेशनात करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. मागील दोन वर्षांपासून प्राचार्य डॉ. गणेश जोशी हे संघटनेचे काम प्रभावीपणे करत असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन दि. १ सप्टेंबर रोजी शिर्डी येथे व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेचे अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मान्यतेने नांदेड जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश जोशी यांची निवड प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, मराठवाडा विजय चोरडीया यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून करण्यात आली. या निवडीबद्दल सर्व स्तरातून डॉ. गणेश जोशी यांचे अभिनंदन केले जात आहे.

सिद्धार्थ नगर व साठे नगर ला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या बोअरवेल भोवती घाणीचे साम्राज्य

  किनवट शहर प्रतिनिधी: किनवट येथील साठे व नगर सिद्धार्थ नगर येथे गेल्या चार ते पाच दिवसा पासुन बोअर नादुरुस्त असल्याने पाणी पुरवठा बंद आहे तसेच नगर परिषदे बोअर वेलच्या भोवताली घाणीचे साम्राज्य पसरले आहे तिथे लोक मुत्र विसर्जण करतात तसेच डुकराचे वास्तव्य आहे सलूनचे केस तिथेच फेकल्या जाते लाकडी भुसा फेकल्या जातो तसेच तिथे भयंकर अस्वच्छता पसरली आहे तिथे नगर परिषदेने स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी साठे नगर वासीय सिद्धार्थ नगर वासीय करीत आहे.

किनवट तालुक्यातील सर्व मंडळात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा-काँग्रेसचे सहाय्यक जिल्हाधिकारी यांना निवेदन

  किनवट : किनवट तालुका क्षेत्रातील सर्व मंडळात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी  बांधवाना तात्काळ ५० हजाराची आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीचे निवेदन किनवट  तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी यांना दि.०४ सप्टेंबर रोजी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष  के. सूर्यकांत रेड्डी, किनवट शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष गिरीष नेम्मानीवार, माजी नगराध्यक्ष  के. मूर्ती, अभय महाजन, सिराज जिवाणी, जव्वाद आलम, शेख इमरान शेख चांद, वसंत राठोड,  खालेद भाई, अनुप देशमुख, लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, गनीभाई खुरेशी, अंबादास वरगुडे, रवि  देशमुख, स. जायद भाई आदींची उपस्थिती होती.

सिद्धार्थ नगर नवयुवक मंडळातर्फे महात्मा फुले चौकात साचलेल्या पाण्याची व्हिलेवाट

 किनवट: महात्मा फुले चौक येथील पुतळ्या समोर पावसाचे पाणी साचुन येजा करणाऱ्या नागरिकांना नाहक त्रास होत होता सिद्धार्थ नगर येथील नवयुवक मित्र मंडळाने तेथील बाजुने रस्ता खोदून साचलेल्या पाण्याला वाट दिली व  पाईप टाकला या मुळे सर्व स्तरातुन कौतुक होत आहे तसेच चौक परिसरातील विद्युत खांब अनेक दिवसा पासुन बंद अवस्थेत आहे ती तात्काळ दुरुस्त करावी अशी मागणी करण्यात येत आहे

सकाळ व मंथन इन्फ्रा केअर सयुंक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सन्मान डॉक्टरांचा कार्यक्रमात डॉ. अशोक बेलखोडे यांचा सन्मान

  किनवट. : डॉक्टर हे समाजाच्या अत्यंत महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहेत, ज्यांचे योगदान अतुलनीय आहे. डॉक्टरांनी कोरोनाच्या भीतीदायक काळात आपल्या अथक प्रयत्नांनी समाजासाठी महत्वपूर्ण सेवा बजावली आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. डॉक्टर म्हणजे समाजासाठी देवच आहेत, असेच म्हणावे लागेल, 'सकाळ'ने घेतलेल्या या अभिनव उपक्रमाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोक कहाण यांनी डॉक्टरांच्या कार्याचा गौरव केला, 'सकाळ' व मंथन इन्फ्रा केअर यांच्या संयुका विद्यमाने शनिवारी (ता. ३१) नदिडमध्ये डॉक्टरांचा सन्मान सोहळा पार पडला यात अनेक डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला या मध्ये किनवटचे सानेगुरूजी हॉस्पीटलचे सर्वेसर्वा तथा समाजसेवक किनवट सारख्या दुर्गम आदिवासी भागात आरोग्यसेवा विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविणारे पेशाने सर्जन असणारे डॉ. अशोक बेलखोडे यांचा सन्मान नांदेड येथे झाला या बद्दल किनवट येथील अनेक मान्यवर , सामाजिक संस्था , राजकीय मंडळी , डॉक्टर असोसिएशन प्रा.डॉ. सुनिल व्यवहारे, प्रा.डॉ. पंजाब शेरे, ॲड. मिलिंद सर्पे, अभियंता प

नीट वैद्यकीय प्रवेश परीक्षेत एम.के. टी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नो सायन्स च्या विद्यार्थ्यांचे सुयश !

  किनवट,दि २: मनामध्ये जिद्द असेल तर कुठलेही कार्य कठीण नाही,अशाच प्रकारची प्रचिती नुकत्याच लागलेल्या नीट वैद्यकीय पात्रता परीक्षेच्या पहिल्या प्रवेश यादीतील निकालावरून स्पष्ट होते. योग्य मार्गदर्शन व सातत्यपूर्ण अभ्यास यांच्या बळावरती किनवट सारख्या आदिवासी, दुर्गम भागांमध्ये २ दोन वर्षांपूर्वी कार्यरत झालेल्या मातोश्री कमलताई ठमके इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नो सायन्स, गोकुंदा(ता. किनवट)मधील विद्यार्थ्यांची पहिल्या यादीत निवड होणे हे स्पष्ट करते,असे प्रतिपादन अभि. प्रशांत ठमके यांनी केले.      आज(ता.२) महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालया मध्ये  निवड झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.यावेळी अध्यक्षीय समारोप करताना ते बोलत होते.  मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्या शुभांगीताई ठमके, माजी प्राचार्य राजाराम वाघमारे, मुख्याध्यापक तथा प्राचार्य अंबादास जुनगरे व रामराव घुले हे उपस्थित होते.   एम.के.टी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नो सायन्स चे विद्यार्थी सुयश प्रशांत ठमके यांने  नीट परीक्षेत ५९५ एवढे गुण

गरजवंत रुग्णांनी AIIMS नागपूर येथे वैद्यकीय कक्षाचा लाभ घ्यावा - अमन कुंडगीर

किनवट:- मा.खा.पद्मश्री डॉ.विकास महात्मे सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून वैद्यकीय सहाय्यता सेलची स्थापना अमन कुंडगीर बनले आरोग्य दूत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर AIIMS मध्ये अल्पदरात उपचार आजारग्रस्त रुग्णांनी वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा लाभ घ्यावा, 47 क्रमांकाच्या कंट्रोल रुमवर चौकशी करावी - अमन कुंडगीर नागपूर/किनवटः रुग्ण सेवा हीच ईश्‍वर सेवा हे ब्रीद मानुन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर येथे मा.खा.पद्मश्री डॉ.विकास महात्मे सोशल फाऊंडेशनच्या वतीने गंभीर आजाराने ग्रस्त किंवा उपचारासाठी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या असलेल्या रुग्णांसाठी वैद्यकीय सहाय्यता सेल स्थापन करण्यात आला आहे. ज्यामुळे गरीब व गरजू रुग्णांना याचा मोठा फायदा होत आहे. तरी गंभीर रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य चे युवक प्रदेशाध्यक्ष अमन कुंडगीर यांनी केले आहे.       अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान मध्ये आरोग्याच्या समस्या असलेल्या गंभीर स्वरुपाच्या रुग्णांच्या मदतीसाठी 47 क्रमांकाचे कंट्रोल रुम स्थापन करण्यात आले आहे. रुग्णांनी एम्स रुग्णालयात डॉक्टरांच्या त