नवी दिल्ली : आतिशी मार्लेना यांनी आज दिल्लीच्या मुख्यमंत्री
म्हणून शपथ घेतली. दिल्लीचे उपराज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी त्यांना पद व गोपनियतेची शपथ दिली. त्यामुळे आतिशी दिल्लीच्या तिसऱ्या आणि सर्वांत कमी वयाच्या मुख्यमंत्री ठरल्या आहेत. आतिशी या ४३ वर्षांच्या आहेत. त्यामुळे त्या सर्वांत तरुण मुख्यमंत्री ठरल्या आहेत. आतिशी यांच्यासोबत आपचे आमदार गोपाल राय, सौरभ भारद्वाज, कैलाश गहलोत, इमरान हुसैन आणि मुकेश अहलावत यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. सुल्तानपूर माजरा येथील आमदार मुकेश अहलावत पहिल्यांदाच दिल्ली सरकारमध्ये मंत्री बनले. गोपाल राय, सौरभ भारद्वाज, कैलाश गहलोत, इमरान हुसैन हे यापूर्वीच्या अरविंद केजरीवाल सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदावर कार्यरत होते. अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर आतिशी यांनी आज दिल्लीची सूत्रे हाती घेतली.
Comments
Post a Comment