व्हॉईस ऑफ मीडियाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी डॉ. गणेश जोशी
नांदेड : व्हॉईस ऑफ मीडिया या पत्रकारांच्या राष्ट्रीय संघटनेच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी प्राचार्य डॉ. गणेश जोशी यांची निवड शिर्डी येथील अधिवेशनात करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. मागील दोन वर्षांपासून प्राचार्य डॉ. गणेश जोशी हे संघटनेचे काम प्रभावीपणे करत असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन दि. १ सप्टेंबर रोजी शिर्डी येथे व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेचे अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनात व्हॉईस ऑफ
मीडिया संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांच्या मान्यतेने नांदेड जिल्हा व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेच्या जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश जोशी यांची निवड प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, मराठवाडा विजय चोरडीया यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देवून करण्यात आली. या निवडीबद्दल सर्व स्तरातून डॉ. गणेश जोशी यांचे अभिनंदन केले जात आहे.
Comments
Post a Comment