Skip to main content

भंते अनागारिक धर्मपाल यांची जयंती व भय्यासाहेब आंबेडकर स्मृत्तीदिना निमित्त अभिवादन कार्यक्रम


किनवट: येथुन जवळच असलेल्या गोकुंदा येथील सम्राट अशोक बुद्ध विहार राजर्षी शाहू नगर येथे भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा किनवट च्या वतीने दि.१७सप्टेंबर रोजी चैत्यभूमी चे शिल्पकार सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर यांचा स्मृतिदिन व अनागारिक धम्मपाल यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला.प्रारंभी प्रतिमा पुजन करुन संस्कार उपाध्यक्ष प्रा.सभाष गडलिंग व संस्कार सचिव बौद्धाचार्य अनिल उमरे यांनी वंदना घेतली.रिपाईचे मराठवाडा प्रदेश उपाध्यक्ष दादाराव कयापाक यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात शैक्षणिक क्षेत्रातील दैदिप्यमान कामगिरी बद्दल नांदेड येथे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित भारतीय बौध्द महासभेचे तालुका अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांचा भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा व वार्ड शाखेचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते प्रमुख अतिथी सावित्री बाई फुले विचारमंचच्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगीताई ठमके यांच्यासह भव्य सत्कार करण्यात आला .प्रमुख अतिथी भारतीय बौध्द महासभेचे तालुका सरचिटणीस प्राचार्य राजाराम वाघमारे, अखिल भारतीय बौध्द उपासक संघाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष उत्तम कानिंदे यांनी सूर्यपुत्र भय्यासाहेब तथा यशवंतराव आंबेडकर व अनागारीक धम्मपाल यांच्या भारतातील धम्म प्रसार कार्यावर प्रकाश टाकला व सत्कारमूर्ती अभियंता प्रशांत ठमके यांनी सत्कार प्रसंगी किनवट तालुक्यातील मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ व मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अविरतपणे दैदिप्यमान शैक्षणिक कार्य करुन आदिवासी डोंगराळ भागात शैक्षणिक क्रांती केली तसेच भारतीय बौध्द महासभेच्या माध्यमातून धम्मचळवळ गतीमान करत सामाजिक सत्कार्य केल्याबद्दल त्यांच्या कार्याचा गौरव केला.यावेळी सत्कारमूर्ती यांनी सूर्यपुत्र भय्यासाहेब आंबेडकर व अनागारीक धम्मपाल यांच्या कार्याचा आढावा घेऊन विविध शाखेच्या वतीने भव्य सत्कार केल्याबद्दल आभार व्यक्त करत मला मिळालेला हा जीवनगौरव पुरस्कार हा माझा सन्मान नसून संस्थेच्या कार्याचा सन्मान असल्याचे प्रतिपादन केले. याप्रसंगी यश रामराव घुले व आदर्श साहेबराव वाढवे यांचा एम.बी.बी.एस.साठी निवड झाल्याबद्दल पालकांसह सत्कार करुन संस्थेच्या वतीने शुभांगी ठमके यांनी प्रत्येकी पाच-पाच हजार रुपये बक्षीस दिले.तसेच सुयश प्रशांत ठमकेचीही एम.बी.बी.एस.साठी निवड झाल्याबद्दल सत्कारमूर्तीचा सपत्नीक सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला.अध्यक्षियसमारोपात दादाराव कयापाक यांनी शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कार्य करणाऱ्या योग्य व्यक्तीची निवड करुन अभियंता प्रशांत ठमके यांना नांदेड येथे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केल्याबद्दल अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन नांदेड जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष महेंद्र नरवाडे यांनी केले तर वार्ड अध्यक्ष बंडू भाटशंकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.पंजाब शेरे,भारत कावळे, सुरेश पाटील, रमाकांत गायकवाड, प्रफुल डवरे,सतिश विणकरे,प्रवीण वाठोरे यांनी पुढाकार घेतला.यावेळी असंख्य उपासक उपासिका तसेच बौद्ध महासभेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...