Skip to main content

श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय दहेली येथे सेवानिवृत्त शिक्षकांचा निरोप समारंभ व सपत्नीक सत्कार

 



किनवट/ प्रतिनिधी: श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय दहेली येथे सेवानिवृत्त शिक्षक श्री एस.जी.जावळे व जी.आर. पोटफळे यांचा निरोप समारंभ व सपत्नीक सत्कार समारंभ कार्यक्रम घेण्यात आला.

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुनील पांडुरंग जोगी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्याध्यापक श्री पी आर वाडेकर, ( माजी मुख्याध्यापक), श्रीनिवास जाधव (तंटामुक्ती उपअध्यक्ष), आनंद भालेराव( संपादक किनवट टुडे न्यूज), शिवदास आप्पा लाटकर (सरपंच शेवडी), लक्ष्मण रामराव पोटफळे (भाजप जिल्हा उपाध्यक्ष नांदेड ग्रामीण), युसुफ पटेल (नगरसेवक नांदेड), नवनाथ शेळके (पंचायत समिती सदस्य लोहा), मोतीराम दरेगावे सावकार (सरपंच), शेख हुसेन मामू (सदस्य ग्रामपंचायत शेवडी), बालाजी मारोतराव पोटफळे ,विलासराव शिंदे भगवती, श्री गणेश सूर्यवंशी सर,  शिवाजी तूपकरी सर,कैलास डोळस सर,श्री भोपे सर, सर सौ.सुनिता भोपे, निलेश जावळे,शितल पोटफळे, श्री भालके सर, श्री राजेंद्र ठाकरे सर सिंदखेड,एम एस.जाधव सर,मंगेश परमेश्वर चव्हाण, धीरज मुळे, सौ दिपाली वाडकर, सुनिता शेंदलवार,सौ.  सविताताई शिवराज जावळे, शोभाताई  गंगाधर पोटफळे,सौ. स्नेहलता शितल पोटफळे,गिरीश पोटफळे,श्री शेटकर सर, भगत सर सारखणी आदि उपस्थित होते.

प्रथमतः मान्यवराच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

   तदनंतर श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय दहेली येथे सेवानिवृत्त शिक्षक श्री एस.जी.जावळे,व सौ.सविताताई शिवराज जावळे तसेच जी.आर. पोटफळे व सौ.शोभाताई  गंगाधर पोटफळे यांचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. दोघांनाही शाळेच्या वतीने कपडे रुपी आहेर देण्यात आले तसेच सर्व पाहुणे मंडळीचेही शाल श्रीफळ देऊन विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

   याप्रसंगी श्री जी आर पोटफळे यांनी शाळेला शाळेचे पहिले सचिव कै.टी एस माटाकर सर यांची प्रतिमा भेट म्हणून दिली.

याप्रसंगी श्री पी आर वाडेकर, आनंद भालेराव व श्री भोपे सर यांनी मनोगत व्यक्त केले

कार्यक्रमाचे सुरेख संचालन मधुसूदन पहुरकर यांनी केले.तर आभार प्रदर्शन सतीश राऊत यांनी केले.

  सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक सुनील जोगी शिक्षक श्री मधुसूदन पहुरकर, उल्हास राठोड, रामराव हुडेकर, सतीश राऊत, शेख सर, कैलास वाडकर, शिरगुरवार सर सुनील सराफ आदींनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...