Skip to main content

गरजवंत रुग्णांनी AIIMS नागपूर येथे वैद्यकीय कक्षाचा लाभ घ्यावा - अमन कुंडगीर



किनवट:-

मा.खा.पद्मश्री डॉ.विकास महात्मे सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून वैद्यकीय सहाय्यता सेलची स्थापना अमन कुंडगीर बनले आरोग्य दूत

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान नागपूर AIIMS मध्ये अल्पदरात उपचार

आजारग्रस्त रुग्णांनी वैद्यकीय सहाय्यता कक्षाचा लाभ घ्यावा, 47 क्रमांकाच्या कंट्रोल रुमवर चौकशी करावी - अमन कुंडगीर

नागपूर/किनवटः रुग्ण सेवा हीच ईश्‍वर सेवा हे ब्रीद मानुन अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर येथे मा.खा.पद्मश्री डॉ.विकास महात्मे सोशल फाऊंडेशनच्या वतीने गंभीर आजाराने ग्रस्त किंवा उपचारासाठी आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या असलेल्या रुग्णांसाठी वैद्यकीय सहाय्यता सेल स्थापन करण्यात आला आहे. ज्यामुळे गरीब व गरजू रुग्णांना याचा मोठा फायदा होत आहे. तरी गंभीर रुग्णांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य चे युवक प्रदेशाध्यक्ष अमन कुंडगीर यांनी केले आहे.

      अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान मध्ये आरोग्याच्या समस्या असलेल्या गंभीर स्वरुपाच्या रुग्णांच्या मदतीसाठी 47 क्रमांकाचे कंट्रोल रुम स्थापन करण्यात आले आहे. रुग्णांनी एम्स रुग्णालयात डॉक्टरांच्या तपासणी नंतर 47 क्रमांकाच्या कंट्रोल रुमवर जावून आजाराची माहिती द्यावी, त्यानंतर वैद्यकीय सहाय्यता सेल आपणास मदत करेल. गंभीर आजाराच्या आरोग्य सुविधा बीपीएल पिवळे रेशनकार्ड धारकांसाठी मोफत असून इतरांना अगदी कमी दरात आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्यामुळे रुग्ण मुंबई, पुणे, हैद्राबाद येथे अधिक पैसे खर्च न करता एम्स नागपूर येथे मा.खा.पद्मश्री डॉ.विकास महात्मे सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून कमी दरात आपला उपचार करुन घेवू शकतात. फाऊंडेशच्या माध्यमातून रुग्णांनी वैद्यकीय सुविधा मिळवून घेण्यासाठी वैद्यकीय सहाय्यता सेलचे महाराष्ट्र प्रमुख अमन कुंडगीर यांच्या 7588526670 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मा.खा.पद्मश्री डॉ.विकास महात्मे सोशल फाऊंडेशनमुळे अनेक रुग्ण एम्स नागपूर येथे जावून अल्पदरात आरोग्य सुविधा घेत आहे. फाऊंडेशनच्या माध्यमातून उपचार घेणार्‍या रुग्णांनी एम्सचे अध्यक्ष मा.खा.पद्मश्री विकास महात्मे व फाऊंडेशनचे आभार मानले आहे. 


आपल्या भागातील रुग्णांना आरोग्य सुविधा मिळाव्या यासाठी महाराष्ट्रातील धनगर समाज संघर्ष समितीच्या सर्व जिल्हाध्यक्ष व पदाधिकार्‍यांनी आपल्या भागातील रुग्णांची आरोग्य विषयक समस्या जाणून घेवून त्याची सविस्तर माहिती भरून रुग्णांना एम्स रुग्णालयात पाठवावे व त्यांच्या आरोग्य विषयक समस्या सोडवाव्या. जेणेकरून गंभीर रुग्णांना कमी पैशात उपचार करून घेता येईल. 


      माहूर तालुक्यातील आसोली येथील रुग्ण माधव हिरामण राठोड हे गंभीर असल्याने उपचारासाठी नागपूर येथे जाणे अत्यंत गरजेचे होते. त्यांनी युवक प्रदेशाध्यक्ष अमन कुंडगीर यांचेशी संपर्क केला असता त्यांनी केवळ एका फोनवर त्यांना तातडीची सुविधा उपलब्ध करून दिल्याने माधव राठोड यांनी त्यांचे आभार मानले.या कार्याचे आमदार भीमराव केरम व मा.नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी अभिनंदन व कौतुक केले.


     अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर येथे मा.खा.पद्मश्री विकास महात्मे सोशल फाऊंडेशनच्या वतीने वैद्यकीय सहाय्यता सेल स्थापनं करण्यात आल्याने याचा रुग्णांना लाभ होत असल्याने धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्यचे युवक प्रदेशाध्यक्ष अमन कुंडगीर यांनी AIIMS नागपूरचे अध्यक्ष मा.खा.पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांचे आभार मानले आहे. 


    वैद्यकीय सहाय्यता सेलच्या महाराष्ट्र प्रमुखपदी अमन कुंडगीर यांची नियुक्ती करण्यात आली असून सामाजिक कार्याची पावती म्हणून या माध्यमातून महाराष्ट्रातील रुग्णांच्या आजाराचे प्रश्‍न सोडवण्यासाठी व गरजु रुग्णांना मदत पुरवण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. आरोग्य विषयक कुठलीही समस्या असेल तर मा.खा.पद्मश्री डॉ.विकास महात्मे सोशल फाऊंडेशनच्या वैद्यकीय सहाय्यता सेलशी रुग्णांनी पत्रव्यवहार केल्यानंतर सहाय्यता प्रमुख मदत पुरविण्यासाठी मदत करतील. रुग्णांनी पत्रव्यवहार करुन आरोग्य सुविधा मिळवून घ्याव्यात.


मा.खा.पद्मश्री डॉ.विकास महात्मे सोशल फाऊंडेशनच्या कामाची पावती म्हणून केवळ माझ्या एका फोनवर अनेक रुग्णाला एम्स नागपूर येथे मदत मिळाली. फाऊंडेशनच्या माध्यमातून रुग्णसेवा करण्याची जी संधी मला मिळाली त्यामुळे मा.खा.पद्मश्री डॉ.विकास महात्मे यांचा खूप खूप आभारी आहे आणि यात सहकार्य करणारे राकेश पाटील आणि प्रशांत निवांत यांचेसह सर्व सहकार्‍यांचा मी आभारी आहे. 

-अमन कुंडगीर, महाराष्ट्र प्रमुख, मा.खा.पद्मश्री डॉ.विकास महात्मे सोशल फाऊंडेशन 

(AIIMS नागपूर) तथा युवक प्रदेशाध्यक्ष, धनगर समाज संघर्ष समिती, म.रा. 7588526670

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...