Skip to main content

आपली भाषा हि काळजात रुजणारी भाषा असते- प्रा. डॉ. तपन कुमार मिश्रा

 


नांदेड: प्रतिनिधी

श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित हिंदी विभाग यशवंत महाविद्यालय नांदेड येथे हिंदी दिवसाचे औचित्य साधून पंधरवाड्याचे आयोजन करण्यात आले होते.

ज्या मध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे कौशल्य दाखवले व सहभाग घेतला या पंधरवाडयाचा समारोप हिंदी दिवस व हिंदी साहित्य परिषदच्या उद्घाटनाने झाला.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे तथा उद्घाटक म्हणून सरस्वती विद्या मंदिर महाविद्यालय किनवटचे प्राध्यापक डॉ. तपन कुमार मिश्रा हे उपस्थित होते.



आपल्या उद्घाटनप्रसंगी त्यांनी भाषा उत्पत्ती पासून ते भाषा हि काळाजात रुजलेली भाषा आहे असे प्रतिपादन त्यांनी केले जी की सर्व भारताला जोडण्याच काम करते भारतीय परंपरा भाषा यांचा संयोग कसा आहे ते समजावून सांगितले तथा सर्वेश्वर दयाल सक्सेना यांची रचना जब भी भुख से लडने कोई खडा हो जाता है सुंदर दिखने लगता है! या कवितेने समारोप केला तर अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाचे उपप्राचार्या कविता सोनकांबळे यांनी महाराष्ट्रात हिंदी भाषा अधिक बोलल्या जाते अटल बिहारी वाजपेयी यांची कविता उम्र की ऐसी की तैसी या माध्यमातून हिंदी भाषेबद्दल प्रेम व्यक्त केले .

कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या तरंग या भितीपत्रकाद्वारे केली कु. कोमल कागदेवाड, पुनम अंबोरे, वैष्णवी मंदेवाड यांना स्वागत गीत सादर केले हिंदी विभाग अध्यक्ष प्रा.डॉ.संदीप पाईकराव हिंदी विभागात चालणाऱ्या  गतीविधी बद्दल माहिती दिली.

हिंदी साहित्य परिषद बद्दल डॉ.सुनिल जाधव यांनी माहिती दिली.

प्रमुख पाहुणे मान्यवरांचा परिचय डॉ. विद्या सावते यांनी करून दिला.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन साईनाथ शाहु यांनी केले तर सुत्र संचालन कु. रितुजा वाडवले कु. प्रीती जमदाडे यांनी केले तर काव्य पाठ कु. कोमल कागदेवाड, कु. शेख फिजा यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिंदी विभागाचे विद्यार्थी तथा महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी प्रयत्न केले या कार्यक्रमास असंख्य विद्यार्थी उपस्थिती होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...