किनवट तालुक्यातील सर्व मंडळात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करा-काँग्रेसचे सहाय्यक जिल्हाधिकारी यांना निवेदन
किनवट : किनवट तालुका क्षेत्रातील सर्व मंडळात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवाना तात्काळ ५० हजाराची आर्थिक मदत देण्यात यावी या मागणीचे निवेदन किनवट तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी यांना दि.०४ सप्टेंबर रोजी
येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात देण्यात आले. यावेळी काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष के. सूर्यकांत रेड्डी, किनवट शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष गिरीष नेम्मानीवार, माजी नगराध्यक्ष के. मूर्ती, अभय महाजन, सिराज जिवाणी, जव्वाद आलम, शेख इमरान शेख चांद, वसंत राठोड,
खालेद भाई, अनुप देशमुख, लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, गनीभाई खुरेशी, अंबादास वरगुडे, रवि देशमुख, स. जायद भाई आदींची उपस्थिती होती.
Comments
Post a Comment