सकाळ व मंथन इन्फ्रा केअर सयुंक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या सन्मान डॉक्टरांचा कार्यक्रमात डॉ. अशोक बेलखोडे यांचा सन्मान
किनवट. : डॉक्टर हे समाजाच्या अत्यंत महत्त्वाच्या घटकांपैकी एक आहेत, ज्यांचे योगदान अतुलनीय आहे. डॉक्टरांनी कोरोनाच्या भीतीदायक काळात आपल्या अथक प्रयत्नांनी समाजासाठी महत्वपूर्ण सेवा बजावली आहे. त्यांच्या या कार्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे. डॉक्टर म्हणजे समाजासाठी देवच आहेत, असेच म्हणावे लागेल, 'सकाळ'ने घेतलेल्या या अभिनव उपक्रमाचे मनःपूर्वक अभिनंदन करतो, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा सदस्य अशोक कहाण यांनी डॉक्टरांच्या कार्याचा गौरव केला, 'सकाळ' व मंथन इन्फ्रा केअर यांच्या संयुका विद्यमाने शनिवारी (ता. ३१) नदिडमध्ये डॉक्टरांचा सन्मान सोहळा पार पडला यात अनेक डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला या मध्ये किनवटचे सानेगुरूजी हॉस्पीटलचे सर्वेसर्वा तथा समाजसेवक किनवट सारख्या दुर्गम आदिवासी भागात आरोग्यसेवा विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविणारे पेशाने सर्जन असणारे डॉ. अशोक बेलखोडे यांचा सन्मान नांदेड येथे झाला या बद्दल किनवट येथील अनेक मान्यवर , सामाजिक संस्था , राजकीय मंडळी , डॉक्टर असोसिएशन प्रा.डॉ. सुनिल व्यवहारे, प्रा.डॉ. पंजाब शेरे, ॲड. मिलिंद सर्पे, अभियंता प्रशांत ठमके, माजी नगराध्यक्ष इसाखान सरदार खान, माजी नगराध्यक्ष, के. मुर्ती, प्रा. दगडु भरकड, ॲड विलास सुर्यवंशी, नाम फाँऊडेशन संस्था पदाधिकारी, भारत जोडो युवा अकादमी, नेहरु युवा केंद्र, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी , पत्रकार डॉक्टर संघटना, तथा अनेक मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment