Skip to main content

Posts

Showing posts from January, 2023

किनवट स्वच्छ व अतिक्रमणमुक्त करण्याचा डॉ. मृणाल जाधव यांचा मानस ३४ किलो प्लास्टिक जप्त; तहसिलदार यांच्या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरवात

किनवट:- प्लास्टिक बंदीसंदर्भात येथीलपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. मृणाल जाधव यांच्या आदेशानुसार किनवट शहरात बेकायदेशीररित्या प्लास्टिक व थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांविरूध्द पालिकेच्या प्लास्टिक बंदी पथकाने येथील आठवडी बाजारात अचानक धडक कार्यवाही केली. भाजी मंडई व परिसरातील सुमारे १५० ते २०० आस्थापनांची तपासणी करून आक्षेपार्ह आढळलेले ३४ किलो प्लास्टिक जप्त केले. तसेच यापुढे सिंगल युज प्लास्टिक चा वापर न करण्याची सक्त ताकीद देऊन, पुढे आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले. महाराष्ट्र प्लास्टिक पिशव्यांचे (कॅरीबॅग्ज उत्पादन व वापर) नियम, २००६ द्वारे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणूनदेखील या कचर्याच्या वाढत्या प्रमाणामुळे पर्यावरणावर व आरोग्यावर होणारे नुकसान वाढतच १२ बाय ८ इंचापेक्षा कमी असणार नाही, याची दक्षता घ्यावी, तसेच प्रत्येक प्लास्टिकच्या पिशवीच्या वेष्टनावर माहिती टाकावी, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे. आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे व विल्हेवाटीमुळे विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत. ज्यामध्ये अविघटनश

मांडवी पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड 4700 रुपयाच्या मुद्देमाल जप्त.

  मांडवी प्रतिनिधी   मांडवी पोलीस ठाणे अंतर्गत पिंपळगाव फाटा येथील पेट्रोल पंपाच्या मागे शेतामध्ये झन्ना मुन्ना या नावाचा जुगार घेत असताना सहा व्यक्तीं वर कारवाई करण्यात आली.  पिंपळगाव फाटा येथे दिनांक 13.1.2023 पेट्रोल पंपाच्या पाठीमागे तुकाराम  गुरणुले यांच्या शेता लगत कोरड्या नाल्यावर आरोपी पत्त्यावर पैसे लावून  झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना मांडवी पोलिसांनी  त्याच्यावर धाड टाकून कारवाई केली यावेळी मुद्देमालासह आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला.   यावेळी एकूण सहा व्यक्तीवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कायद्याप्रमाणे  कलाम 12 (अ)  प्रमाणे कारवाई करण्यात आली आरोपीचे नाव. पुढीलप्रमाणे--- 1)श्री. उष्णना पी.  आसन्न  इंदुरी वय 40 वर्षे व्यवसाय पेंटर रा. भीमसरी ता. जि. आदिलाबाद                 2) गुलाब रूपचंद लसनकार वय 50 वर्षे व्यवसाय शेतमजुरी रा. रामपूर ता. जिल्हा आदिलाबाद 3) मोहन निवृत्ती सूर्यवंशी वय 44 वर्ष व्यावसाय शेती राहणार खुशीत नगर ता.जि. आदीलाबाद.4) इंद्रसेन गंगाराम मडावी राहणार तलाईगुडा ता. किनवट जि.नांदेड वय 35 वर्ष व्यावसाय शेती   ता. किनवट जि.ना

" ईतर व्यक्तींनी बेकायदेशीर रित्या कब्जा केलेली शेतजमीन कशी मिळवाल परत" सल्ला कायद्याचा वुईथ अॅड विलास सुर्यवंशी

सल्ला कायद्याचा वुईथ अॅड विलास सुर्यवंशी  माझ्या महाराष्ट्रातील तमाम बंधू आणि भगिनींनो आज आपण नवीन एक विषय घेऊन आलो आहोत ज्यामुळे एक नवीन कायदेशीर विषय समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था तसेच येणाऱ्या पिढीला वर्तमान परिस्थितीपेक्षा आनंदमयी परिस्थिती निर्माण होण्यासाठी व तसेच सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी सदर लेखाची मदत झाल्यास लेखकाचा खारीचा वाटा असेल असे समजण्यात यावे. मित्रांनो मानव जेव्हा नैसर्गिक अवस्थेमध्ये होता तेव्हा तो "ग्रुप" प्रमाणे राहत होता अनेक ग्रुप या पृथ्वीतलावर होते त्या टोळ्यात एकमेकांमध्ये लढाया होत होत्या त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात मानवी नरसंहार होत होता त्यामुळे या टोळ्यांनी अंतर्गत कराराने टोळी "प्रमुख" निवड केला त्याला म्हणजे प्रत्येक टोळीला "गण" असे समजल्या जात होते व टोळीप्रमुखाला "गणपती" असे म्हणत होते नंतर या गणाच्या प्रमुखांनी आपापसामध्ये सामाजिक करार करून "राज्यसंस्थेची" निर्मिती केली राज्यसंस्थेने मग हळूहळू कायदा व सुव्यवस्थेचे राज्य आणण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नांमधून आर्थिक व्यवस्थेला विकासात्मक दर्जा दे

बोथ ते श्री क्षेत्र माहुर दत्त शिखर पदयात्रेचे कमठाला येथे स्वागत

किनवट ता. प्र. मारोती देवकते श्री प.पु. आदरणीय महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या कृपाशीर्वादाने तसेच श्री प.पु. मनोहर गिरी महाराज यांच्या मार्गर्शनाखाली सतत 31 वर्षा पासून चालत असलेली श्री क्षेत्र दत्त मंदिर बाजारहतनूर ता. बोथ जि. आदिलाबद ते श्री क्षेत्र दत्त शिखर माहूरगड  पदयात्रा. बाजार हतनूर येथून निघून मुक्काम दर मुक्काम करत पालखी श्री क्षेत्र माहूरगड येथे जात आसताना. आज सकाळी कमठाला गावामध्ये समस्त गावकऱ्यांच्या हस्ते पालखीची पूजा व स्वागत करून सकाळ चा नाष्टा देण्यात आला. दुपारचे जेवण कमठाला क्यांप येथे देऊन सायंकाळ चा मुक्काम व जेवण रोहिदास तांडा येथे करण्यात आला त्या प्रसंगी पालखी सोबत श्री कृष्ण कथा व दातात्रय चरित्र कथेचे आयोजन केलेले आसता. सायंकाळी 8 वाजता श्री दत्ता महाराज पुरी व त्यांचे सहकारी शिंथ वादक बालाजी महाराज गरड, तसेच तबला वादक म्हणून सुंदर आशि श्री कृष्ण कथा, दातात्रय चरित्र कथा करण्यात आली पालखी चे व्यवस्थापक - श्री राजु महाराज गिरी, तसेच सोबत  बालाजी महाराज गिरी, अविनाश महाराज गिरी, यांची उपस्थिती राहून पालखी चा शेवट मुक्काम दिनांक १८/०१/२०२३ ला होणार आशि माहिती

किनवटच्या बाजारात उसाला चांगला भाव

  ✍🏿 वृतांकन :राजेश पाटील  ता. प्रतिनिधी किनवट:- सध्या मकार संक्रात सणामुळे किनवट बाजार विविध वाण, मातीची भांडी वस्तु गांजर बोर पेरु गुळ हलवा अशा विविध सामान विक्रीला आले आहे व महीलांची  गर्दी वाढली आहे तसेच उसाची आवक सुद्धा बाजारात वाढली आहे उमरखेड व मारेगाव येथील उस मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहे प्रती उस पंचवीस रुपये दराने विकल्या जात आहे तर तीन उस ५० रुपये प्रमाणे विकल्या जात आहे यामुळे उस विक्रेता शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत खालचे मारेगाव येथील शेतकरी अनिल मुखेडकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की उस दोन प्रकारचे आहेत काळा उस व लाल उस लाल उस हा जास्त गोड असतो व त्याचा भाव जास्त आहे म्हणजे वीस रुपये प्रति एक पडतो  उसाला यंदा चांगला भाव मिळत आहे तसेच उसाचे सिजन नसेल तर उसासाठी साखर कारखाना जवळपास नाही परंतु आम्ही सारा उस उसाच्या रसवंती दुकानदारांना सप्लाय करतो त्यामुळे उसाच्या कारखाण्याची चिंता आता मिटली आहे अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे यामुळे बाजार गर्दीने फुलून गेला आहे .

अनिकेत सुरेश कयापाक ( मुन्ना) या युवकाच्या अचानक जाण्याने घोटी परीसरात हळहळ

  ता. प्र. किनवट:- घोटी येथील अनिकेत उर्फे मुन्ना सुरेश कयापाक २५ वर्षीय तरुणाच्या  अचानक निधनाने घोटी परीसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे व सर्व समाज बांधवात मित्र मंडळीत शोककळा पसरली आहे. त्याचा अंत्यविधी दि.१४ रोजी घोटी येथील बिरसा मुंडा नगर स्मशानभुमित करण्यात आला या वेळी अनेक समाज बांधव वरिष्ठ नेते , पत्रकार  आदी उपस्थित होते .  त्याच्या पश्चात आई, वडील , बहीण व चुलते आहेत 

अनिता कृष्णा भंडारे यांना हिंदी विषयात ( पिएचडी )विद्यावाचस्पती पदवी प्रदान

  किनवट तालुका प्रतिनिधी:- किनवट येथील अनिता कृष्णा भंडारे यांना स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाकडून विद्या वाचस्पती/ पीएचडी प्रदान करण्यात आली. 'हिंदी दलित उपन्यासकार मोहनदास नैमिशराय के उपन्यासों मे विद्रोह' हा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयाचे प्रा. डॉ. सुजितसिंह परिहार यांच्या मार्गदर्शनाखाली हा शोधनिबंध पुर्ण करण्यात आला. या शोधनिबंधासाठी सरस्वती विद्या मंदीर कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भंडारे, प्रा. डॉ. सुनिल व्यवहारे, प्रा. तपनकुमार मिश्रा, प्रा. डॉ. इबतवार, प्रा. डॉ. काळे, प्रा. डॉ. खातुन पठाण, शैलेंद्र वाघमारे, दिशा वाघमारे, आकाश बोलेनवार यांनी सहकार्य केले. या यशाबद्दल  नातेवाईक, मित्र परिवार यांनी अभिनंदन करुन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अनिता भंडारे 

अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर झालेच पाहिजे अन्यथा खांद्यावरची घोंगडी खाली ठेवून हातातील काठी घेऊन रस्त्यावर येण्यास भाग पाडू नका-अमन कुंडगीर

किनवट/प्रतिनिधीः राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर या भारत देशाच्या प्रेरणास्थान आहेत. मोघल, निजामशाहीत व हिंदू संस्कृतीवर होणार्‍या हल्ल्यावर त्यांनी लगाम लावला होता. हिंदू संस्कृतीत त्यांनी प्राण फुंकले, त्यांनी अनेक घाट बांधले, बारव बांधले, मंदिरे बांधली, मंदिराचे पुर्ननिर्माण केले. स्त्रियांना सन्मान मिळवून दिला. अशा थोर राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव अहमदनगर जिल्ह्याला देण्यात यावे, अन्यथा खांद्यावरची घोंगडी खाली ठेवून हातातील काठी घेवून रस्त्यावर उतरण्यास भाग पाडू नका, असा इशारा धनगर समाज संघर्ष समितीचे सोशल मिडया प्रदेशाध्यक्ष अमन कुंडगीर यांनी दिला.       अहमदनगर जिल्ह्याला राजमाता पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यात येण्याची घोषणा महाराष्ट्र सरकारने केलेली आहे. मा.खा.डॉ.विकास महात्मे, आ.गोपीचंद पडळकर यांच्या माध्यमातून शिंदे सरकारने लवकरच नामांतर करू अशी घोषणा केली आहे. परंतु काही विघ्नसंतोषी लोक अडथळा निर्माण करीत आहेत. येणार्‍या काळात या मागण्या पूर्ण न झाल्यास सर्व समाज बांधवांना सोबत घेवून मोठे जनआंदोलन उभे करणार असल्याचे अमन कुंडगीर यांनी

अण् नामांतरा साठी आमचाही ९० किलो मिटर अंतराचा रात्रीचा सायकल मार्च...! डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा नामविस्तार दिनानिमित्त ॲड. मिलींद सर्पे यांचा विशेष लेख

     मराठवाडा विद्यापीठाला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे नांव द्यावे ,अशी चळवळ "दलित पॅंथर',या संघटनेकडून मराठवाड्यात सुरु झालेली होती.तो काळ होता १९७७ चा. मी तेंव्हा होतो सातवीत.प्रा.धन्वे सरांनी  मला शिशु दलित पॅंथरचा अध्यक्ष केले होते.२७ जुलै १९७८ ला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा  ठराव एकमताने मंजूर झाला खरा परंतु , त्या नंतर २७ जुलै च्या  रात्रीपासून मराठवाड्यातील दलित समाजावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार सुरु झाले.मराठवाड्यातील दलित वस्त्या १५ दिवस जळत होत्या . मराठवाडा ठप्प झाला होता.नामांतराची अंमलबजावणी झाली नाही.पुढे चालून १४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर न होता नामविस्तार झाले, "डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद."     नामांतर चळवळीचा मोठा इतिहास आहे.या चळवळीत माझा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत दादाराव कयापाक,सुरेश गायकवाड,मनोहर भगत,सुखदेव मुनेश्वर यांच्या नेतृत्वाखाली माझा सहभाग होता.तो खारीचा असलातरी फारच स्फुर्तिदायक होता , असे मला आजही वाटते.  नामांतराचा लढा सुरू झाला तेंव्हा मी सातवीत होतो.वय

किनवट मध्ये पेटल्या थंडीच्या शेकोट्या डोंगराळ भागात बर्फवृष्टी झाल्याने वाढली हुडहुडी

   (किनवट ता. प्र.)  महाराष्ट्रात उत्तरेकडील अनेक राज्यांत सध्या थंडीची लाट आहे. राजस्थान, हरियाणा, चंडीगड, पंजाब, दिल्ली आदी राज्यांतील मैदानी भागातील तापमानात सरासरीच्या तुलनेत मोठी घट दिसते आहे. उत्तर व पश्चिम भारतात अनेक डोंगराळ भागात बर्फवृष्टी झाल्याने महाराष्ट्र व मराठवाड्यात थंडीची तीव्रता वाढली आहे याचाच परिणाम किनवट- माहुर तालुक्यात बघावयास मिळत आहे म्हणुन जागो जागी सांयकाळी लोक शेकोट्याचा आधार घेऊन थंडी पासुन बचाव करत आहेत तर हिच थंडी शेतकी पिकांसाठी चांगली असुन त्यामुळे पालेभाज्या व फळे यांची आवक वाढली आहे असे किनवट जवळील गाव  खरबी येथील   प्रगत शेतकरी राजु पांडे व घोटी येथील शेतकरी  सचिन मगर  यांनी प्रतिक्रिया दिली आहे .

टिपु सुलतान ब्रिगेड किनवट शाखे तर्फे राजेश पाटील यांचा वाढदिवस साजरा

  ता. प्र. किनवट:- फुले शाहू आंबेडकर चळवळ व पुरोगामी विचार सरणीचे पत्रकार, कवि  साहीत्यीक NGO राजेश पाटील यांचा वाढदिवस अशोक स्तंभ , बिरसा मुंडा पुतळ्या जवळ टिपु सुलतान ब्रिगेड शाखा किनवटच्या वतीने तथागत गौतम बुद्धांची प्रतीमा भेट देऊन व केक कापून साजरा करण्यात आला या वेळी टिपु सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हाध्यक्ष सय्यद नदीम ,शेख , जुबेर टिपू सुलतान ब्रिगेड उपाध्यक्ष शेहबाझ खान , शेख साहिल, शेख अशपाक , शेख अमन ,शेख इरफान , शेख इसाक, शेख खरुद्दीन महबुब खान आणि बजाज फायनान्स ब्राँचचे गोल्ड लोन मॅनेजर गजानन बावने व   टिपू सुलतान ब्रिगेडचे पदाधिकारी उपस्थित होते.

खासदार हेमंत पाटील जनसंपर्क कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

  किनवट तालुका प्रतिनिधी:- दि.१२ जानेवारी, माननीय खासदार श्री हेमंतभाऊ पाटील साहेब यांचे किनवट जनसंपर्क कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आद्यगुरू राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब व युवकांचे प्रेरणास्थान  स्वामी विवेकानंद यांच्या जयंती तथा युवादिन निमित्त प्रतिमांचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यांत आले.  यावेळी तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे, शहर प्रमुख सुरज सातुरवार, दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड, संजय मुरगुलवार, सुरेश घुमडवार, रवी नेमानिवार, हनवंता मुकाडे, अश्विन राठोड, अशोक जाधव,भारत राठोड, अनिल भोयर, अरविंद कदम, ओमप्रकाश नरवाडे,सुरेश साकपेल्लीवार, ज्ञानेश्वर पेंढारे, अमोल सोमवंशी,किरण येरमे, जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड आदी उपस्थित होते.

दै. सकाळचे प्रतिनिधी अॅड.मिलिंद सर्पे यांना उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

 ✍🏿(राजेश पाटील) किनवट ,ता.१२(बातमीदार): कै. दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा वसंतराव नाईक हरीत क्रांती जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार दैनिक "सकाळ",चे तालुका  बातमीदार अॅड.मिलिंद सर्पे यांना  जाहीर झाला आहे. कंधार येथे नुकतेच या पुरस्काराची घोषणा करण्यात आली. हिंदवी बाणा लाईव्हच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून दरवर्षी कै. दुर्गादास सराफ पत्रकार प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकारितेत उत्कृष्ट योगदान देणाऱ्या पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव केला जातो. गेल्या ३६ वर्षापासून जिल्ह्यातील दलित, आदिवासी ,शोषित, वंचित, पिडीत, कामगार, शेतकरी, शेतमजुरांच्या न्याय्य हक्कांसाठी, त्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी पत्रकारितेत आपली लेखणी झिजविणाऱ्या मिलिंद सर्पे यांना यावर्षीचा वसंतराव नाईक हरीत क्रांती ग्रामविकास जिल्हास्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. यापूर्वीही सर्पे यांना भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्राचा जिल्हा युवा गौरव  यासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.त्यांनी सन १९९०-९१ मध्ये तत्कालीन मराठवाडा विद्यापीठातून बी.जे.ही पदव्

नगरपरिषदेस पुर्णवेळ मुख्याधिकारी नियुक्त करा! सहाय्यक जिल्हाधिकारी यांना प्रे. सं. व प. से. सं. चे निवेदन

  किनवट ता.प्रतिनिधी: नगरपरिषद कार्यालय किनवट तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी आशा आशयाचे निवेदन प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ तालुका किनवट च्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब (नगरपरिषद प्रशासन विभाग जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड) यांना सहाय्यक जिल्हाधिकारी, उपविभागीय कार्यालय किनवट तर्फे निवेदन सादर करण्यात आले. किनवट येथील नगर परिषदेचे मुख्य अधिकारी हे पद मागील दोन वर्षापासून रिक्त असून सध्या हे पद प्रभारी मुख्याधिकारी म्हणून  तहसीलदार किनवट यांच्याकडे पदभार सोपविला आहे. त्यामुळे एकच अधिकारी यांच्याकडे दोन दोन पदे सांभाळणे प्रशासकीय कार्य भाराचा व्याप लक्षात घेता ते शक्य नाही.    तसेच लवकरच नगरपरिषद किनवट ची सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असल्याचे समजते त्यामुळे नगरपरिषद किनवट येथे पूर्ण वेळ व कायमस्वरूपी मुख्याधिकारी यांची आवश्यकता आहे. या बाबीची गांभीर्याने दखल घेऊन किनवट नगरपरिषद कार्यालयास पूर्ण वेळ व कायमस्वरूपी मुख्याधिकारी याची नियुक्ती करण्यात यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.    या प्रसंगी प्रेस संपादक व

आमदार साहेब जरा आमची व्यथा पण ऐकुण घ्या हो.... गेल्या ७० वर्षा पासून मांजरीमाथा गावास रस्ताच नाही

  ता.प्र, किनवट : किनवट तालुक्यापासून जवळच असलेल्या  जलधरा ग्रामपंचायत गणापासुन ३कि.मी. अंतरावर वसलेले मांजरीमाथा हे गाव गेली ७० वर्षापासुन नरक यातना भोगत आहे या गावाला  ये-जा करण्याकरीता कुठल्याही प्रकारचा पक्का रस्ता अद्याप बांधण्यात आलेला नाही या गावची लोकसंख्या ४५० ते ५००पर्यंत असुन येथे सर्व वस्त्या घरे हे बहुतांश आदीवासी बहुल समाजाची आहेत मांजरी माथा हे गाव माळरानात वसलेल आहे परंतु ये-जा करण्याकरीता गावक-यांना पायी चालावे लागते पक्का रस्ता नसल्याने पुराच्या पाण्यातून जिवावर उदार होऊन मार्ग काढावा लागतो तसेच  गर्भवती महीला, वयोवृद्ध ,शालेय विद्यार्थी यांना खुप संकटाचा सामना करावा लागतो आज पर्यंत २० ते २५ लोक या रस्त्या अभावी मृत्युमुखी पडले आहेत वयोवृद्ध लोक तर यांना अती प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आहे. या रस्त्याच्या कामाकरीता लोकप्रतिनिधी ,राज्य शासन- प्रशासन व संबधीत बांधकाम विभाग  अनेक वेळा निवेदने, देण्यात आली परंतु यांच्या या गंभीर समस्येकडे कोणताही प्रतीनीधी ना कोणता अधिकारी फीरकला नाही यामुळे नागरीक नाईलाजास्तव अमरण उपोषणाच्या पवित्र्यात आहे तात्काळ गावातील गावक-यांच्या

शेती मालावरील वायदेबंदी न उठवील्यास २३ जानेवारी २०२२ पासून सेबीच्या कार्यालया समोर बेमुदत आंदोलन

  नांदेड प्रतिनिधी:-०९ जाने शेतीमालावरील वायदेबंदी न उठवील्यास मुंबई येथील सेबीच्या कार्यालया समोर आंदोलनात संपुर्ण नांदेड जिल्ह्यातील शेतकरी संघटना सहभागी होतील अशा आशयाचे निवेदन पत्र मा. पंतप्रधान भारत सरकार दिल्ली यांना मा.नांदेड जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्या मार्फत देण्यात येत आहे . सविस्तर वृत असे कि २० डिसेंबर २०२२ रोजी  सरकार द्वारे एक आदेश काढण्यात आला तो शेतकरी, व्यापारी , उद्योजक यांच्यावर अन्यायकारक व नुकसान कारक आहे म्हणुन स्वंतत्र भारत पार्टीच्या वतीने नांदेड जिल्हाधिकरी कार्यालया समोर बेमुदत उपोषण सुरु आहे हा आदेश शेतकऱ्यांच्या हिताचा नाही तो मारक आहे असे शेतकरी संघटना व स्वतंत्र भारत पार्टीच्या वतीने कळवण्यात आले . सदरील निवेदनावर गुणवंत पा. हंगरेकर ( माजी प्रदेशाध्यक्ष शेतकरी संघटना), अॅड धोंडीबा पवार जिल्हाध्यक्ष स्वंतत्र भारत पार्टी), शिवाजीराव शिंदे ( शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष) आर. पी. कदम( उपाध्यक्ष शेतकरी संघटना), माधव शिंदीकर उपाध्यक्ष स्व. भा. पा.), व्यंकटराव वडजे, विठ्ठलरेड्डी पुल्लागोर, लिंगोजी शिंदे, शिवराज शिंदे, मोहन गुडमलवार, अभी. नरसा रेड्डी याल्ला

तालुका क्रिडा अधिकारी गुरुदीप संधु यांना सेवापूर्तीसाठी निरोप

  ता. प्र. किनवट:- किनवट येथे प्रदिर्घ सेवेतुन संधु सरांचा सेवापुर्ती सोहळा घेण्यात आला.श्री स.गुरुदीपसिंघ प्रेमसिंघ संधु हे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातुर येथे 1992 साली क्रीडा आधिकारी म्हणुन रुजु झाले होते येथुन आपल्या सेवेला सुरुवात केली होती तर ते सध्या जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालय नांदेड मध्ये किनवट तालुका क्रीडा अधिकारी म्हणुन किनवटला कार्यरत होते आणि त्यांची आपली एकुन 32 वर्ष सेवा दिली .ते प्रदिर्घ सेवेतुन.31 डिसेंबर 2022 रोजी निवृत झाले.त्यांचा किनवट क्रीडा समिती किनवट आयोजित  दि.08 जानेवारी 2023 वार रविवार सकाळी 11:30 वा.  क्रीडा संकुल इंनडोर हाॅल किनवट येथे घेण्यात आला.क्रार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मुकुंद तिरमनवार हे होते तर प्रमुख पाहुने श्री.हैदर शेख सर ..प्रमुख उपस्थिती श्री.तांदळे प्रेम सर(क्रीडा संयोजक ,किनवट), काँग्रेस सरचिटणिस श्री गिरीष नेम्मानीवार ( राष्ट्राय खेळाडु व्हालीबाॅली) श्री.पठाण जुम्माखाँ , श्री.संदीप इसाई सर,श्री,रामराव राठोड सर तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आर जी राठोड सरांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन श्री .संतोष मुंढे सर,श्री .सय्यद फराहन सर,श्री संद

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्रभर पत्रकार दिन साजरा

  संघटनेच्या वतीने राबविले विविध उपक्रम मुंबई : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने दिनांक ६ जानेवारी २०२२ रोजी संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रभर विविध उपक्रम राबविण्यात आले. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ माणगाव तालुका शाखेच्या वतीने माणगावचे प्रांत अधिकारी उमेश बिरारी, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. पगारे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच माणगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, कोकण युवा अध्यक्ष अनंत खराडे, कार्याध्यक्ष सागर पवार, रायगड जिल्हा संघटक प्रसाद गोरेगावकर, जिल्हा सल्लागार ॲड परेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष रिजवान मुकादम, माणगाव तालुका अध्यक्ष सचिन पवार, कार्याध्यक्ष, मंगेश पवार, उपाध्यक्ष मंगेश मेस्त्री, सचिव रवींद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नांदेड तालुका किनवटच्या वती

किनवट येथे दर्पण दिन साजरा

निवासी मुकबधीर विद्यालयात विद्यार्थ्यांना वही पेन खाऊ वाटप करण्यात आला - प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा उपक्रम किनवट तालुका प्रतिनिधी :  प्रगत महाराष्ट्र मंडळ संचालित मूकबधिर निवासी मूकबधिर विद्यालय अय्यप्पा नगर किनवट येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने राष्ट्रीय पत्रकार दिनानिमित्त मूकबधिर विद्यार्थ्यांना वही पेन व खाऊचे वाटप करण्यात आले.  प्रथमतः आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिनंदन करण्यात आले . तदनंतर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना  वही, पेन व खाऊचे वाटप पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष मा.डी.टी.आंबेगावे ,जिल्हाध्यक्ष मा. संजीव कुमार गायकवाड व मराठवाडा संपर्कप्रमुख आनंद भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष नसीर तगाले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे  नागनाथ भालेराव, सहशिक्षक विठ्ठल वडजे, तालुका कार्याध्यक्ष सय्यद नदीम, ता.सचिव राजेश पाटील,तालुका उपाध्यक्ष गंगाधर कदम, युवा तालुका अध्यक्ष प्रणय कोवे, युवा सचि

डी टी आंबेगावे आदर्श पत्रकार प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मानित!

  मुंबई : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे यांना आदर्श पत्रकार प्रेरणा गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार कै. बसवंत नागू शिंगाडे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्यासाठी राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल ॲवार्ड २०२३ चा आदर्श पत्रकार प्रेरणा गौरव पुरस्कार डी. टी. आंबेगावे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. विक्रम शिंगाडे, डॉ सुमित्रा पाटील, प्रकाश कदम, दत्तकुमार पाटील, सुप्रिया पाटील, नितीन शिंदे, आदी मान्यवर उपस्थित होते. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात पत्रकारिता, शैक्षणिक, सामाजिक व आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करीत असल्याची दखल घेऊन आदर्श पत्रकार प्रेरणा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यापूर्वी डी टी आंबेगावे यांना राष्ट्रीय, राज्य, विभागीय अशा विविध पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराबद्दल प्रेस संपादक

किनवट येथे भारताच्या प्रथम महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती साजरी.

किनवट,ता.३(बातमीदार): क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती आज (ता.३) सकाळी ११ वाजता उत्साहात साजरी करण्यात आली.जयंती सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम बसस्थानका जवळील फुले दांपत्याच्या पुतळ्याजवळ संपन्न झाला.यावेळी आमदार भीमराव केराम, जोतिबा खराटे, श्रीनिवास नेम्मानिवार, प्रशांत ठमके,के.मुर्ती, मारोती सुंकलवाड,पी.एस.आय.घुले,विनोद भरणे व कु.परेकार यांची समयोचित्त भाषणे झालीत.सूत्रसंचालन तुळशीराम पेटकुले यांनी केले,तर आभार प्रदर्शन राहुल वाढे यांनी केले.   यावेळी सुनिल बेहरे, संदिप पेटकुले, तुळशीराम वाडगुरे,राज पेटकुले,संजय गुरनुले, विकास वाढई , घनशाम पेटकुले, सुनिल खामकर, गणेश वाढई,बाळू परेकार,अक्षय वाढई ,अॅड.मिलिंद सर्पे,शेख अफरोज,मधुकर पाटील,शंकर नगराळे,गौतम पाटील, स्वप्नील वाढई , सुनील पाटील,शुभम शेंद्रे,राहुल शेंद्रे,शेषेराव पेटकूले ,बबन वानखेडे,नरेश सिरमनवार,राजेश पाटील, सम्राट कावळे, माधव कावळे,भीमराव दारवंडे,शुभम पाटील,प्रशांत ना.ठमके,विनोद सी.भरणे,सुगत नगराळे, डॉ.आनंद भालेराव,सुनंदा भालेराव यांच्यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.

चार जानेवारीला महावितरण अधिकारी, कर्मचारी संपावर जाणार महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी, अभियंता संघर्ष समितीने दिले पुकार....

  माहूर - ( तालुका प्रतिनिधी चव्हाण ) महावितरण खासगीकरणाच्या विरोधात महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी,अभियंता संघर्ष समितीने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. महावितरण कंपनीच्या अधिपत्याखालील क्षेत्राचे खासगीकरण करण्याचा घाट राज्य शासनाच्या असल्याने या विरोधात महावितरणचे अधिकारी कर्मचारी, अभियंता आक्रमक झाले आहेत. या खासगीकरणाच्या विरोध करण्यासाठी ४ जानेवारीला राज्यभर कर्मचारी ,अधिकारी व अभियंता ७२ तास कामबंद आंदोलन करणार आहेत. यापूर्वी महाराष्ट्रभर द्वार सभा व निदर्शने करण्यात आली होती. नुकताच नागपूर विधान भवनावर मोर्चा काढून सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदविला. आता संघर्ष समितीने ४ जानेवारीला संपावर जाण्याचे ठरविले आहे. हा संप वीज ग्राहकांविरोधात नसून खासगीकरना विरोधात आल्याचे महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी,अभियंता संघर्ष समितीने सांगितले आहे.

घोटी येथे भिमा कोरेगाव शोर्यदिन उत्साहात, प्रबोधन गितांचा कार्यक्रमास रसीकांची दाद

किनवट तालुका प्रतिनिधी :-  भारतीय बौद्ध महासभा शाखा किनवटच्या वतीने मौजे घोटी येथे भिमा कोरेगाव शौर्य दिना निमित अभिवादनाचा व व्याख्यान , प्रबोधन गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके यांच्या हस्ते भिमा कोरेगावचे योद्धे सिद्धनाक यांच्या प्रतीमेची पुष्पचक्र अर्पण करून तसेच पंचशिल, निळा ध्वजाचे  ध्वजारोहण करण्यात आली . यावेळी भिमा कोरेगाव विजय स्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आली होती.  सावित्रीबाई फुले मंचच्या अध्यक्षा शुभांगी ठमके , घोटीच्या सरपंच निर्मला मेश्राम, यांनी महामानवाला अभिवादन केले . तसेच समता सैनिक दलाचे राहुल उमरे व समता सैनिक दलाचे भिम सैनिक यांनी परेड करून सलामी दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले तर आभार घोटीचे उपसरपंच यांनी मानले . मंचावर वामनदादा कर्डक अकादमीचे प्रा. सुरेश पाटील , मंगला कावळे, रुपेश मुनेश्वर , कामराज माडपेल्लीवार, नरेंद्र दोराटे,यांनी अभिवादन गिते शौर्य गिते, भिमबुद्ध गीते सादर केली त्यांना वाद्यसाथ प्रज्ञाचक्षु गायक अनिल उमरे, प्रकाश सोनवणे, दिनेश झगडे, विशाल , राहुल तामगाडगे, प्र