Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने महाराष्ट्रभर पत्रकार दिन साजरा

 


संघटनेच्या वतीने राबविले विविध उपक्रम

मुंबई : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने दिनांक ६ जानेवारी २०२२ रोजी संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या पत्रकार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रभर विविध उपक्रम राबविण्यात आले.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ माणगाव तालुका शाखेच्या वतीने माणगावचे प्रांत अधिकारी उमेश बिरारी, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील व उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. पगारे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच माणगाव तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. याप्रसंगी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे, कोकण अध्यक्ष जयप्रकाश पवार, कोकण युवा अध्यक्ष अनंत खराडे, कार्याध्यक्ष सागर पवार, रायगड जिल्हा संघटक प्रसाद गोरेगावकर, जिल्हा सल्लागार ॲड परेश जाधव, जिल्हा उपाध्यक्ष रिजवान मुकादम, माणगाव तालुका अध्यक्ष सचिन पवार, कार्याध्यक्ष, मंगेश पवार, उपाध्यक्ष मंगेश मेस्त्री, सचिव रवींद्र जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, नांदेड तालुका किनवटच्या वतीने मूकबधीर विद्यार्थ्यांना वही, पेन व खाऊचे वाटप करण्यात आले.



 मराठवाडा संपर्कप्रमुख आनंद भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुकाध्यक्ष नसीर तगाले यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार दिन पार पडला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते नागनाथ भालेराव, सहशिक्षक विठ्ठल वडजे, तालुका कार्याध्यक्ष सय्यद नदीम, सचिव राजेश पाटील, उपाध्यक्ष गंगाधर कदम, युवा अध्यक्ष प्रणय कोवे, युवा सचिव मारोती देवकते, युवा प्रसिद्धीप्रमुख रमेश परचाके, सदस्य शेख खय्युम कुरेशी आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ लातूर जिल्हा शाखेच्या वतीने पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

याप्रसंगी राज्य महिला अध्यक्षा सुधाताई कांबळे, मराठवाडा अध्यक्ष विष्णू अष्टीकर, जिल्हाध्यक्ष लहू कुमार शिंदे, महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील, उपाध्यक्ष महादेव पोलदासे, प्रसिद्धीप्रमुख संतोष सोनवणे, वास्तववेदचे संपादक राजाभाऊ जाधव, फिरोज मुजावर, पठाण आय. एफ. आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीने दिवंगत पत्रकार मारोती गव्हाळे यांना श्रद्धांजली वाहून पत्रकार दिन साजरा करण्यात आला व त्यांच्या लहान मुलीस आर्थिक मदत देण्याचे नियोजन करण्यात आले. याप्रसंगी बिटरगाव पोलीस ठाणेचे ठाणेदार प्रताप भोस, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, भागवत काळे, सुनील ठाकरे, संदेश कांबळे, राजु गायकवाड, अशोक गायकवाड, शैलेश कोरडे, राज नप्ते, मैनोदीन सौदागर, गजानन नवाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. तसेच राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे यांनी शाळेला घड्याळ भेट देऊन पत्रकार दिन साजरा केला.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ फलटण कार्यकारिणीच्या वतीने  दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पत्रकार दिन साजरा करण्यात आला. यावेळी फलटण तालुका अध्यक्ष संतोष बिचुकले व पदाधिकारी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पुणे, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव सर्व जिल्ह्यामध्ये पत्रकार दिन साजरा करण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...