✍🏿 वृतांकन :राजेश पाटील
ता. प्रतिनिधी किनवट:-
सध्या मकार संक्रात सणामुळे किनवट बाजार विविध वाण, मातीची भांडी वस्तु गांजर बोर पेरु गुळ हलवा अशा विविध सामान विक्रीला आले आहे व महीलांची गर्दी वाढली आहे तसेच उसाची आवक सुद्धा बाजारात वाढली आहे उमरखेड व मारेगाव येथील उस मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत आहे प्रती उस पंचवीस रुपये दराने विकल्या जात आहे तर तीन उस ५० रुपये प्रमाणे विकल्या जात आहे यामुळे उस विक्रेता शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत खालचे मारेगाव येथील शेतकरी अनिल मुखेडकर यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितले की उस दोन प्रकारचे आहेत काळा उस व लाल उस लाल उस हा जास्त गोड असतो व त्याचा भाव जास्त आहे म्हणजे वीस रुपये प्रति एक पडतो उसाला यंदा चांगला भाव मिळत आहे तसेच उसाचे सिजन नसेल तर उसासाठी साखर कारखाना जवळपास नाही परंतु आम्ही सारा उस उसाच्या रसवंती दुकानदारांना सप्लाय करतो त्यामुळे उसाच्या कारखाण्याची चिंता आता मिटली आहे अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली आहे यामुळे बाजार गर्दीने फुलून गेला आहे .
Comments
Post a Comment