Skip to main content

खासदार हेमंत पाटील जनसंपर्क कार्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

 


किनवट तालुका प्रतिनिधी:-

दि.१२ जानेवारी,

माननीय खासदार श्री हेमंतभाऊ पाटील साहेब यांचे किनवट जनसंपर्क कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आद्यगुरू राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँ साहेब व युवकांचे प्रेरणास्थान  स्वामी विवेकानंद यांच्या जयंती तथा युवादिन निमित्त प्रतिमांचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यांत आले.

 यावेळी तालुका प्रमुख बालाजी मुरकुटे, शहर प्रमुख सुरज सातुरवार, दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड, संजय मुरगुलवार, सुरेश घुमडवार, रवी नेमानिवार, हनवंता मुकाडे, अश्विन राठोड, अशोक जाधव,भारत राठोड, अनिल भोयर, अरविंद कदम, ओमप्रकाश नरवाडे,सुरेश साकपेल्लीवार, ज्ञानेश्वर पेंढारे, अमोल सोमवंशी,किरण येरमे, जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड आदी उपस्थित होते.

Comments