Skip to main content

तालुका क्रिडा अधिकारी गुरुदीप संधु यांना सेवापूर्तीसाठी निरोप

 

ता. प्र. किनवट:-

किनवट येथे प्रदिर्घ सेवेतुन संधु सरांचा सेवापुर्ती सोहळा घेण्यात आला.श्री स.गुरुदीपसिंघ प्रेमसिंघ संधु हे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातुर येथे 1992 साली क्रीडा आधिकारी म्हणुन रुजु झाले होते येथुन आपल्या सेवेला सुरुवात केली होती तर ते सध्या जिल्हा क्रीडाअधिकारी कार्यालय नांदेड मध्ये किनवट तालुका क्रीडा अधिकारी म्हणुन किनवटला कार्यरत होते आणि त्यांची आपली एकुन 32 वर्ष सेवा दिली .ते प्रदिर्घ सेवेतुन.31 डिसेंबर 2022 रोजी निवृत झाले.त्यांचा किनवट क्रीडा समिती किनवट आयोजित  दि.08 जानेवारी 2023 वार रविवार सकाळी 11:30 वा.  क्रीडा संकुल इंनडोर हाॅल किनवट येथे घेण्यात आला.क्रार्यक्रमाचे अध्यक्ष श्री मुकुंद तिरमनवार हे होते तर प्रमुख पाहुने श्री.हैदर शेख सर ..प्रमुख उपस्थिती श्री.तांदळे प्रेम सर(क्रीडा संयोजक ,किनवट), काँग्रेस सरचिटणिस श्री गिरीष नेम्मानीवार ( राष्ट्राय खेळाडु व्हालीबाॅली) श्री.पठाण जुम्माखाँ , श्री.संदीप इसाई सर,श्री,रामराव राठोड सर तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आर जी राठोड सरांनी केले तर कार्यक्रमाचे नियोजन श्री .संतोष मुंढे सर,श्री .सय्यद फराहन सर,श्री संदिप एशिमोड सर श्री.करण मुंढे सर यानी केले होते.श्री शेख हैदर सर,श्री,तांदळे सर,श्री गिरीष नेम्मानिवार श्री.पठाण सर,श्रीरामराव राठोड सर श्री संतोष मुंढे सर श्री गुरुदीपसिंघ संधु सरांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदाना बद्दल व त्यांच्या  केलेल्या कार्यांचा अलेख कार्यक्रमाला उपस्थित क्रीडा शिक्षक व खेळाडु समोर ठेवला.तर संधु सरांनी आपल्या भाषणात आपल्या कार्याचा अनुभव कार्यक्रमात जमलेल्या खेळाडु व क्रीडा शिक्षका समोर ठेवला. तर अध्यक्षीय भाषणामध्ये श्री.मुंकुद तिरमनवार यांनी संधु सरांनी क्रीडा संकुलची स्थापना करण्यापासुन किनवट तालुक्यातील खेळाडुंना राज्यस्तर पोहचवण्या मधिल त्यांचे योगदान तसेच त्यांचा मनमिळाऊ स्वभाव प्रेमळवृत्ती त्यांच्या व्यक्तिमत्वाचा लेखाजोखा कार्यक्रमाला जमलेल्या क्रीडाशिक्षक व खेळाडु समोर ठेवला.आणि आतापर्यंतच्या सहकार्या बद्दलसंधु सरांचे धन्यवाद केले व पुढे सहकार्य कराल आशी आशा संधु सरांकडे केली तर आभार श्री .रामराव राठोड यानी केले.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...