Skip to main content

मांडवी पोलिसांची जुगार अड्ड्यावर धाड 4700 रुपयाच्या मुद्देमाल जप्त.


 

मांडवी प्रतिनिधी 

 मांडवी पोलीस ठाणे अंतर्गत पिंपळगाव फाटा येथील पेट्रोल पंपाच्या मागे शेतामध्ये झन्ना मुन्ना या नावाचा जुगार घेत असताना सहा व्यक्तीं वर कारवाई करण्यात आली.

 पिंपळगाव फाटा येथे दिनांक 13.1.2023 पेट्रोल पंपाच्या पाठीमागे तुकाराम  गुरणुले यांच्या शेता लगत कोरड्या नाल्यावर आरोपी पत्त्यावर पैसे लावून  झन्नामन्ना नावाचा जुगार खेळत व खेळवीत असताना मांडवी पोलिसांनी  त्याच्यावर धाड टाकून कारवाई केली यावेळी मुद्देमालासह आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला.

  यावेळी एकूण सहा व्यक्तीवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कायद्याप्रमाणे  कलाम 12 (अ)  प्रमाणे कारवाई करण्यात आली आरोपीचे नाव. पुढीलप्रमाणे--- 1)श्री. उष्णना पी.  आसन्न  इंदुरी वय 40 वर्षे व्यवसाय पेंटर रा. भीमसरी ता. जि. आदिलाबाद                 2) गुलाब रूपचंद लसनकार वय 50 वर्षे व्यवसाय शेतमजुरी रा. रामपूर ता. जिल्हा आदिलाबाद 3) मोहन निवृत्ती सूर्यवंशी वय 44 वर्ष व्यावसाय शेती राहणार खुशीत नगर ता.जि. आदीलाबाद.4) इंद्रसेन गंगाराम मडावी राहणार तलाईगुडा ता. किनवट जि.नांदेड वय 35 वर्ष व्यावसाय शेती   ता. किनवट जि.नांदेड 5) सुनील कचरू मुनेश्वर वय 45 वर्षे व्यवसाय शेतमजुरी राहणार पिंपळगाव ता. किनवट जि.नांदेड. 5) किरण गोविंद नरवाडे वय 35 वर्ष व्यवसाय शेतमजुरी राहणार पिंपळगाव फाटा ता. किनवट जि. नांदेड या आरोपीवर गुन्हा दाखल करून नोटीस देण्यात आलेली आहे अशी मांडवी पोलीस ठाण्यातून माहिती मिळालेली आहे.

पिंपळगाव फाटा  येथील कार्यवाही सदर मांडवी पोलिस  ठाणे मा. स.पो.नि शिवरकर , पो.उ.प.नि पठाण, पोकॉ. श्याम चव्हाण, नितेश लेनगुळे, रवी कोडमवार, राजू डांगे आदींनी  ही कारवाई केली.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...