Skip to main content

किनवट स्वच्छ व अतिक्रमणमुक्त करण्याचा डॉ. मृणाल जाधव यांचा मानस ३४ किलो प्लास्टिक जप्त; तहसिलदार यांच्या आदेशाची प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरवात




किनवट:- प्लास्टिक बंदीसंदर्भात येथीलपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी डॉ. मृणाल जाधव यांच्या आदेशानुसार किनवट शहरात बेकायदेशीररित्या प्लास्टिक व थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांविरूध्द पालिकेच्या प्लास्टिक बंदी पथकाने येथील आठवडी बाजारात अचानक धडक कार्यवाही केली. भाजी मंडई व परिसरातील सुमारे १५० ते २०० आस्थापनांची तपासणी करून आक्षेपार्ह आढळलेले ३४ किलो प्लास्टिक जप्त केले. तसेच यापुढे सिंगल युज प्लास्टिक चा वापर न करण्याची सक्त ताकीद देऊन, पुढे आढळल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

महाराष्ट्र प्लास्टिक पिशव्यांचे (कॅरीबॅग्ज उत्पादन व वापर) नियम, २००६ द्वारे ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणूनदेखील या कचर्याच्या वाढत्या प्रमाणामुळे पर्यावरणावर व आरोग्यावर होणारे नुकसान वाढतच


१२ बाय ८ इंचापेक्षा कमी असणार नाही, याची दक्षता घ्यावी, तसेच प्रत्येक प्लास्टिकच्या पिशवीच्या वेष्टनावर माहिती टाकावी, असे राज्य सरकारचे म्हणणे आहे.

आहे. प्लास्टिकच्या वापरामुळे व विल्हेवाटीमुळे विविध प्रकारच्या समस्या निर्माण होत आहेत. ज्यामध्ये अविघटनशील प्लास्टिक कचर्याचे प्रमाण मोठे आहे.

प्लास्टिक कचऱ्यामुळे शहरातही घनकचरा हाताळण्यामध्ये विविध समस्या निर्माण होत असून हा कचरा जाळल्याने विविध आजार निर्माण होतात. हा प्लास्टिक कचरा नाले व गटारात अडकल्याने शहरांमध्ये नालीतील घाण रस्त्यावर वाहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.


सरकारने प्लास्टिक पिशव्या बंदी केल्याचे विक्रेते सांगत आहेत. तरीही लोक पिशव्या मागत असल्याने व ज्यांच्याकडे जुन्या पिशव्यांचा साठा आहे. ते प्लास्टिक पिशव्या आजही ग्राहकांना देत आहेत. फळ, भाजी विक्रेते, दुकानदार यांच्याकडून पिशव्या देणे सुरू आहे. प्लास्टिक पिशव्या, थर्माकोल प्लेट्स, ताट, वाट्या, ग्लास, फ्लेक्स, तोरण अशा वस्तूंचा वापर करण्यामध्ये राज्यात बंदी घालण्यात आली आहे. त्यात प्लास्टिकपासून बनविलेल्या पिशव्यांची किमान जाड़ी ५० मायक्रॉनपेक्षा कमी नसावी व आकार दिली.


तरीही शहरातील दुकाने, आस्थापना, हॉटेल, खानावळ, चायनीज हॉटेल, बियर शॉप, मटण- चिकनचे दुकान, मासळी बाजार, बसस्थानक परिसरातील दुकानांमध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या, सिंगल यूज प्लास्टिक पिशव्यांचा सर्रास वापर केलेला आढळत असल्यामुळे पालिकेच्या पथकाने सोमवारी अचानक धडक कार्यवाही करून ३४ किलो सिंगल युजप्लास्टिक जप्त केले. यापुढेही पथकाची कार्यवाही चालूच राहणार असल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले. तसेच यापुढे आक्षेपार्ह प्लास्टिकच्या वस्तू आढळल्यास दंडात्मक कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती  पथक प्रमुख चंद्रकांत दुधारे यांनी दिली

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...