Skip to main content

" ईतर व्यक्तींनी बेकायदेशीर रित्या कब्जा केलेली शेतजमीन कशी मिळवाल परत" सल्ला कायद्याचा वुईथ अॅड विलास सुर्यवंशी

सल्ला कायद्याचा वुईथ अॅड विलास सुर्यवंशी


 माझ्या महाराष्ट्रातील तमाम बंधू आणि भगिनींनो आज आपण नवीन एक विषय घेऊन आलो आहोत ज्यामुळे एक नवीन कायदेशीर विषय समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था तसेच येणाऱ्या पिढीला वर्तमान परिस्थितीपेक्षा आनंदमयी परिस्थिती निर्माण होण्यासाठी व तसेच सुरक्षित वातावरण निर्मितीसाठी सदर लेखाची मदत झाल्यास लेखकाचा खारीचा वाटा असेल असे समजण्यात यावे. मित्रांनो मानव जेव्हा नैसर्गिक अवस्थेमध्ये होता तेव्हा तो "ग्रुप" प्रमाणे राहत होता अनेक ग्रुप या पृथ्वीतलावर होते त्या टोळ्यात एकमेकांमध्ये लढाया होत होत्या त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात मानवी नरसंहार होत होता त्यामुळे या टोळ्यांनी अंतर्गत कराराने टोळी "प्रमुख" निवड केला त्याला म्हणजे प्रत्येक टोळीला "गण" असे समजल्या जात होते व टोळीप्रमुखाला "गणपती" असे म्हणत होते नंतर या गणाच्या प्रमुखांनी आपापसामध्ये सामाजिक करार करून "राज्यसंस्थेची" निर्मिती केली राज्यसंस्थेने मग हळूहळू कायदा व सुव्यवस्थेचे राज्य आणण्याचा प्रयत्न केला या प्रयत्नांमधून आर्थिक व्यवस्थेला विकासात्मक दर्जा देण्याचा प्रयत्न मानवी समुदायातून करण्यात आला म्हणजेच "मालमत्ता" ही संकल्पना निर्माण झाली यामध्ये बऱ्याच प्रकारच्या मालमत्ता आहेत. त्यामध्ये स्थावर मालमत्ता ही सर्वात महत्त्वाची मालमत्ता आहे तर मित्रांनो आपण आज रोजी "स्थावर मालमत्ते" विषयी सर्व प्रकारच्या बाबी जाणून घेणार आहोत स्थावर मालमत्तेमध्ये शेती ही प्रामुख्याने आहे. माझ्या महाराष्ट्रातील तमाम शेतकरी मित्रांनो स्थावर मालमत्ता हे बेकायदेशीर रित्या मिळवण्याचा प्रयत्न सर्व समाजातील समाजविरोधी घटकाकडून केल्या जाते. मित्रांनो स्थावर मालमत्ता मिळवण्याचे अनेक मार्ग आहेत. कायदेशीर भाषेत "हक्क" हा अधिकाराचा पाया आहे व हक्क हेच अधिकाराचे कारण आहे. प्रत्येक कायदेशीर हक्कास मालकी येते म्हणजेच काही अशा बाबी किंवा घटना की ज्या कारणाने अधिकार व मालकी प्राप्त होते त्या तसेच मालकी हक्क हा पुढच्या पिढीकडे येतो मालकाच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसास अधिकार येतो. मित्रांनो "मालकी" व "कब्जा" यामध्ये फरक आहे परंतु   कब्जाबरोबरच मालकी हस्तांतरण होत असतो. हे कायदेशीर गृहीत तत्व आहे. मित्रांनो "कब्जा" हा कायदेशीर रित्या घेतल्याने किंवा कोणी कायदेशीर रित्या स्वाधीन केल्याने हा मालकीत रूपांतर होत असतो. मित्रांनो वेळोवेळी आपल्या कानावर अशा गोष्टी घडतच असतात की बऱ्याच वेळा असे होते की या शेतकऱ्याच्या जमिनीवर वाद सुरू आहे .असे होते की शेत जमिनीची वाटणी होण्यापूर्वीच अतिरिक्त जमीन इतर शेतकरी किंवा इतर व्यक्ती आपल्या नावावरून करून घेतात, मुख्य शेती जमिनीची वाटणी करून असताना पूर्वीची वाटणी झालेली असल्यामुळे नवीन वाटणी करते वेळेस शेतकऱ्यांना अडथळा येतो अशी सर्वप्रथम जास्तीत जास्त संयुक्त कुटुंबांमध्ये किंवा  जवळचे विश्वासू व्यक्तिमार्फत घटना घडत असतात अशा वेळेस काय करावे या सर्व बाबी लक्षात घेता शासनामार्फत यासाठी कठोर व व्यवस्थित असे नियम अटी बनवण्यात आलेले आहेत या अंतर्गत सर्वांना समान वाटप कशाप्रकारे करता येईल याबद्दलची सविस्तर तरतूद कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे. बऱ्याच  शेतकऱ्यांनी कोर्टा मार्फत आपल्या जमिनीचा हक्क व न्याय मिळवलेला आहे. कारण सध्या महसूल विभाग त्याच प्रमाणे शासनाचे अनेक विभाग आहेत जे सर्वसामान्य नागरिकाला हा तत्पर न्याय मिळेल या दृष्टीकोनातून आपले कार्य व्यवस्थितरित्या करत आहेत. अशावेळी शेती संदर्भातील कायदे नियम माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे कायद्याअंतर्गत हडप केलेली जमीन कशाप्रकारे आपण मिळू शकतो याबद्दलचे नियम तुम्ही खालील पर्यायावर जाऊन तुम्हाला सर्व प्रकारचे नियम मिळू शकतात *

*पर्याय क्रमां*क*  1


सर्वप्रथम तुमच्या जमिनीवर एखाद्या व्यक्तीने बेकायदेशीर रित्या कब्जा केलेला असेल तर भारतीय दंड संहिता कलम  406 अंतर्गत म्हणजे फौजदारी गुन्हा नोंदवून तुम्हाला त्या व्यक्तीच्या विरोधात खोटेपणाने विश्वास दाखवून जमीन हडप केल्या संदर्भात गुन्हा दाखल करता येतो.  त्या अंतर्गत तुम्ही गुन्हा नोंद केल्यानंतर पुढील तपास पोलीस कर्मचारी यांच्यामार्फत करून तुम्हाला न्याय मिळवून घेता येईल.


 *पर्याय क्रमांक दोन*


मित्रांनो आपल्या जमिनीवर कोणी बेकायदेशीररित्या कब्जा केल्यास आपण सर्वप्रथम बेकायदेशीररित्या ताबा करणाऱ्या व्यक्तीबद्दल जवळचे पोलीस स्टेशन येथे आपली तक्रार नोंद करावी पोलीस अधिकारी हे नियमाप्रमाणे कार्यवाही करून संबंधित न्यायदंडाधिकारी म्हणजेच तहसीलदार यांच्यामार्फत संबंधित कब्जा हा हुसकावून लावतात मित्रांनो त्यामध्येही तहसीलदारांना कधी कब्जा हुसकावून लावण्याचे अधिकार आहेत तर कधी नाहीत याबद्दल सखोल असे विश्लेषण आहे याबद्दलची माहिती तुम्हाला तुमचे  विधीज्ञ यांचा सल्ला घेऊनच पुढील कारवाई करणे सोईचे होईल विधीज्ञाच्या सल्ल्याने तुम्हाला नक्कीच न्याय मिळेल.


 *पर्याय क्रमांक तीन*


मित्रांनो अनेकदा एखादा इसम बेकायदेशीररित्या आपल्या जमिनीवर ताबा घेत असतो त्यावेळेस आपण आपल्या विधीज्ञा मार्फत सन्माननीय न्यायालयात जाऊन आपण आपले कायदेशीर अधिकार हे या संदर्भात न्याय मिळवून जीवन सुखमय करण्याचा प्रयत्न करावा न्यायालयामध्ये ही फार वेळ घालवी परिस्थिती आहे मित्रांनो नक्कीच नाही कारण एखाद्या व्यक्तीचे कायदेशीर अधिकार हे एखाद्या इसमाने बेकायदेशीररित्या बळकावलेले आहेत हे प्रथम दर्शनी किंवा सुकृत दर्शनी न्यायालयाला दस्तऐवजाच्या माध्यमातून परिस्थिती जन्य पुराव्याच्या माध्यमातून सकृत दर्शनी निर्देशनस येत असेल त्यावेळेस न्यायालय हे योग्य निष्कर्षापर्यंत जाऊन पोहोचते आणि त्या निष्कर्षा नवे न्याय निर्णय हे पारित करत असते आणि त्या निर्णयाची अंमलबजावणी न्यायालय कमीत कमी दिवसांमध्ये कशाप्रकारे होईल यावरून यावर निरक्षण करत असते देखरेख करत असते किंबहुना त्याची अंमलबजावणी हे नियमाप्रमाणे तत्काळ होईल अशी परिस्थिती निर्माण करण्याचा प्रयत्न संबंधित न्यायालय करत असते. म्हणून मित्रांनो न्याय हा मिळतच असतो आपल्या देशांनी किंबहुना जगातील प्रमुख देशाने "न्यायाला उशीर म्हणजे न्याय नाकारण्यासारखेच आहे" हे तत्त्व स्वीकारले असल्यामुळे न्याय हा लवकरच मिळत असतो असे मानण्यात येते किंबहुना याउलट परिस्थिती निर्माण करण्यासाठी आपल्या अगोदरची पिढी किंवा आपण वर्तमान नागरिक जे स्वतःला समजूतदार असे म्हणून घेतो या लोकांच्या निष्क्रियतेपणामुळे आज सर्वसामान्य जनतेला न्याय हा मिळत नाही आहे परंतु सध्याच्या वर्तमान परिस्थितीपेक्षा सुखी परिस्थिती निर्माण करण्याची जबाबदारी आपल्यावरच आहे मित्रांनो या लेखांमध्ये लेखकाने खूप काही सांगण्याचा प्रयत्न केला आहे जे समाजाला सुखमय सुजलाम सुफलाम जीवन देण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला आहे जर लेखक सफल झाला तर त्याचा खरोखरच खारीचा वाटा असेल हे मात्र खरे... 



विलास सूर्यवंशी किनवट

मो.9922910080

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला