राष्ट्रपिता जोतीराव फुले व डॉ .बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती उत्सव समितीच्या स्वागत अध्यक्षपदी मा. आमदार भीमराव केराम यांची निवड
(तालुका प्रतिनिधी किनवट) राष्ट्रपिता म. जोतीराव फुले १९८ व्या व राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या संयुक्त सोहळा जयंतीच्या स्वागताध्यक्षपदी किनवट- माहुरचे लोकप्रिय आमदार भीमराव केराम यांची निवड करण्यात आली आहे. सविस्तर वृत असे कि भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संयुक्त जयंती सोहळ्याचे विविध कार्यक्रमाचे आयोजन ११ एप्रिल ते १४ एप्रिल पर्यंत करण्यात आले आहे त्या निमित्त आमदार भीमराव केराम यांचे शाल पुष्पहार नियुक्तीपत्र देवुन सत्कार करण्यात आला यावेळी संयुक्त जयंतीचे अध्यक्ष विनोद भरणे, शंकर नगराळे, प्रसेनजीत कावळे, विनोद मुनेश्वर, निखील सर्पे, निखिल वि. कावळे, गौतम पाटील, गंगाधर मुनेश्वर, सुमेध कापसे, संघटक, सल्लागार समिती, प्रसिद्धी प्रमुख समिती , सदस्य आदी युवक उपस्थित होते या कार्यक्रमास सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन उत्सव समितीचे अध्यक्ष विनोद भरणे यांनी केले आहे.