श्रीक्षेत्र माहूर : प्रतिनिधी
धकाधकीच्या जीवनात स्वतःची आवड छंद जोपासायला आपल्याला वेळ मिळत नाही तरी आपण वेळ काढून आपली आवड छंद जोपासली पाहिजे. ताणतणाव कमी करण्यासाठी संगीत महत्वपूर्ण आहे. त्यासाठी शिक्षकांनी आपली कला जोपासली पाहिजे, असे उदगार नांदेड जिल्हा परिषदेचे योजना शिक्षणाधिकारी दिलीपकुमार बनसोडे यांनी काढले.
रुपेश मुनेश्वर केले तर आभार मराठवाडा विभागाचे सचिव शेषराव पाटील यांनी केले.
महाराष्ट्राचा महागायक म्हणून ठाणे जिल्ह्यातील शिक्षक रवींद्र तरे हा ठरला तर राज्यातून दुसरा क्रमांक छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिक्षक शिराज पठाण तर तिसरा क्रमांक सिद्धार्थ वाघ यांनी पटकावला. उत्तेजनार्थ विलास नरवाडे नदिड रजनी गोडबोले ठाणे संतोष चलोदे रत्नागीरी मुन्ना थोरात नदिड निलेश दोनाडकर चंद्रपूर यांना मिळाला आहे. तर विभागीय प्रथम हर्षल साबळे कोकण नंदकुमार उबाळे पुणे प्रीती भरणे अमरावती सुवर्ण नळगिरे मराठवाडा सुनील सिसोदे नाशिक यांना मिळाला आहे. परीक्षक म्हणून संगीततज्ञ राजू जाधव, संगीत विशारद सुरेश पाटील, गायन विशारद भारत कोडापे
यांनी उत्कृष्टरित्या काम पाहिले. सहभागी सर्वांनाच सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन फाल्गुनी उपरीकर यांनी केले तर आभार माहूर तालुकाध्यक्ष मिलिंद कंधारे यांनी मानले.
आनंद दत्तधाम आश्रमात संपन्न झालेल्या स्पधेर्चा महाअंतिम सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी नांदेड जिल्हाध्यक्ष मिलिंद जाधव, माहूर तालुकाध्यक्ष मिलिंद कंधारे, किरणकुमार वाघमारे, मनोज बारसागडे, बाबुराव माडगे, सुधाकर चवटे, ज्ञानेश्वर कऱ्हाळे पाटील, मुन्ना थोरात, प्रवीण वाघमारे, सुरेशकुमार शेरे, सागर चेक्के, भाग्यवान भवरे, शितल गौरखेडे, डॉ. अरुण धकाते, प्रा. विनोद कांबळे, जितेंद्र वर्मा, यु.टी. पवार, पांडुरंग शेरे आदींनी परिश्रम घेतले.



Comments
Post a Comment