किनवट : (ता.३) भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा किनवट च्या वतीने आयोजित संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त सम्राट अशोक बुद्ध विहार राजर्षी शाहू नगर गोकुंदा येथे आज दि.३मार्च २०२५रोजी *उपासिका धम्म प्रशिक्षण शिबीराचा* समारोप भारतीय बौध्द महासभेचे नांदेड जिल्हा संघटक अभियंता प्रशांत ठमके यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात करण्यात आला .सदर दहा दिवसीय शिबीर जिल्हा अध्यक्षा तथा केंद्रीय शिक्षिका अनिता ताई खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२२/०२/२०२५ ते ०३/०३/२०२५ या कालावधीत संपन्न झाले. या शिबिराच्या समारोपप्रसंगी प्रमुख अतिथी भारतीय बौध्द महासभा जिल्हा शाखा नांदेड चे वरिष्ठ केंद्रीय शिक्षक माधवराव सर्पे,कोषाध्यक्ष आद.सुभाष नरवाडे. बौद्धाचार्य तथा केंद्रीय शिक्षक एम.एम. भरणे,महिलाशाखेच्या जिल्हा सरचिटणीस ज्योतीताई कुंटे, संस्कार उपाध्यक्षा विजयमाला नरवाडे यांनी उपासिकांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सुत्रसंचलन बौद्धाचार्य महेंद्र नरवाडे यांनी केले तर शांता दिलीप पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.यावेळी शिबिरार्थी उपासिका दैवशाला सोनकांबळे, इंदुबाई वाघमारे, आम्रपाली कांबळे,दिपाली गीमेकर यांनी मनोगत व्यक्त केले.सदर कार्यक्रमात सर्व शिबिरार्थी उपासिकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.तसेच भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा किनवट ची महिला शाखा स्थापन करुन नवनिर्वाचित अध्यक्षा प्राचार्या शुभांगी ताई ठमके यांच्या सह सर्व पदाधिकारी महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.याप्रसंगी शुभांगी नरवाडे यांनी मिठाई व शितपेय वाटप केले.अभियंता प्रशांत ठमके यांच्या अध्यक्षिय समारोपांनतर त्यांच्या वतीने उपस्थित प्रमुख अतिथी सह सर्व शिबिरार्थी उपासिकांना भोजनदान करण्यात आले.शिबिराच्या यशस्वितेसाठी भारतीय बौध्द महासभेचे तालुका सरचिटणीस प्राचार्य राजाराम वाघमारे, संस्कार सचिव बौद्धाचार्य अनिल उमरे, कोषाध्यक्ष भारत कावळे,वार्ड अध्यक्ष बंडू भाटशंकर, कैलास भरणे, अशोक सर्पे,सदानंद पाटील यांच्या सह राजर्षी शाहू नगर येथील महिलांनी पुढाकार घेतला.

Comments
Post a Comment