किनवट:- बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय किनवट येथील . रसायनशास्त्र विभागप्रमुख निवृत्त प्रा. डॉ. आनंद भालेराव यांना नादेड जिल्हातील करिअर कट्टा उत्कृष्ट तालुका समन्वयक पुरस्कार मिळाला , महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस .के. बेंबरेकर यांनी अभिनंदन केले, याप्रसंगी प्रा. संतोष पवार, प्रयोगशाळा सहाय्यक नारायण पवार, प्रयोगशाळा परिचर काशिनाथ पिपरे हे प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. भालेराव यांनी महाविद्यालयात विविध उपक्रम विद्यार्थाच्या प्रगतीसाठी, विकासासाठी आयोजित केले होते, स्पर्धा परिक्षा संदर्भात विद्यार्थांना मार्गदर्शन केले, अनेक विद्यार्थी ना उच्च शिखरावर पोहचविले , करिता उच्च शिक्षण विभाग व महाराष्ट्र तंत्रज्ञान सहायता केन्द्र महाराष्ट्र विभाग यांच्या वातिने पुरस्कार दिला गेला, त्याबद्दल महाविद्यालय' विद्यार्थी व मित्रपरिवार,सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत व अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment