महाबोधी विहार मुक्तीसाठी भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने उपविभागिय अधिकारी कार्यालया मार्फत राष्ट्रपतीनां निवेदन
किनवट:-
सविस्तर माहिती असी की, बुद्ध गया येथील महाबोधी महाविहार 1949 च्या व्यवस्थापन ॲक्ट मध्ये तात्काळ दुरूस्ती करून महाबोधी महाविहार व्यवस्थापन हे संपूर्ण बौद्धांच्या हाती देण्यात यावे याबाबत आज दि. 6 मार्च 2025 रोजी मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट यांच्या मार्फत मा. महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. यावेळी भा. बौ. म. तालुका अध्यक्ष तथा जिल्हा संघटक अभि. प्रशांत ठमके सर, तालुका सरचिटणीस प्रा. राजाराम वाघमारे सर, तालुका कोषाध्यक्ष उपा. भारत कावळे सर, जिल्हा पर्यटन व प्रचार विभागाचे बौध्दाचार्य महेंद्र नरवाडे सर, तालुका संस्कार विभागाचे बौध्दाचार्य अनिल उमरे, बौध्दाचार्य गंगाधर कदम, प्रा. दिलीप पाटील, वार्ड शाखा अध्यक्ष उपा. कैलास पाटील, उपा. भगवान मुनेश्वर, उपा. सुंदर भगत, वार्ड शाखा अध्यक्ष जनार्दन भगत, उपा. देवराव सोनकांबळे, उपा. विजय वाघमारे, उपा. अभय नगराळे, पत्रकार विवेक ओंकार उपस्थित होते. व 37 महीला पदाधिकारी व पुरुष यांच्या स्वाक्षरीने निवेदन देण्यात आले.

Comments
Post a Comment