किनवटचा भूमिपुत्र बॉलिवूडमध्ये झळकणार – ‘पिंटू की पप्पी’ चित्रपटाची पत्रकार परिषद १३ मार्चला ,१८ मार्चला विशेष सोहळा
किनवट:
किनवट तालुक्यातील उभरता बॉलिवूड अभिनेता शुशांत ठमके याचा आगामी हिंदी चित्रपट ‘पिंटू की पप्पी’ लवकरच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत जान्या जोशी आणि विधी यादव महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. मैत्री मूव्ही मेकर्स प्रस्तुत, V2S प्रॉडक्शन & एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली हा चित्रपट साकारला आहे. सुप्रसिद्ध लेखक आणि दिग्दर्शक शिव हरे, तसेच निर्माते विधी आचार्य यांनी या चित्रपटाचे नेतृत्व केले आहे.
*पत्रकार परिषद – 13 मार्च 2025*
या ऐतिहासिक क्षणाची अधिकृत घोषणा करण्यासाठी आणि स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी 13 मार्च 2025 रोजी दुपारी 1 वाजता, शासकीय विश्रामगृह, गोकुंदा (किनवट) येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
*विशेष सोहळा – 18 मार्च 2025*
या निमित्ताने 18 मार्च 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता, मातोश्री कमलताई ठमके शैक्षणिक संकूल, कोठारी (चि), किनवट येथे एक भव्य सांस्कृतिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक गणेश आचार्य आणि माधुरी पवार यांचे लाईव्ह परफॉर्मन्स होणार आहेत. या विशेष सोहळ्यात बॉलिवूडच्या ‘पिंटू की पप्पी’ चित्रपटातील गाण्यांचे संगीतमय अनोखे सादरीकरण देखील अनुभवता येणार आहे.

Comments
Post a Comment