बौध्द गया येथील महाविहार मुक्ती आंदोलनात सहभागी होण्यासाठी किनवट येथील 15 लोकांची टिम बौध्द गया येथे रवाना
किनवट ता. प्र.
गेल्या 20 दिवसांपासून बौद्ध गया *महाविहार* मुक्ती आंदोलन संपूर्ण देशात, जगात पेटले असताना जागृतीचे केंद्र म्हणून ज्या तालुक्याची ओळख आहे तो किनवट तालुका.
आज दि. 5 मार्च 2025 रोजी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा किनवट च्या वतीने 15 लोकांची टिम बौद्ध गया महाविहार मुक्ती आंदोलनात सहभागी होण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा किनवट येथून रवाना झाली आहे.
यावेळी भा. बौ. म. ता. अध्यक्ष तथा जिल्हा संघटक अभि. प्रशांत ठमके सर, भा. बौ. म. महिला तालुका शाखा अध्यक्षा उपा. शुभांगी ताई ठमके, जिल्हा पर्यटन प्रचार विभागाचे महेंद्र नरवाडे सर, ता. कोषाध्यक्ष उपा. भारत कावळे सर, संस्कार विभागाचे बौध्दाचार्य अनिल उमरे, उपा. प्रशांत डवरे सर, उपा. राहुल तामगाडगे, उपा.विवेक ओंकार, उपा. बाबासाहेब आढाव, उपा.सुरेश कयापाक, उपा. आम्रपाली वाठोरे (कांबळे), उपा. पुनेरथा तामगाडगे (उमरे), उपा. ज्योती ताई शेरे (कदम) उपा. नंदा नगारे, उपा. सिमा विवेक नरवाडे,उपा. शिल्पा अनिल परेकार,व असंख्य महिला पुरुष उपस्थित होते.


Comments
Post a Comment