समोर वडीलाचा मृतदेह दुसरीकडे दहावी इंग्रजीचा पेपर अशा असमंज्यस परिस्थितीत सुरजने दिली परीक्षा.. मुख्याध्यापकांनी दिला धिर
किनवट ता. प्रतिनिधी-
सुरज संजय जाधव वर्ग १० रा.सेवालाल नगर,टाकळी ता.उमरखेड हा विद्यार्थी सध्द्या दहावीची परीक्षा देत आहे.परंतु आज सकाळी ठीक ५:३०वाजता सुरजचे बाबा संजय जाधव यांचे दिर्घ आजाराने निधन झाले.सुरजच्या डोक्यावरचे छत्र हरपले.आज सुरजचा इंग्रजी विषयाचा बोर्डाचा पेपर होता.
समोर वडीलांचा मृत देह ,अंत्यविधी,आणि परीक्षा अशा दुःखाचा डोंगर चढण्याची वेळ सुरज वर आली.मनाची विचलता,वडीलांच्या निधनाच्या वेदना,जवळ जवळ सुरज जीवनाच्या परीक्षेत नापास झाल्याचे चित्र,परंतु अशावेळी त्यांनी शाळेचे मु.अ.अरविंद राठोड यांच्याशी फोन वर बोलुन परीक्षा न देण्याचे सांगितले ,सरांनी सुरजचे सांत्वन करत,परीक्षा देऊन तु तुझ्या बाबांना खरी श्रध्दांजली दे,आणि त्याला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे उदाहरण देऊन,त्यांच्या जीवनातील दुःखांवर त्यांनी केलेली मात हे पटवुन सांगितले आणि सुरज शेवटी परीक्षा द्यायला तयार झाला.सआश्रु नयनाने वडीलांची अंत्यविधी आटोपुन परीक्षेसाठी सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या शाळा, किनवट या परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली.सुरज जाधव हा इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय ,गोकुंदा या शाळेचा विद्यार्थी आहे.

Comments
Post a Comment