Skip to main content

Posts

Showing posts from March, 2024

राष्ट्रपिता जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन

 ✒️ राजेश पाटील किनवट शहर प्रतिनिधी:- राष्ट्रपिता जोतीराव यांची १९७ वीफुले व राष्ट्र निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव सोहळ्या निमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष गौतम पाटील यांनी दिली आहे. ११ एप्रील ते १४ एप्रील दरम्यान विविध सामाजिक उपक्रम तथा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे ११ एप्रिल रोजी महात्मा फुले चौक येथील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक परिसरात अभिवादन व ध्वजारोहन कार्यक्रम होईल  नंतर किनवट परिसरात  सकाळी दहा वाजता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन (व्याख्यान) शिबिर होईल या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून  (बळीराम पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा व्याख्याते , अभ्यासक ) डॉ. पंजाब शेरे, रत्नदीप गंगाळे (सहाय्यक प्राध्यापक महात्मा ज्योतीबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क, संशोधन अधिकारी टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई ), स्वप्निल भालेराव (समतादुत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था बार्टी , पुणे, जनसंपर्क अधिकारी ), हे उपस्थित राहणार आहेत तर दुपारी १२ वाजता रांगो

किनवट शहरात सतत विजेचा लपंडाव तर नागरीक उकाड्याने त्रस्त इलेक्ट्रीक वस्तु खराब होण्याची भिती, लोक प्रतिनिधी या बाबत उदासीन

किनवट तालुक्यात विज अनेक वेळा येजा करत आहे   किनवट प्रतिनीधी :  सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरु असुन तालुक्यात व ग्रामिण भागात वितरित होणाऱ्या विजेचा लपंडाव सुरु आहे तर कमी वीज दाबामुळे किनवट तालुका अंधारमय झाला आहे . वीज पुरवठा वांरवार खंडीत होत असल्याने पाणी पुरवठा यंत्रणेवर याचा परिणाम होऊन ती निकामी होण्याची भीतीही निर्माण होत आहे तसेच विजेच्या लपंडावामुळे घरगुती इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रीक उपकरणे निकामी होण्याची भीती वाढली आहे गर्मीमुळे लहान मुलासह अबालवृध्दानां याचा त्रास सहन करावा लागत आहे . विजेच्या खेळखंडोबामुळे लोकांना फॅन, कुलरचा वापरही निट करता येत नाही त्यामुळे परीसरातील जनता त्रस्त आहे दर पाच - पाच मिनीटात वीज खंडीत होत असल्याने नागरिक वीज महावितरण बाबत संताप व्यक्त केल्या जात आहे  थोडाही वारा सुटला कि लाईन गुल होते या बाबत विचारणा केली असता वरूनच लाईन गेल्याचे सांगितले जाते  विशेष म्हणजे विजेची समस्या सोडविण्याकरिता कोणतेही लोकप्रतिनिधी, राजकीय पुढारी, समाजसेवक व इतर कुणीही पुढाकार घेतांना दिसत नाही ही एक शोकांतिका आहे. तर वीज गुल झाल्यास ती नियमित होण्यास किती वेळ किती लागेल

होळी आणि गाणी....

 होळी आणि गाणी.. होळी हा असा एक सण आहे, जो केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरील अनेक देशांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. होळीच्या दिवशी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची रेलचेल सुद्धा राहते. अलीकडच्या काळात होळी सेलिब्रेशन करण्यासाठी वेगवेगळे इव्हेंट ऑर्गनाइज केले जात आहेत. एकमेकांना रंगाने रंगवून होळी स्पेशल गाणी लावून खूप धमाल केली जाते. . होळी खेळताना गाणी वाजवली नाही तर ही होळी अपूर्ण वाटते. आधीच्या काळापासून होळीच्या दिवशी लोक स्वतः गाणी म्हणायचे, कालांतराने त्यात गाण्यांची वाढ झाली. त्याच गाण्यांच्या तालावर संपूर्ण लोक नाचताना दिसत आहेत. परंतू होळी तोंडावर आली असताना धमाल करायला गाणीच आठवत नाहीत…मराठी आणि हिंदी गाण्यांमुळे होळीच्या सणाला खुप धमाल घातली जाते. चला तर मग, या ह्या होळीला गाण्यांवर नाचण्यासाठी सज्ज व्हा. "खेळताना रंग बाई होळीचा होळीचा... फाटला गं कोना माझ्या चोळीचा" १९७१ वर्षातील हे गाणं जुनं आहे पण होळीसाठीच पक्कं समीकरण आहे. सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं हे गाणं विठ्ठल शिंदे यांनी ते संगीतबद्ध केलेलं आहे. “चिकना चिकना म्हावरा माझा” या अल्बम मधील "

बदलू या रंगपंचमी चे‘रंग’.... रुचिरा बेटकर यांचा रंग पंचमी निमित्त विशेष लेख

 बदलू या रंगपंचमी चे‘रंग’.... मार्च महिना आला की सर्वांना होळी आणि रंगपंचमीचे वेध लागतात. अनेकांनी तर दोन चार दिवसा आधीपासूनच योजना बनवायला सुरुवात केली असेलच.‘रेन डान्स' करायचा, हौदात पाणी भरून ठेवायचे, नाहीतर पाण्याचा पाइप लावून रंगांची उधळण करायची असं मनात नक्की ठरवलेलं असेल. पण यंदा जर पाण्याचा गैरवापर टाळू शकलो तर? रंगपंचमीसाठीच नाही तर अगदी पुढचा पाऊस पडेपर्यंत पाणी जपून वापरलं तर? सणाचा आनंद एकत्र येऊन साजरं करण्यात आहे, त्यासाठी कोणालाही त्रास न होता कोरडे आणि अकृत्रिम रंग वापरून पाहिले तर? काही वर्षांपूर्वी ची होळी आठवून पाहुयात का? (पंधरा-वीस वर्षांपूर्वीचे) होळीचे दोन दिवस म्हणजे धुळवड आणि रंगपंचमी. दोन्ही दिवस मजाचमजा. रात्रभर धगधगून मग शांत झालेल्या होळीच्या राखेत पाणी घातलं जायचं आणि मग तो सगळा चिखल एकमेकांना यथेच्छ फासून धुळवड साजरी करित होते. हा राखेचा चिखल अंगाला का लावायचा तर पुढे येऊ  घातलेला उन्हाळा सुसह्य व्हावा म्हणून.. चेहऱ्यावरचा तो चिखल धुऊन काढला की माणसं कशी आतून उजळलेली, आनंदी दिसत. मग दुसऱ्या दिवशी यायची ती रंगपंचमी. आम्ही राहायचो येथिल सगळेच लोक मोठय़ा

मराठवाड्यातून सुपरफास्ट रेल्वेप्रवास; एप्रिलमध्ये नांदेड विभागातील सर्व लोहमार्ग होणार इलेक्ट्रिक

 रेल्वे गाड्यांची गती वाढण्यासाठी त्याचप्रमाणे रेल्वेचा प्रवास पर्यावरणपूरक व्हावा, या उद्देशाने रेल्वेने लोहमार्गाचे विद्युतीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. नांदेड : दक्षिण मध्य रेल्वेच्यानांदेड विभागात रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून, ही कामे मार्चअखेरपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एप्रिलमध्येच विभागातील संपूर्ण मार्ग इलेक्ट्रिक रेल्वे धावण्यासाठी सज्ज होणार आहे. रेल्वे गाड्यांची गती वाढण्यासाठी त्याचप्रमाणे रेल्वेचा प्रवास पर्यावरणपूरक व्हावा, या उद्देशाने रेल्वेने लोहमार्गाचे विद्युतीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागात साधारणत: दीड वर्षापासून ही कामे सुरू असून, ती आता पूर्णत्वाला जात आहेत. विशेष म्हणजे, काही मार्गांवर आताच इलेक्ट्रिक रेल्वे धावत आहे. प्राप्त माहितीनुसार, सद्य:स्थितीला नांदेड विभागातील ४५०.३९ किलोमीटर अंतराचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून, उर्वरित मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. सध्या मिरखेल ते नांदेड या साधारणत: ४३ किलोमीटर अंतराचे विद्युतीकरण शिल्लक आहे. ही कामे काही ठिकाणी दुसऱ्या आणि काही ठि

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला

म्हवळ... ( ग्रामीण कथा ) दत्ता वंजे - नांदेड

दत्ता वंजे लिखित ग्रामीण कथा मव्हळ... मला चांगलं आठवतयं... तो चैत्राचा महिना अन ते अकरावीचे  दिवसं.. रानात पालव्या फुटलेल्या... अकरावी म्हणलं की सालभर अभ्यासाचा ताणचं नव्हता. म्हणून बापानं उरावर दोन म्हशी करून ठुल्या व्हत्या. बाप ज्या शेतात वाट्यानं काम करायचा, तिथचं म्या बी हे दोन डोबडं अवती भवती फिरवायचो. दिवस चांगला मावळतीला गेला की, म्हशी घराकडं हाणीत हाणीत झाडाझुडपाच्या बुडाला मयी नजर खेळायची. लवनाच्या कडेनं गावात यायची वाट होती. उन्हाळा थोडा  रंगात असल्यामुळे लवनाचं पाणी आटलेलं. काही डोबकाडं तळ गाठलेले तर काही वलाव्याखाली थंडगार जागा असलेले. लवनाच्या कडेने एड्या बाबळीचे बस्तान तर काही रामकाठ्याही होत्या. गावाच्या वरच्या शिवला म्हसोबा, जो आमच्या रोजच्या  वाटतला. म्हसोबाच्या मागे बाभळी मातर लईच होत्या. तिथंच एक पाण्याचा खोलच्या खोल ढवं होता. म्हश्यांना ते माहीत असल्याने, त्या घुसायच्या ढवातं अन पाणी पीत पीतचं बसायच्या फतकल मांडून. मंग आमची झाडाझुडपातली नजर जायची बाभळींच्या शेंड्याकडं.. अन तवा दिसलं एक गच्च म्हवळं.....    नजरेला म्हवळ दिसताच एकटाच मी हाय रं हाय रं करीत म्हसोबाच्या स

दर्जाहीन साड्या देऊन शासनाकडून महिलांची थट्टा: जनवादी महीला संघटनेचा आरोप

  किनवट, ता.१५(बातमीदार): महाराष्ट्र सरकारच्या कॅप्टीव्ह मार्केट योजने अंतर्गत दारिद्ररेषेखालील अंत्योदय योजनेत समावेश असणाऱ्या रेशन कार्ड धारकांना दर्जाहीन साड्यांचे वितरण सुरू आहे. असा आरोप अखिल भारतीय जनवादी महीला संघटनेच्या नेत्या शैलिया अर्जुन आडे यांनी केला.   रेशनकार्डावर चांगल्या दर्जाच्या साड्या द्याव्यात तसेच फक्त अंत्योदय रेशनकार्ड धारकांनाच न देता सरसकट साड्यांचे वितरण करण्यात यावे,अशी मागणीही त्यांनी केली. या साडीचा दर्जा अत्यंत सुमार असून पहिल्या दुसऱ्या धुण्यामध्ये या साड्यांचा पोचारा होईल असा आरोपही त्यांनी केला. ||आमदार, खासदारांना द्याव्या || काॅ.आडे म्हणाल्या की, राज्यातील आमदार खासदारांनी आणि त्यांच्या घरातील महिलांनी एक दिवस तरी हि साडी परिधान करावी. त्यातून त्यांना साडीचे पोत व दर्जा लक्षात येईल. सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या कॅप्टीव्ह मार्केट योजनेत वितरित होणाऱ्या साड्या यंत्र मागावर विणण्यात आल्याचे सांगण्यात येते. साडीची शासकीय किंमत महामंडळा तर्फे ई निविदे द्वारे केलेल्या करारानुसार सेवा शुल्का सह ३५५ रुपये अधिक ५ टक्के जीएसटी अशी निर्धारित केली आहे. ब

माजी नगराध्यक्षांचे घर फोडले लाखोंच्या ऐवजासह दागीनेही लांबवीले , सीसी टिव्हीची हार्ड डिस्क देखील चोरली

  तालुका प्रतिनिधी किनवट:- किनवटला रेल्वेस्थानक रस्त्यावरील माजी नगराध्यक्ष साजीद खान यांचे कुलूपबंद असलेले घर फोडून एक पिस्तूल, दहा ते बारा तोळे सोने आणि दोन ते तीन लाख रुपये रोख चोरट्यांनी लांबवली. म्हणजे विशेष चोरट्यांनी घरातील सीसीटीव्हीची हार्डडिस्कदेखील चोरून नेली. ही खळबळजनक घटना शनिवारी (ता. नऊ) सकाळी आठ ते दहादरम्यान घडल्याचा अंदाज आहे. पोलिसांनी सायंकाळी श्वान पथकास पाचारण केले होते; तसेच ठसेतज्ज्ञांचे पथकही दाखल झाले होते. माजी नगराध्यक्ष साजीद खान हे शुक्रवारी (ता. आठ) सायंकाळी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते. शनिवारी (ता. ९) सकाळी ११ वाजता त्यांना घरी चोरी झाल्याचे कळले. त्यांनी ही माहिती किनवट पोलिसांना दिली. नांदेड येथील श्वान पथक व ठसेतज्ज्ञ पथक सायंकाळी साडेसहाला साजीद खान यांच्या घरी दाखल झाले. आलमारीच्या लॉकरमधील दहा ते बारा तोळे सोन्याचे दागिने, रोख दोन ते तीन लाख रुपये आणि आठ राउंडची पिस्तूल चोरट्यांनी लांबविल्याचे साजिद खान यांनी पोलिसांना सांगितले. याबाबत किनवट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धनगर समाज संघर्ष समितीच्या युवक प्रदेशाध्यक्षपदी अमन कुंडगीर

  राज्यस्तरीय अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री मा.खा.डॉ. विकास महात्मे यांनी दिले नियुक्तीचे पत्र किनवट ः धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य च्या युवक प्रदेश अध्यक्षपदी अमन कुंडगीर यांची नियुक्ती करण्यात आली. धनगर समाज संघर्ष समिती महाराष्ट्र राज्यचे द्वितीय राज्यस्तरीय अधिवेशन रविवारी दि.10 मार्च 2024 रोजी क्षितिज पॅलेस अमरावती येथे पार पडले. या अधिवेशना दरम्यान राष्ट्रीय अध्यक्ष पद्मश्री मा.खा.डॉ. विकास महात्मे यांचे हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.        आपले ध्येय आरक्षण मिळविणे असून वाड्या, वस्ती, डोंगराळ भागातील शेवटच्या धनगर बांधवांपर्यंत पोहचवून त्यांचा विकास करण्यासाठी अमन कुंडगीर यांना मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.           अमन कुंडगीर हे नेहमी समाजासाठी धडपडत असतात. त्यांनी केलेले उल्लेखनिय कार्य व सतत समाजाच्या प्रश्‍नासाठी आंदोलने, मोर्चे, सभा, बैठका या सर्व बाबींचा विचार करून त्यांना युवक प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आले आहे.           धनगर समाजाचे ज्वलंत प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी व तळागाळातील प्रत्येक समाज बांधवांच्या समस्या आपण सोडवू असे

जागतिक महिला दिनानिमित्त संभाजी ब्रिगेड तर्फे महिलांचा सन्मान

  महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला एसटी चालक रब्बाना पठाण यांचा विशेष सन्मान किनवट प्रतिनिधी किनवट : किनवट येथे ८-मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान तर किनवट तालुक्यातील बोधडी येथील महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला एसटी चालक रब्बाना पठाण यांचा विशेष सत्कारही संभाजी ब्रिगेड किनवट शाखेच्या वतीने करण्यात आला. ८-मार्च जागतिक महिला दिनानिमित्त किनवट सारख्या आदिवासी दुर्गम भागामध्ये आरोग्य विभाग,पोलीस विभाग परिवहन महामंडळ भारतीय पोस्ट ऑफिस यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तुत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला.तर किनवट तालुक्यातील बोधडी येथील महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला एसटी चालक रब्बाना पठाण यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी पाटील सिरसाट तालुकाध्यक्ष सचिन पाटील कदम पोलीस उपनिरीक्षक मामीडवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज घडसिंग वाडगुरे,बोधमवाड,रायलवार ,शिंदे ,कावळे ,अविनाश महाजन, शुभम पांचाळ ,साईनाथ उत्तरवार, माया वाघमारे सौ.बोंतावार,फरहान

स्त्रीयात्त्वाची साखळी

ती एक नैसर्गीक प्राकृती... हलती, बोलती, चालती आकृती म्हणजे स्त्री... पूर्वीच्या काळी स्त्री म्हणजे एक चाकोरीबद्ध जीवन जगणारी अनेक निर्बंध सहन करणारी स्त्री होती.  पण जसजसं जग आधुनिक होत गेलं तसं तसं स्त्रियासुद्धा आधुनिक विचारांच्या होतं गेल्या. आजची स्त्री महिला ज्या उच्चपदावर कार्य करीत  आहेत त्यानुषंगाने घरातील बंधने त्यांच्या वरील सेल होताना दिसत आहेत .   आज पुरुषांपेक्षा स्त्रिया ह्या  मोठा पदावर कार्यरत असून ..जे कार्य पुरुष करीत आहेत व त्यांची मक्तेदारी दाखवत आहेत. त्याच क्षेत्रामध्ये महिलां कंबर कसून  कार्यरत आहेत. उदा: संरक्षण क्षेत्र, विमान, रेल्वे वाहतूक क्षेत्र, अंतराळायीन क्षेत्र, न्यायालयीन क्षेत्र अश्या अनेक अवघड समजली जाणारी क्षेत्रे याचबरोबर शेती-ग्रहउद्योग अशी बरीच क्षेत्रे आज महिलांनीकाबिज केली आहेत. व त्यात स्त्रिया अतुलनीय अशी प्रगती ही करीत आहे.  आजच्या घडीला पाहता महिला व मुली या शिक्षणाच्या क्षेत्रात सुद्धा आघाडीवर आहेत. पूर्वीच्या काळी स्त्रीयां वरती अनेक बंधने होती त्या शाळेत जात नव्हत्या, शाळेमध्ये जाण्यासाठी त्यांच्या वर बंधने घातली जात होती. परंतु आजचे चित्

संत चिमणाजी महाराज पुण्यतिथी निमित्त विविध सत्राचे आयोजन

  किनवट: भारतीय बौद्ध महासभा शाखा अंबाडी ता.किनवट च्या वतीने दि.१२ मार्च रोजी महान संत चिमणाजी महाराज यांची ८७ वि  पुण्यथिती तथा बौद्ध मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त बौद्ध उपासक,उपसिकांनी व आंबेडकरी विचारांच्या अनुयायांनी उपस्थित राहावे असे आवाहन संयोजन समितीच्या जाहीर पत्रकातून केले आहे    दरवर्षी  ठिकाणी अंबाडी ता.किनवट येथे कार्यक्रमाचे आयोजन केल्या जाते हमखास मराठवाडा,विदर्भ व तेलंगणा राज्यातून बौद्ध उपासक व  चिमणाजी महाराज यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने येत असतात.     पहिल्या सत्रात सकाळी ठीक साडे नऊ वाजता सतिष गिरीधर पाटील यांच्या हस्ते पंचशील धम्म ध्वजाचे ध्वजारोहण होईल दुसऱ्या सत्रात दुपारी चार ते सात यावेळेत भोजनदान होईल तिसऱ्या सत्रात सायंकाळी पाच ते सात या वेळेत पूज्य भदंत कीर्ती आंनदबोधि,नालंदा बुद्धविहार तळेगाव जिल्हा रायगड यांचे धम्मदेशना होईल. चौथ्या सत्रात सायंकाळी आठ ते दहा या वेळेत अविनाश भारती (युवा व्याख्याते पुणे ) यांचे प्रबोधनपर मार्गदर्शन होईल. पाचव्या सत्रात रात्री दहा वाजेपासून महाराष्ट्रचे ख्यातनाम कव्वाल संविधान मनोहरे (अमरावती)

सुगत नगराळे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या किनवट तालुका अध्यक्षपदी निवड

  किनवट शहर प्रतिनिधी/ राजेश पाटील:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थापने पासुनचे जुने धडाडीचे कार्यकर्ते सुगत नगराळे यांची निवड तालुका अध्यक्ष ( युवक) पदी निवड झाल्या बद्दल तालुका अध्यक्ष संजय सिडाम , शहर अध्यक्ष हबीब चव्हाण , जिल्हा कार्याध्यक्ष इसाखान सरदार खान, जिल्हा उपाध्यक्ष इम्रान खान, रितेश कनाके, चेतन मुंडे, नवीन जाधव यांनी अभिनंदन केले आहे सदरील  नियुक्ती पत्रावर जिल्हाध्यक्ष अतुल हिंगमिरे, यांची स्वाक्षरी आहे तर राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, प्रांताध्यक्ष सुनिल तटकरे, युवक प्रांताध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या आदेशावरून त्यांची निवड करण्यात आली आहे.

युवक काँग्रेसचे नांदेड जिल्हा सचिव राहुल सर्पे यांच्या वाढदिवसानिमित्त किनवट येथे भोजनदान वाटप

  किनवट ता.प्रतिनिधी: ०३ मार्च युवक काँग्रेसचे नांदेड जिल्हा सचिव राहुल गांधी यांचा वाढदिवस महात्मा फुले चौकात भोजनदान वाटप करून उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शुभम पाटील, संघर्ष घुले, कामेश मुनेश्वर, सुरज भरणे, सम्राट सर्पे, रवी कांबळे, विशाल भरणे, विनोद भरणे, दया पाटील, रुपेश भवरे, प्रशिक मुनेश्वर, अनिल कांबळे, जागरलावार, राजु कावळे, भैया भवरे,निवेदक कानिंदे, ब्रम्हा एडके, सतिश कापसे, आकाश सर्पे, निक सर्पे, अरुण शेंद्रे ,योगेश भवरे, निखिल सर्पे, अनेक मित्र मंडळी आदी उपस्थित होते.

गोंडर कादंबरीचा वाचकवर्ग सिंगापुरात

  - सिंगापूर सोबत जपान आणि कॅनडामध्येही गोंडर कादंबरीचे वाचक नांदेड : येथील प्रसिद्ध कादंबरीकार अशोक कुबडे यांची गोंडर ही कादंबरी साहित्य क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरली असून कादंबरी विक्रीचे कादंबरी प्रसारणाचे आणि पुरस्काराचे अनेक विक्रम कादंबरीने मोडीत काढलेले आहेत. गोंडर ही कादंबरी जेव्हा प्रकाशित झाली तेव्हा प्रकाशनपूर्व पहिल्या आवृत्ती विकल्या गेली त्यानंतर सबंध महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका, खेडोपाडी ही कादंबरी वाचकांपर्यंत पोहोचली आहे. या कादंबरीला महाराष्ट्रातील मान्यवर एकूण सोळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत तसेच आकाशवाणीवर क्रमशः वाचनाने अभिवाचनाने ही कादंबरी अजून सर्वजण पोहोचली आहे.हे सर्व होत असताना कादंबरी ही बहुचर्चित कादंबरी म्हणून गोंडर कादंबरीचे नाव अग्रेसर आहे. अशातच गोंडर कादंबरीच्या नावलौकिकामध्ये अजून एक भर पडली असून गोंडर कादंबरी साता समुद्रा पार असं म्हटल्याप्रमाणे सिंगापूर येथे पोहोचली आहे. सिंगापूर येथे गोंडर या कादंबरीचे वाचक असून त्याचबरोबर जपान आणि कॅनडा या ठिकाणी सुद्धा गोंडर ही कादंबरी वाचकांपर्यंत पर्यंत पोहोचली आहे. या कादंबरीचे वाचक सबं