Skip to main content

राष्ट्रपिता जोतिराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन




 ✒️ राजेश पाटील

किनवट शहर प्रतिनिधी:-

राष्ट्रपिता जोतीराव यांची १९७ वीफुले व राष्ट्र निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी संयुक्त सार्वजनिक जयंती उत्सव सोहळ्या निमित्त भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती उत्सव समितीचे अध्यक्ष गौतम पाटील यांनी दिली आहे.

११ एप्रील ते १४ एप्रील दरम्यान विविध सामाजिक उपक्रम तथा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे

११ एप्रिल रोजी महात्मा फुले चौक येथील महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या स्मारक परिसरात अभिवादन व ध्वजारोहन कार्यक्रम होईल 

नंतर किनवट परिसरात  सकाळी दहा वाजता १० वी व १२ वीच्या विद्यार्थ्यांकरीता मार्गदर्शन (व्याख्यान) शिबिर होईल या कार्यक्रमास मार्गदर्शक म्हणून  (बळीराम पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा व्याख्याते , अभ्यासक ) डॉ. पंजाब शेरे, रत्नदीप गंगाळे (सहाय्यक प्राध्यापक महात्मा ज्योतीबा फुले कॉलेज ऑफ सोशल वर्क, संशोधन अधिकारी टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई ), स्वप्निल भालेराव (समतादुत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन संस्था बार्टी , पुणे, जनसंपर्क अधिकारी ),

हे उपस्थित राहणार आहेत तर दुपारी १२ वाजता रांगोळी स्पर्धा महिलां करिता होणार आहेत .

सांयकाळी ६ वाजता इयत्ता ५ वी ते१२ वी च्या विद्यार्थ्यांसाठी फुले- आंबेडकर जिवन चरित्र या विषयावर वकृत्व स्पर्धेचे आयोजन होणार आहे.

१२ एप्रिल रोजी ५ ते २५ वयोगटातील स्पर्धकासाठी सांस्कृतिक नृत्य स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे सदरील नृत्य बुद्ध- भीम गितावर आधारित राहील .

१४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पंचशिल ध्वजारोहण होईल या नंतर १० ते ४ या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात 

भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे या शिबिरास डॉ. सुनंदा भालेराव, डॉ. मनोज घडसिंग, डॉ. सुरज वाकोडे, डॉ. महेंद्र ना. कांबळे, डॉ. पल्लवी कांबळे, डॉ. अश्वघोष गायकवाड,

डॉ. संजय लोमटे, डॉ. अभिजित ओव्हळ यांच्या तर्फे मोफत वैद्यकीय तपासणी होणार आहे तर मराठवाडा पॅथोलॉजी लॅब किनवट तर्फे मोफत रक्त तपासणी होईल 

या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे फुले - आबेंडकर सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष गौतम पाटील, उपाध्यक्ष निखिल दि. कावळे, योगेश भवरे ,सचिव प्रशिक मुनेश्वर, सह सचिव आकाश सर्पे, संघर्ष घुले, संयोजक सुरेश कावळे, कोषाध्यक्ष आकाश आळणे , सुरज भरणे, सहकोषाध्यक्ष स्वप्नील सर्पे, निवेदक कानिंदे व पदधिकारी यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...