महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला एसटी चालक रब्बाना पठाण यांचा विशेष सन्मान
किनवट प्रतिनिधी
किनवट : किनवट येथे ८-मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान तर किनवट तालुक्यातील बोधडी येथील महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला एसटी चालक रब्बाना पठाण यांचा विशेष सत्कारही संभाजी ब्रिगेड किनवट शाखेच्या वतीने करण्यात आला.
८-मार्च जागतिक महिला दिनानिमित्त किनवट सारख्या आदिवासी दुर्गम भागामध्ये आरोग्य विभाग,पोलीस विभाग परिवहन महामंडळ भारतीय पोस्ट ऑफिस यासारख्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तुत्वान महिलांचा सन्मान करण्यात आला.तर किनवट तालुक्यातील बोधडी येथील महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला एसटी चालक रब्बाना पठाण यांचा विशेष सत्कार यावेळी करण्यात आला.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी पाटील सिरसाट तालुकाध्यक्ष सचिन पाटील कदम पोलीस उपनिरीक्षक मामीडवार, वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज घडसिंग वाडगुरे,बोधमवाड,रायलवार ,शिंदे ,कावळे ,अविनाश महाजन, शुभम पांचाळ ,साईनाथ उत्तरवार, माया वाघमारे सौ.बोंतावार,फरहान सलीम पठाण, रिझवाना हयातखान पठाण,धनश्री खराटे,कौशल्या इंगळे, घोडगाटे यांच्यासह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचारी व संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment