Skip to main content

गोंडर कादंबरीचा वाचकवर्ग सिंगापुरात

 



- सिंगापूर सोबत जपान आणि कॅनडामध्येही गोंडर कादंबरीचे वाचक

नांदेड : येथील प्रसिद्ध कादंबरीकार अशोक कुबडे यांची गोंडर ही कादंबरी साहित्य क्षेत्रात एक मैलाचा दगड ठरली असून कादंबरी विक्रीचे कादंबरी प्रसारणाचे आणि पुरस्काराचे अनेक विक्रम कादंबरीने मोडीत काढलेले आहेत. गोंडर ही कादंबरी जेव्हा प्रकाशित झाली तेव्हा प्रकाशनपूर्व पहिल्या आवृत्ती विकल्या गेली त्यानंतर सबंध महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका, खेडोपाडी ही कादंबरी वाचकांपर्यंत पोहोचली आहे. या कादंबरीला महाराष्ट्रातील मान्यवर एकूण सोळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहेत तसेच आकाशवाणीवर क्रमशः वाचनाने अभिवाचनाने ही कादंबरी अजून सर्वजण पोहोचली आहे.हे सर्व होत असताना कादंबरी ही बहुचर्चित कादंबरी म्हणून गोंडर कादंबरीचे नाव अग्रेसर आहे. अशातच गोंडर कादंबरीच्या नावलौकिकामध्ये अजून एक भर पडली असून गोंडर कादंबरी साता समुद्रा पार असं म्हटल्याप्रमाणे सिंगापूर येथे पोहोचली आहे. सिंगापूर येथे गोंडर या कादंबरीचे वाचक असून त्याचबरोबर जपान आणि कॅनडा या ठिकाणी सुद्धा गोंडर ही कादंबरी वाचकांपर्यंत पर्यंत पोहोचली आहे. या कादंबरीचे वाचक सबंध जगभर आहेत. असेही म्हणायला हरकत नाही. अशी गोंडर ही अशोक कुबडे यांची कादंबरी इसाप प्रकाशनाचे संचालक दत्ता डांगे सरांनी मानधनासह स्वीकारून प्रकाशित केली आहे आणि या कादंबरीने अनेक नवीन विक्रम केलेले आहेत.आज सिंगापूर येथेही पोहोचले आहे आपण एकीकडे वाचक नाहीत हा सूर साहित्यात असतांना गोंडर या कादंबरीच्या वाचकांच्या प्रतिसादाच्या माध्यमातून खरोखरच दर्जेदार साहित्याला वाचक आहेत अशी एक मोठी चर्चा गोंडर या कादंबरीच्या निमित्ताने साहित्य वर्तुळात होत आहे. अलीकडील महाराष्ट्रातील अनेक विक्रम मोडणारी ही कादंबरी आता सिंगापूरून अशोक कर्णिक या वाचकांनी हा कादंबरी चा फोटो टाकून साहित्य विश्वात एक खळबळ निर्माण केली आहे.यातून गोंडर ही कादंबरी सर्व दूर पोहोचल्याचे निदर्शनास येते. कादंबरीच्या सर्व दूर पोहोचण्याबद्दल,पुरस्काराबद्दल आणि लोकप्रियतेबद्दल कादंबरीचे लेखक अशोक कुबडे यांचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

सेवा फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान

  अदिलाबाद:- सेवा फाऊंडेशन यांच्या तर्फे ता.१ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक सिराज भाई आदिलाबाद कर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते यावेळी टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सय्यद नदीम आसिफ भाई लाईफ सेल क्लिनिकल लॅब किनवट यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सेवा फाऊंडेशन आदिलाबाद जिल्हा टीमनी उत्कृष्ट असे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजन केले यावेळी 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी  जिल्हाध्यक्ष सय्यद नदिम यांनी स्वतः रक्तदान केले व युवकांना प्रोत्साहन दिले यावेळी  रिम्स डायरेक्टर डॉक्टर जयसिंग राठोड,डॉक्टर नरेंद्र राठोड ऍडिशनल डी एम एच ओ डॉक्टर गजानंद लॅब,मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारसनाथ सेवा फाऊंडेशन प्रेसिडेंट खाजा सिराजुद्दीन ,शफिक अहमद ,अथेर इमरान , असलम खान शेख इस्माईल ,तबरेज खान , अहमद हाफिज समीर मोहम्मद नावेद रिजवान खॉन, मो. समीर खॉन मोहमद सलीम, खान मोहमद, असीफ इच्चोडा, सामाजिक कार्यकर्ता इकबाल पटेल, अबु तल्हा, शेख मशीर, शेख मेहबूब तसेच सेवा फाऊंडेशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते