Skip to main content

होळी आणि गाणी....




 होळी आणि गाणी..

होळी हा असा एक सण आहे, जो केवळ भारतातच नाही तर भारताबाहेरील अनेक देशांमध्ये मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. होळीच्या दिवशी विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांची रेलचेल सुद्धा राहते. अलीकडच्या काळात होळी सेलिब्रेशन करण्यासाठी वेगवेगळे इव्हेंट ऑर्गनाइज केले जात आहेत. एकमेकांना रंगाने रंगवून होळी स्पेशल गाणी लावून खूप धमाल केली जाते. .

होळी खेळताना गाणी वाजवली नाही तर ही होळी अपूर्ण वाटते. आधीच्या काळापासून होळीच्या दिवशी लोक स्वतः गाणी म्हणायचे, कालांतराने त्यात गाण्यांची वाढ झाली. त्याच गाण्यांच्या तालावर संपूर्ण लोक नाचताना दिसत आहेत. परंतू होळी तोंडावर आली असताना धमाल करायला गाणीच आठवत नाहीत…मराठी आणि हिंदी गाण्यांमुळे होळीच्या सणाला खुप धमाल घातली जाते. चला तर मग, या ह्या होळीला गाण्यांवर नाचण्यासाठी सज्ज व्हा.

"खेळताना रंग बाई होळीचा होळीचा... फाटला गं कोना माझ्या चोळीचा" १९७१ वर्षातील हे गाणं जुनं आहे पण होळीसाठीच पक्कं समीकरण आहे. सुलोचना चव्हाण यांनी गायलेलं हे गाणं विठ्ठल शिंदे यांनी ते संगीतबद्ध केलेलं आहे.

“चिकना चिकना म्हावरा माझा” या अल्बम मधील " आमच्या दाराशी हाय शिमगा" या गाण्याला होळीच्या दिवशी विशेष महत्त्व आहे . या गाण्याच्या बोलातून समस्त कोळी- आगरी बांधवांच्या भावना व्यक्त झालेल्या आहेत. 

१९७५ साली शोले चित्रपटातील आनंद बक्षी यांनी लिहिलेलं, आर. डी. बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं आणि किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्याबद्दल काय बोलावं. शोले चित्रपटाने स्वतःचा असा एक इतिहास रचला हे सगळ्यांनाच माहीत आहे. "होली कब है या संवादासह

"होली के दिन दिल जब खिल जाते है...  रंगो में रंग मिली जाते है... गिले शिकवे भूल के दोस्तों... दुश्मन भी गले मिल जाती है..."अशा या गाण्याच्या बोलांनी त्या काळात प्रचंड अशी लोकप्रियता मिळवली आहे. होळी आली आणि हे गाणं वाजलं नाही असं कधीच होणार नाही.

स्वतः अमिताभ बच्चन याने गायलेलं सिलसिला या चित्रपटातील “रंग बरसे भीगे चुनरवाली...रंग बरसे” हे गाणं हरिवंशराय बच्चन यांनी शब्दबद्ध केले आहे. १९८१ साली हा चित्रपट आला होता. या गाण्याची लोकप्रियता आजही तेवढीच आहे.

२००३ साली प्रदर्शित झालेल्या बागबान या चित्रपटातील होळी स्पेशल गाणं म्हणजे "होरी खेले रघूवीरा....अवध में "होरी खेले रघूवीरा...." अमिताभ बच्चन, अलका यागनिक, सुखविंदर सिंग आणि उदीत नारायण यांनी गायलेलं हे गाणं आदेश श्रीवास्तव यांनी संगीतबद्ध केलेलं आहे.

मोहब्बते या चित्रपटातील गाणी सुद्धा तेवढीच लोकप्रिय झाली होती. "सोनी सोनी.... अखियों वाली" हे गाणं सुद्धा होळी स्पेशल असून आनंद बक्षी यांनी लिहिलेलं असून जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. 

“जुनं ते सोनं” कितीही नवीन गाणी आली तरी काही गाणी ही जूनी असली तरी आजही ऐकायला गोड वाटतात. “अंग से अंग लगाना” हे “डर” या चित्रपटातील गाणही तसच आहे. शाहरुख खान, सनी देओल आणि जुही चावला यांच्यावर चित्रित झालेलं हे गाणं आहे.

रितेश देशमुख यांचा लयभारी आणि माऊली  

या चित्रपटातील रितेश देशमुख आणि जेनेलिया यांच्यावर चित्रित झालेलं गाणं "आला होळीचा सण लय भारी" आणि

"ज़रा पिरमानं वाग, माझा लयभारी स्वॅग…तुझ्या लवर चा टॅग मला देवून टाक…आत्ता कशाचा राग…हा तर पेरमाचा डाग…

तुझ्या साडीला सर्फ लावून धुवून टाक…"

ह्या दोन्ही गाण्यांना अजय अतुल यांनी संगीतबद्ध केलेलं आहे.

आताच्या तरूणाईला वेड लावणारी ही गाणी आहेत.

हल्लीच्या काळात ही होळीवर खुप गाणी चित्रित झाली आहेत आणि प्रचंड लोकप्रियता ही या गाण्याला मिळाली आहे. 

" रेस अगेन्स्ट द टाईम”वक्त या चित्रपटातील "उफ्फ ये होली हाय ये होली..." हे गाणं अक्षय कुमार आणि प्रियांका चोप्रा यांच्यावर चित्रित झालेलं आहे. 

२०१७. मधील चित्रपट जॉली एल. एल. बी.या चित्रपटातील "गो 

पागल" हे गाणं असंच काहीसं आहे. निंदी कौर आणि रफ्तार यांनी हे गाणं गायलं आहे.“ये जवानी है दिवानी” या चित्रपटातील “बलम पिचकारी…जो तुने मुझे मारी",२०१९ साली हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा वॉर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यातील "जय जय शिवशंकर" हे लोकांना विशेष आवडलं. 

 " अरे सुन साराअअअअआ रंग बता ब्ल्यु या लाल....बद्री की दुल्हनियाँ" हे गाणं सुद्धा होळी खेळताना आवर्जून लावलं जातं. बद्रीनाथ की दुल्हनियाँ या चित्रपटातील हे गाणं आलिया भट्ट आणि वरून धवण यांच्यावर चित्रित झालेलं आहे. याचबरोबर

"अरे जा रे हट हट ना छुना मेरा घुंगट... पलट के दूंगी आज तुझे गाली रे...", जुगी जी वा जुगी जी", "अगं नाच नाच नाच राधे उडुया रंग",  "आज गोकुळात रंग खेळतो हरी राधिके जरा जपून जा तुझ्या घरी"... आणि रामलीला सिनेमातील "लहू मूँह लग गया  .."हे गाणंही गरबा आणि होळीमुळे खास लक्षात राहिलेलं गाणं आहे. 

 खरं तर मित्रांनो, अजून अशी बरीच हिंदी-मराठी चित्रपटातील गाणी आहेत जी होळीशी त्यांचा संबंध नसताना देखील तुम्हाला रंगपंचमीच्या दिवशी ऐकायला मिळतील. पण आज मी तुम्हाला जी गाणी सांगितली आहेत ती फक्त होळी  यावर चित्रित करण्यात आलेली आहेत. होळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी निवडा ही काही खास गाणी नैसर्गिक रंगासह. तुम्हाला पुन्हा एकदा रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा! 




रूचिरा बेटकर, नांदेड.

9970774211

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...