Skip to main content

Posts

Showing posts from June, 2022

प्रधानसांगवी आरोग्य उपकेंद्रातील वृक्षारोपण करुन ग्रामपंचायतीने संगोपण केलेल्या झाडांची डाॅक्टर,ए.एन.एम व आरोग्य सेवीके कडुनच कत्तल...

  किनवट (तालुका प्रतिनिधी) एकीकडे संपुर्ण विश्वात प्रत्येक देश प्रदुषणाची झळ सोसत असल्यामुळे वृक्षारोपणावर भर देत आहे त्यातच आपला देश व देशातील प्रशासन दरवर्षी विविध योजना अंतर्गत वेगवेगळ्या विभागामार्फत कोट्यावधीचा निधी खर्च करुन झाडे लावा झाडे जगवा या उक्तीनुसार गावागावात वृक्ष लावुन त्यांना वाचवण्यात पुर्ण शक्ती लावत असताना किनवट तालुक्यातील प्रधानसांगवी आरोग्य उपकेंद्रातील काही कर्मचा-यांनी मात्र कहरच केला कुणालाच कल्पना न देता गावातील पे्ट्रोलवर चालणा-या मशीन धारकांना गुत्ते देवुन चक्क झाडेच कापुन टाकली.     याबाबतीत सविस्तर वृत्त असे की,किनवट तालुक्यातील प्रधानसांगवी हे काही वर्षापुर्वी मुख्यमंत्री दत्तक असलेले गाव ज्यात स्मार्ट व्हिलेज या योजनेत दहा लाखांच बक्शीसही मिळवळ. विविध विकास कामे व योजना राबवुन शाळा,अंनवाडी,आरोग्य केंद्रात सर्व सुखसुवीधा पुरवलेल्या आहेत.त्यातच काही वर्षा पुर्वी ग्रामपंचायतीने आरोग्य केंद्राच्या आवारात संरक्षक भिंतीच्या कडेने सुंदर वृक्षारोपण करुन ती झाडे वाचवलीसुद्धा चहुबाजुंनी थंडगार सावली देणा-या झाडाखाली उन्हाळ्यात गावकरी,मुले विसावा घेत होती.पण कुठु

शिक्षा म्हणजे काय? भारतातील शिक्षेचे प्रकार कोणते?

  किनवट (तालुका प्रतिनिधी) माझ्या महाराष्ट्रतील तमाम बंधू व भगिनींनो आज आपण एका नवीन विषय घेऊन जे सर्वांच्या जिव्हाळ्याचा तर आहेच परंतु त्याची माहिती ही समाजाला असणे गरजेचे आहे ही माहिती चांगले परिणाम करणारी आहे म्हणतात ना न्यायनिर्णय व शिक्षा ह्या त्या देशातील सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय जीवनाचे यशापयश प्रदर्शित करत असते. त्याचप्रमाणे आपण आपल्या न्यायव्यवस्थेवर श्रद्धा ठेवतो न्यायव्यवस्था ही भारतीय संविधानाची अंमलबजावणी होत आहे का नाही यावर लक्ष ठेवून असते जर एखाद्या व्यक्तीने कायदा पाळला नाही तर त्याला शिक्षा होत असते. म्हणतात ना "इतरावर जर बसून सदाचाराचा परिपोष करणे ही नीती नव्हे" त्याप्रमाणे आपण शिक्षा पद्धती ही विचारपूर्वक स्वीकारलेली पद्धती आहे. भारतामध्ये अनेक प्रकारच्या शिक्षा पद्धती अवलंबिल्या आहेत त्यामध्ये "शिक्षाही बदल घेण्याच्या भावनेतून नसावी ती गुन्ह्याला धडा शिकवणारी व  अपराध्याला सुधारणारी असावी" या भावनेतून शिक्षा दिली जावी हे विचारशैली भारतात स्वीकारण्याचा मानस परमपूज्य संविधानाने तसेच वैधानिक कायद्याद्वारे केलेला आहे.

अखिल भारतीय परीवार तर्फे लक्ष्मीपती दोनपेल्लीवार व रमेश दिसलवा यांचा सन्मान

किनवट:- २५ जून  आज किनवट शहरात साईबाबा मंदीर येथे अखिल भारतीय परिवार पार्टी चे वतीने किनवट येथिल साहित्य सम्राट आण्णाभाऊ साठे बहूऊदेशीय सेवाभावी संस्थेच्या कार्या बद्दल सामुहिक विवाह सोहळा घेऊन सामाजीक कार्यात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्ल सन्मानपत्र स्मृतिचिंना देवून संस्थेचे सचिव रमेश दिसलवार व अध्यक्ष  दोनपेल्लीवार यांचे सन्मानित करण्यात आले या बद्दल मातंग शक्ती संघटना , फोटो ग्राफर युनियन , व काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या ....!!!

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पत्रकारांने अपघातग्रस्त व्यक्तीला दिले जीवदान

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील किनवट- माहुर रस्त्यावर अय्यपा स्वामी मंदीराजवळ अज्ञात इसमाचा अपघात झाला ही बातमी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे किनवट तालुका उपाध्यक्ष राजेश पाटील तात्काळ घटनास्थळी पोहचले व रुग्णवाहिका गाडीला फोन करून बोलावून घेतले व घटनास्थळी जमलेल्या लोकांच्या मदतीने अपघात झालेल्या व्यक्तीला रुग्णवाहिकामध्ये बसवून अपघात झालेल्या रुग्णास गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातग्रस्त व्यक्तीचा जीव वाचला असून ते सुखरूप आहेत. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे किनवट तालुका उपाध्यक्ष राजेश पाटील यांनी रिस्क घेऊन अपघातग्रस्त व्यक्तीला जीवदान दिल्यामुळे संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य महिलाध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, सर्व राज्य व विभागीय पदाधिकारी, मराठवाडा संपर्क प्रमुख सुर्यकांत तादलापूरकर, कार्याध्यक्ष हुकुमत मुलाणी, मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव, नांदेड जिल्हाध्यक्ष संजयकुमार गायकवाड, किनवट तालुकाध्यक्ष आशिष शेळके ,कार्याध्यक्ष सय्यद नदीम, सचिव नसीर तगाले,शेख अतीफ, प्रणय कोवे, विशाल गिमेकार, रमेश परचाके इंद्रपाल कांबळे, गौतम कांबळे, राज म

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने वारकऱ्यांना प्रसाद वाटप

  पुणे : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ,पुणे जिल्हा शाखेच्या वतीने पंढरपूरच्या दिशेने पायी चालत चाललेल्या वारकऱ्यांना प्रसाद वाटप करण्यात आला. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे युवाध्यक्ष प्रणव बुर्डे व पदाधिकारी उपस्थित होते. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने आजपर्यंत विविध प्रकारे मदतीचा हात पुढे केला आहे. कोविड व लॉकडाऊन काळात गोर-गरिबांना अन्नधान्य, ज्या भागात महापुरामुळे कुटुंबाचे नुकसान झाले त्यांना संघटनेचे माध्यमातून मदत करण्यात आली.  वारकरी बांधव विठ्ठलाच्या भक्तीभावाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पायी चालत चालत आनंदाने पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाऊन तेथे साकडे घालतात. मी माझ्या शेतामध्ये पेरणी केली आहे माझे शेत बहरून येऊ दे, आबादन होऊ दे त्यासाठी विठ्ठला पाऊस वेळेवर येऊ दे, आमच्यावर कृपादृष्टी कर अशी भावनिक साद सर्व वारकरी विठ्ठल चरणी घालून आपल्या गावी परत येतात. अशा वारकरी बांधवांसाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ नेहमीच पुढे असेल असे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांनी सांगितले आहे. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी व वारकरी

संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या हस्ते शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन व वृक्षारोपण

  लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या हस्ते लातूर (पाखरसांगवी) येथील श्री रवींद्रनाथ टागोर शाळेच्या वाढीव वर्गाच्या खोलीचे भूमिपूजन, नियोजित जागेत लिंब, चिंच, आंबा, गवती चहा, इलायची आदी वृक्षांचे रोपण करण्यात आले. तसेच सहावी, सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांना पुस्तके वाटप करण्यात आले. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे, जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष सोनवणे, जिल्हा संपर्क प्रमुख रियाज शेख, शाळेच्या मुख्याध्यापिका मेघा पाटील, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.  विद्यार्थ्यांनी शिक्षण घेऊन आपले आई-बाबा, गाव, तालुका, जिल्हा, राज्य व देशाचे नाव रोशन करावे यासाठी संस्था सचिव वैशालीताई पाटील सातत्याने प्रयत्न करीत आहेत. विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, मोफत ड्रेस,मोफत भोजन, मोफत प्रवास अशा विविध प्रकारच्या सवलती देत संस्थेच्या माध्यमातून दिल्या जात आहेत. विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून श्री रवींद्रनाथ टागोर विद्यालय, पाखरसांगवी ही शाळा यशस्वीतेकडे वाटचाल करीत अस

मोलमजुरी करणाऱ्या डुंबरेची लेक ९९.४० गुण मिळवुन जुन्नर तालुक्यात प्रथम

  जुन्नर:- कु.श्रावणी रामदास डुंबरे ओतूर ही  इयत्ता १० वीत  ९९.४०% गुण मिळावून जुन्नर तालुक्यात प्रथम आली आहे.तीची आई मोलमजुरी करते तर.... वडील चाकण येथे सेक्युरीटी गार्ड म्हणून नोकरी  करतात. जिद्द, सातत्य, परिश्रम , ठरवलेले ध्येय यांच्या जोरावर श्रावणीने मिळविलेले यश नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी आहे. एकीकडे इंग्लिश मिडीयमसाठीचा आग्रह , खाजगी ट्युशन, स्वतंत्र अभ्यास खोली हवे ते लाड पुरविण्याचा पालकांचा  प्रयत्न या बाबी एकीकडे आणि दुसरीकडे कुडाचे घर, सारवलेली जमीन , घरकामासाठी करावी लागणारी मदत , कुठलाही खाजगी क्लास नाही , कुठल्याही सुविधा नाहीत. तरीही एवढे गुण मिळविणे ही साधी बाब नव्हे. यावरून एक गोष्ट नक्की लक्षात येते की , बुध्दीमत्ता ही कुणाची मिरासदारी नाही. खरं तर सरस्वतीला गरीबांच्या झोपडीत राहायला आवडते.आणि सरस्वती आली की  पाठोपाठ आपोआप लक्ष्मी येतेच.यानिमित्ताने पालकांनी दुसरीही गोष्ट लक्षात घ्यावी. आपला पाल्य महत्त्वाच्या वर्गात आहे म्हणून , तो म्हणेल ते सर्वच लाड पुरवत बसू नये. कधीतरी नाही म्हणायची सवय सुध्दा ठेवावी. नाही तर कधी मनासारखे घडले नाही की मुले कुडतात ,कोलमडतात किं

जनसंपर्क कार्यालयात शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा

किनवट प्रतिनिधी:  माननीय खासदार श्री हेमंतभाऊ पाटील यांचे किनवट येथील जनसंपर्क कार्यालयात शिवसेनेचा ५६ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंतभाऊ पाटील यांचे किनवट येथील जनसंपर्क कार्यालय कार्यालयात शिवसेना पक्षाच्या ५६ व्या वर्धापन दिना निमित्त हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला. यावेळी तालुकाप्रमुख श्री. बालाजी मुरकुटे, शहरप्रमुख श्री. संतोष येलचलवार, माजी नगरसेवक श्री. शरद जयस्वाल, समिती सदस्य श्री. मारोती सुंकलवाड, युवासेना तालुका प्रमुख श्री. प्रमोद केंद्रे, उपतालुका प्रमुख श्री. अतुल दर्शनवाड व कपिल रेड्डी, श्री. सुरेश घुमडवार, श्री. अब्दुल वसीम,राजू सातूरवार, साई पालेपवाड, प्रितेश पवार, किरण येरमे आणि जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड यांच्यासह शिवसेनाbपदाधिकारी कार्यकर्ते व मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उत्कृष्ट कार्याचा झंजावात कायम ठेवणार करमाळा तालुका कार्यकारिणीचा बैठकीत निर्धार

करमाळा, सोलापूर :  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ करमाळा तालुका कार्यकारिणीची नुकतीच आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नियम व अटी सांगण्यात आल्या. तसेच येत्या वर्षभरात संघाच्या माध्यमातून कोणकोणते उपक्रम राबविता येतील यावर चर्चा करण्यात आली. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उत्कृष्ट कार्याचा झंजावात कायम ठेवणार असल्याचा या बैठकीत निर्धार करण्यात आला. त्यानंतर करमाळा तालुकाच्या वतीने जिल्हा अध्यक्ष सौ. आशाताई चांदणे, उपाध्यक्षा विजया कर्णवर, जिल्हा सचिव  प्रमिलाताई जाधव यांचा सन्मान करण्यात आला. तसेच नुतुन सदस्या सौ. माधुरी कुंभार यांचाही सन्मान केला. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या करमाळा तालुका पदाधिकाऱ्यांचा उत्साह पाहून सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा आशाताई चांदणे यांनी सर्वांचा सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून त्यांना प्रेरणा दिली. या आढावा बैठकीस प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा सौ. आशाताई चांदणे, जिल्हा उपाध्यक्षा विजयाताई कर्णवर, जिल्हा सचिव प्रमिलाताई जाधव, करमाळा तालुका अध्यक्ष अंगद भांडवलकर, उपाध्यक्

जवार उलुम उर्दू स्कूल ची तुबा तगाले ८८.४० गुण घेऊन शाळेत पहिली मोहम्मद सुफीयांन ८८ गुण घेऊन दुसरा येऊन शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे टिपू सुलतान ब्रिगेड जिल्हाध्यक्ष तर्फे पेढा भरवुन सत्कार

  किनवट/प्रतिनिधी:जवाहेर उलुम उर्दू स्कूल ची तुबा सौदा नासिर तगाले 88.40% घेऊन शाळेत पहिली  तर मुलांत 88% घेवून मोहम्मद सुफीयांन कासिफ महमद साजीद  दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. या यशा बद्दल टिपु सुलतान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष  सय्यद नदीम नांदेड, टिपू सुलतान ब्रिगेड तालुकाध्यक्ष अजमल अमीर भाई मुनवर भाई आदिनी पेढा भरवुन पुष्पगुच्छ देवुन सत्कार केला तर जवाहर उलुम उर्दू शाळेचा निकाल 96% लागला आहे. सर्व उतीर्ण विद्यार्थ्यांचे शाळा प्रशासन व मुख्याध्यापक गुरुजन वर्गानी अभिनंदन केले आहे

जवाहर उलुम उर्दू स्कूल ची तुबा सौदा नासिर तगाले ८८.४०% घेऊन शाळेत पहिली तर मो. सुफीयान कासीम८८% गुण घेऊन दुसरा शाळेत दुसरा

  किनवट:- जवार उलुम उर्दू स्कूल ची तुबा सौदा नासिर तगाले 88.40% घेऊन शाळेत पहिली किनवट/प्रतिनिधी:जवाहेर उलुम उर्दू स्कूल ची तुबा सौदा नासिर तगाले 88.40% घेऊन शाळेत पहिली  तर मुलांत 88% घेवून मोहम्मद सुफीयांन कासिफ महमद साजीद  दुसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. शाळेचा निकाल 96% लागला आहे. सर्व उतीर्ण विद्यार्थ्यांचे  शाळेचे अध्यक्ष  हाजी इसाखान साहेब व मुख्यध्यपिका, आस्मा खातून शिक्षक कर्मचारी यांनी अभिनंदन केले

बहुजन युथ पँथर नांदेड जिल्हा प्रभारी पदी भिमराव बुक्तरे यांची निवड

  नांदेड : सामाजिक, आंबेडकरी चळवळीत सतत सहभागी असणारे विविध सामाजिक उपक्रम राबविणारे वृक्षारोपण, रक्तदान, संविधान गौरव महोत्सव, संविधान वाटप, संविधान प्रस्थाविका वाटप, अन्नदान अशा विविध प्रकारच्या कामातून आपली ओळख निर्माण करणारे प्रज्योत  फाउंडेशन चे सचिव भिमराव बुक्तरे यांच्या कार्याची दखल घेऊन बहुजन युथ पँथर चे राष्ट्रीय अध्यक्ष भाईसाहेब  जाधव  यांनी त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर नांदेड जिल्हा प्रभारी पदाची जबाबदारी दिली अशा आशयाचे निवडीचे पत्र पाठवून दिले यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जाते आहे.

दिव्यांगाना हयात प्रमाणपत्रा सोबत उत्पन्नाचा दाखल्याची अट रद्द करा - भगवान मारपवार

  किनवट:- आज दिनांक 13 /6/2022  रोजी दिव्यांग. विधवा.व जेष्ठ नागरिकांना तहसील कार्यालया मार्फत विविध योजने अंतर्गत मानधन देण्यात येथे त्या अनुदान घेणाऱ्या लाभार्थ्यांना दिनांक  20/8/2019 ला शासन निर्णयानुसार दरवर्षी उत्पन्न दाखल्याची अट लावण्यात आली परंतु उत्पन्न दाखला लावल्याशिवाय कोणतीच योजनेचा लाभ भेटत नाही तरी शासनाने दर वर्षी उत्पन्न दाखला सादर करण्यात यावा अशी अट लाऊन दिव्यांग. विधवा.व विविध योजनेचे लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची परेशानी करत आहे त्या शासन निर्णयात बदल करूण हयात प्रमाण पत्राची अट रद्द करण्यात यावा या साठी मा.जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना मा.तहसीलदार साहेब किनवट यांच्या मार्फत प्रहार दिव्यांग क्रांती संघटना किनवटच्या वतीने मा.अव्वल कारकून मा.परमेश्वर मुंडे साहेब यांना निवेदन देण्यात आला या वेळी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे ता.अध्यक्ष भगवान मारपवार .ता.सचिव शेख मुजीब. ता.कोषाध्यक्ष शेख फेरोज. शहर अध्यक्ष अब्दुल सलीम. नामदेव पेंडकर. प्रदुम्न दिलीप बेलसरवार. मल्लकाबाई सुद्धेवाड यांच्यासह अनेक दिव्यांग व्रद्ध.विधवा निराधार लाभार्थी उपस्थित होते

खासदार हेमंत पाटील यांनी पीक नुकसानीची पाहणी करून तात्काळ आर्थिक मदत देण्याचे दिले निर्देश

हिंगोली/वसमत/नांदेड: नुकत्याच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनच्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यात केळी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याअनुषंगाने वसमत तालुक्यातील   गिरगाव, खाजमापूर येथील नुकसानग्रस्त शेतीची खासदार हेमंत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी केली व  नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत  देण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देशित केले.                        यावेळी खासदार हेमंत पाटील म्हणाले की , अवकाळी पावसामुळे, मागील सहा दिवसांपासून वीजपुरवठा नसल्याने पिण्याच्या पाण्याचा व विजेचा गंभीर प्रश्ननिर्माण झाला आहे. संबंधित अधिकारी यांनी विजेच्या तुटलेल्या तारा व विजेच्याखांबांची झालेली नासधूस तात्काळ दुरुस्त करण्यास सुरुवात करावी व शेतकऱ्यांनादिलासा द्यावा. विजेचा प्रश्न निर्माण झाल्याने अधिकारी फोन उचलत नसल्याच्या अनेकतक्रारी आल्या असून अधिकाऱ्यांनी शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणीलाप्राधान्य देऊन काम करावे असेही ते म्हणाले.वादळी वाऱ्यामुळे खाजमापूर वाडी येथीलघरांवरील पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत त्या सर्व कुटुंबीयांचीभेट घेऊन  त

खासदार हेमंत पाटील यांच्या मागणीला यश; कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले पंचनाम्याचे आदेश पाचशे हेक्टरवरील केळी पिक बागायतदारांना मोठा दिलासा

        हिंगोली/नांदेड/यवतमाळ : हिंगोली लोकसभा मतदारसंघात  बुधवारी (ता.आठ) अनेक ठिकाणी वादळीवाऱ्यासह जोराचा पाऊस झाल्याने जवळपास ५०० हेक्टरवरील केळी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे पावसाळा सुरु होण्यापूर्वीच शेतकरी संकटात सापडला आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे कृषी मंत्री दादाजी  भुसे यांची भेट घेऊन सदरील केळी पिकाच्यां झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केल्या नंतर कृषी मंत्री दादाजी  भुसे यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना तात्काळ नुकसानीचे पंचनामे करुन माहिती सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाचशे हेक्टर केळी पिक बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे.                      बुधवारी झालेल्या पावसामुळे वसमत तालुक्यातील गिरगांव, कुरुंदा, सोमठाणा, दाभडी ,कानोसा, खाजमापुरवाडी, बागलपार्डी, परजना व आजुबाजूच्या परिसरातील २५ ते ३० गावांमध्ये प्रचंड वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसामुळे केळी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे जवळपास ५०० हेक्टर वरील केळी पिकांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या असुन, मोठ्या प्रमाणात घरांची देखील पडझड हो

किनवट येथे पावसाची दमदार हजेरी

  ✍🏻 राजेश पाटील किनवट:- बराच काळ प्रतीक्षा करायला लावल्यानंतर अखेर शनिवारी किनवट शहर आणि ग्रामिण परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे बऱ्याच दिवसा पासुन उकाड्याने त्रस्त असलेल्या किनवटकरांना दिलासा मिळाला  ऐवढेच नाहीतर  पहिल्याच पावसात भिजण्याचा आंनद अनेकांनी  घेतला.    दुपारी साडे चार  ते८:३० पर्यंत पाऊस सुरू होता . जूनचा पहिला आठवडा उलटूनही शहरात ढगाळ हवामान होते;पण पावसाने हुलकावणीच दिली होती. शुक्रवारी दुपारपर्यंत ऊन आणि ढगाळ हवा असा खेळ सुरू असतानाच, चारच्या सुमारास अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह शहराच्या बहुतेक सर्वच भागांत जोरदार पावसाने हजेरी लावली. जवळपास अर्धा ते पाऊण तास जोरदार सरी पडल्या. या जोराच्या पावसामुळे शहरात नेहमी निर्माण होणाऱ्या समस्यांनी लगेच डोके वर काढले रस्ते नवीन पुल चिखलमय झाले. शहरात शुक्रवारी दुपारी झालेल्या मान्सूनपूर्व वादळी पावसामुळे विविध भागांत बत्ती गुल झाली होती त्यामुळे अंधाराचा सामना करावा लागला.

टिपू सुलतान ब्रिगेड किनवट तालुका अध्यक्षपदी अजमल शेख यांची निवड

किनवट ता. प्र.:- आज दिनांक 11 जून, 2022 रोजी नांदेड येथे टिपू सुलतान ब्रिगेडची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी टिपू सुलतान बिग्रेडचे प्रदेशाध्यक्ष डॉ. ज़हीरूद्दिन पठान होते आणि प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हाध्यक्ष सय्यद नदीम, जिल्हा संघटक फयाज पठाण यांची उपस्थिती होती. या बैठकीत टिपू सुलतान बिग्रेडच्या किनवट तालुका अध्यक्षपदी शेख अजमल शेख सलाओद्दीन यांची निवड करण्यात आली व किनवट तालुका उपाध्यक्षपदी शेख ज़ुबेर यांची आणि  तालुका सचिवपदी शब्बीर इक्बाल खान यांची निवड करण्यात आली. याच बैठकीत मुदखेड तालुका अध्यक्ष सय्यद मुजीब, नांदेड शहर अध्यक्ष (दक्षिण) शेख एजाज़ यांची सुद्धा निवड करण्यात आली. बैठकीला उमरी तालुकाध्यक्ष सय्यद फेरोज पटेल, विद्यार्थी ब्रिगेड उमरी तालुकाध्यक्ष सय्यद सुलेमान पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती. या निवडीबद्दल सर्वांचे सर्वत्र कौतुक होत आहे आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान यांनी टिपू सुलतान ब्रिगेडची ध्येय आणि धोरणे, मा. शेख सुभान अली सरांचे महापुरूषांचे विचार नांदेड जिल्हयातील प्रत्येक तालुक्यात, प्रत्

विशाल हलवले यांचा जनसंपर्क चांगला असल्याने मोहपुर गटात त्यांच्याच नावाची चर्चा सुरु असुन लोंकाच्या आग्रहास्तव मोहपुर येथुन निवडणुक ताकतीने लढणार

 किनवट प्रतिनिधी:-  नव्याने निर्माण झालेल्या मोहपूर जिल्हा परिषद गटात राजकीय हालचालींना वेग आला असून गतवेळी शिवसेनेकडून मांडवी गणातून निर्णायक मतदान घेणारे अंबाडी येथील तरुण युवा कार्यकर्ते विशाल हलवले यांनी आता जिल्हा परिषदेसाठी दंड  थोपटले असून  मोहपूर गटाच्या सर्वांगीण विकासासाठी लोकआग्रहास्तव मी ही निवडणूक मोठ्या ताकतीने लढणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले   नांदेड जिल्हा परिषदेची गट व गणनिहाय प्रभाग रचना नुकतीच प्रसिद्ध झाली असून किनवट तालुक्यात मोहपूर या नवीन गटाची निर्मिती करण्यात आली आहे या  गटात अंबाडी गावाचा समावेश करण्यात आल्यामुळे आतापासूनच राजकीय हालचाली वाढल्या असून प्रमुख पक्षांसह जुने व नवीन चेहरे निवडणुकीचे मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत यात प्रामुख्याने गतवेळी शिवसेनेकडूनकडून मांडवी गणातून निवडणूक लढवलेले तरुण युवा कार्यकर्ते विशाल हलवले  यांच्या नावाची आता जिल्हा परिषदेसाठी चर्चा  सुरू झाली असून त्यांच्यासाठी आंबाडी व परिसरातील असंख्य कार्यकर्ते आतापासूनच गावभेटी घेऊन वातावरण निर्मिती करण्यावर भर देत आहेत गेल्यावेळी  हलवले यांनी अठराशे च्या आसपास म

बौद्ध वधु- वर व पालक परिचय मेळावा २०२२यशस्वीरीत्या संपन्न

  नांदेड जिल्हा प्रतिनिधी:-  दि.29 मे रोजी संपन्न झालेला बौध्द समाज वधु वर व पालक परिचय मेळावा२०२२ यशस्वी रित्या पार पडला या मेळाव्यासाठी मराठवाडा तसेच विदर्भातुन वधु व वर यांनी आपली नाव नोंदणी करून परिचय करून दिले यात एकूण 113 वधू वरानी सहभाग नोंदवून आपला परिचय करून दिला व हा परिचय मेळावा योग्य उद्देश साध्य होण्यासाठी पोषक वातावरण निर्मिती झाली आहे या मेळाव्यास अध्यक्ष म्हणून शिक्षणमहर्षी प्राचार्य मोहनराव विठ्ठलराव मोरे साहेब, उदघाटक म्हणून आदरणीय मनीषभाऊ कावळे जिल्हाध्यक्ष बहुजन समाज पार्टी नांदेड,इंजि.उल्केश कावळे, आदरणीय इंजि. प्रकाश नगारे साहेब, इंजि. भारत कानिंदे, इंजि. सिद्धार्थ पाटील,इंजि. जगन्नाथ भवरे, मंडळाचे अध्यक्ष राजेश भगत, सचिव, अरविंद घुले, कोष्याध्यक्ष शेषराव घुले, मार्गदर्शक सुनील भरणे,, शंकर कावळे, चंद्रमुनी भरणे,गुणवंत भगत, भास्कर भगत, प्रवीण घुले,विठ्ठल भवरे,सुरेश नगारे, इंजि.नागनाथ पाटील मुकुंदराज पाटील, दिलीप भवरे, भिमराव घुले,अशोकराव पाटील, अशोकराव माधवराव भगत, सुखदेव येरेकर, कोंडीबा वासाटे, सचिन पाटील, सचिन मुनेश्वर,प्रेमदास घुले,कैलास पोपलवार,संदीप भालेराव, त

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे व महिलाध्यक्षा वैशालीताई पाटील उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराने सन्मानित

अकलूज (सोलापूर) : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, सोलापूर जिल्हा यांचे वतीने उत्कृष्ट सेवा पुरस्कार सोहळा, पत्रकारांचा स्नेहमेळावा व एक दिवसीय कार्यशाळेचे नुकतेच नियोजन करण्यात आले होते. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे व ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी यांच्या हस्ते प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांना उत्कृष्ट संपादक पुरस्कार तर लातूर जिल्हा महिलाध्यक्षा वैशालीताई पाटील यांना उत्कृष्ट महिला पत्रकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लहुकुमार शिंदे यांनी २००३ पासून सामाजिक कार्यास सुरुवात केली असून, २००४ मध्ये महाराजकारण या वृत्तपत्राचे मुख्य संपादक म्हणून काम पाहिले.  त्यांना नेहरू युवा पुरस्कार, राजाभाऊ महाळंगी विशेष प्रतिनिधी म्हणून निवड, स्नेहल संस्कृतीक प्रतिष्ठान पुणेचा कविवर्य सन्मान, अखिल भारतीय शाहिर परिषद मुंबई उत्कृष्ट नवकवी सन्मान,१४ वे अखिल भारतीय परिषदेचा पुरस्कार, २००८ मध्ये वेदना साहित्य संग्रह प्रकाशित २००९ मध्ये समाजसेवेसाठी विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाकडून निवड, कै. ॲड. देविदास जमदाडे प्रबोधन व विचारमंच

पत्रकारांसाठी मोफत कार्यशाळा

  अकलूज ता.26:  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, सोलापूर जिल्हा यांचे वतीने पत्रकारांचा स्नेहमेळावा व एक दिवसीय मोफत कार्यशाळा रविवार दिनांक 29 मे 2022 रोजी नगर परिषद हॉल, अकलूज जिल्हा सोलापूर येथे आयोजित करण्यात आली असल्याची माहिती सोलापूर जिल्हा अध्यक्ष सोमनाथ खंडागळे यांनी दिली.  अकलूज नगर परिषदेच्या हॉलमध्ये घेण्यात येणाऱ्या या कार्यक्रमात सकाळी 10.00 ते 10.30  नाव नोंदणी चहापान व शुभारंभ त्यानंतर 10.30 ते 12.00 'भाषिक व्यवहार आणि पत्रकारिता' याविषयी अरविंद जोशी यांचे व्याख्यान, दुपारी  1ं.00 ते  2.30 ''पत्रकारितेची आचारसंहिता' या विषयी डी. टी. आंबेगावे यांचे व्याख्यान, 2.30  ते 3.00 :  खुली चर्चा, 3.00 ते 4.00 : समारोप असा कार्यक्रम होणार असून कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही मात्र इच्छूकांनी शनिवार दि. 28 मे 2022 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत 8600270199 या मोबाईल नंबरवर नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याचे श्री खंडागळे यांनी सांगितले.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची करमाळा व माढा तालुका कार्यकारिणी जाहीर

सोलापूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची करमाळा व माढा तालुका कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे सरांच्या आदेशानुसार व पुणे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा सौ. आशाताई चांदणे यांच्या अध्यक्षतेखाली दोन्ही तालुका कार्यकारिणीच्या निवडी जाहीर करून नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले.  नवनिर्वाचित कार्यकारिणी अशी :  बाळासाहेब भिसे, करमाळा तालुका कार्याध्यक्ष, आबासाहेब झिंजाडे, जेऊर शहर अध्यक्ष, शिंदे सर, करमाळा सह उपाध्यक्ष, खराडे सर, करमाळा तालुका संपर्कप्रमुख, , अक्षय वरकड करमाळा तालुका सह सचिव,  क्रांतीदिप लोंढे टेंभूर्णी शहर अध्यक्ष, संजय चांदणे सदस्य, प्रदिप पवार सदस्य, श्रीमंत दिवटे सदस्य आदी पदाधिकार्‍यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  नाथा सावंत यांनी केले तर आभार श्री. कुंदन वजाळे यांनी मानले यावेळी बोलताना सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा आशाताई चांदणे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कार्य व उद्दिष्ट यांच्याबद्दल सविस्तर माहिती दिली. माढा तालुका उपाध्