Skip to main content

खासदार हेमंत पाटील यांच्या मागणीला यश; कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिले पंचनाम्याचे आदेश पाचशे हेक्टरवरील केळी पिक बागायतदारांना मोठा दिलासा

 


      हिंगोली/नांदेड/यवतमाळ : हिंगोली लोकसभा मतदारसंघात  बुधवारी (ता.आठ) अनेक ठिकाणी वादळीवाऱ्यासह जोराचा पाऊस झाल्याने जवळपास ५०० हेक्टरवरील केळी पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे पावसाळा सुरु होण्यापूर्वीच शेतकरी संकटात सापडला आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे कृषी मंत्री दादाजी  भुसे यांची भेट घेऊन सदरील केळी पिकाच्यां झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केल्या नंतर कृषी मंत्री दादाजी  भुसे यांनी जिल्हा कृषी अधिकारी यांना तात्काळ नुकसानीचे पंचनामे करुन माहिती सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पाचशे हेक्टर केळी पिक बागायतदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

                    बुधवारी झालेल्या पावसामुळे वसमत तालुक्यातील गिरगांव, कुरुंदा, सोमठाणा, दाभडी ,कानोसा, खाजमापुरवाडी, बागलपार्डी, परजना व आजुबाजूच्या परिसरातील २५ ते ३० गावांमध्ये प्रचंड वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊसामुळे केळी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. यामुळे जवळपास ५०० हेक्टर वरील केळी पिकांच्या बागा उद्ध्वस्त झाल्या असुन, मोठ्या प्रमाणात घरांची देखील पडझड होऊन नुकसान झाले आहे. या आवकाळी पावसाचा अनेक ठिकाणी गुरे - ढोरे यांना देखील फटका बसला आहे. अनेक जनावरे दगावली आहेत. यामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, असून हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री दादाजी  भुसे यांची तातडीने भेट घेऊन शेतकऱ्यांच्या पिकांचे व घरांचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी केली होती. कृषिमंत्री दादाजी  भुसे यांनी देखील खासदार हेमंत पाटील यांच्या निवेदनाची दखल घेत संबंधीत अधिकारी यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संदिपान भुमरे, हिंगोली शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळमनुरीचे आमदार संतोष बांगर, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांची उपस्थिती होती.

-------------------------------------------------------------------------------------



Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...