नांदेड : नांदेड जिल्ह्यातील किनवट- माहुर रस्त्यावर अय्यपा स्वामी मंदीराजवळ अज्ञात इसमाचा अपघात झाला ही बातमी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे किनवट तालुका उपाध्यक्ष राजेश पाटील तात्काळ घटनास्थळी पोहचले व रुग्णवाहिका गाडीला फोन करून बोलावून घेतले व घटनास्थळी जमलेल्या लोकांच्या मदतीने अपघात झालेल्या व्यक्तीला रुग्णवाहिकामध्ये बसवून अपघात झालेल्या रुग्णास गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अपघातग्रस्त व्यक्तीचा जीव वाचला असून ते सुखरूप आहेत. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे किनवट तालुका उपाध्यक्ष राजेश पाटील यांनी रिस्क घेऊन अपघातग्रस्त व्यक्तीला जीवदान दिल्यामुळे संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य महिलाध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे, सर्व राज्य व विभागीय पदाधिकारी, मराठवाडा संपर्क प्रमुख सुर्यकांत तादलापूरकर, कार्याध्यक्ष हुकुमत मुलाणी, मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव, नांदेड जिल्हाध्यक्ष संजयकुमार गायकवाड, किनवट तालुकाध्यक्ष आशिष शेळके ,कार्याध्यक्ष सय्यद नदीम, सचिव नसीर तगाले,शेख अतीफ, प्रणय कोवे, विशाल गिमेकार, रमेश परचाके इंद्रपाल कांबळे, गौतम कांबळे, राज माहुरकर, अरवींद सुर्यवंशी, मारोती देवकते, परमेश्वर पेशवे, अक्रम चव्हाण, शे. सईद, विकास वाघमारे गणेश यमजलवाड, विनोद कांबळे आदीनीं या कार्याबद्दल अभिनंदन केले.
(राजेश पाटील/किनवट) मोजे दरसांगवी(सि.) ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड 3. पी एम किसान योजना 4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी), श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

Comments
Post a Comment