Skip to main content

प्रधानसांगवी आरोग्य उपकेंद्रातील वृक्षारोपण करुन ग्रामपंचायतीने संगोपण केलेल्या झाडांची डाॅक्टर,ए.एन.एम व आरोग्य सेवीके कडुनच कत्तल...

 



किनवट (तालुका प्रतिनिधी) एकीकडे संपुर्ण विश्वात प्रत्येक देश प्रदुषणाची झळ सोसत असल्यामुळे वृक्षारोपणावर भर देत आहे त्यातच आपला देश व देशातील प्रशासन दरवर्षी विविध योजना अंतर्गत वेगवेगळ्या विभागामार्फत कोट्यावधीचा निधी खर्च करुन झाडे लावा झाडे जगवा या उक्तीनुसार गावागावात वृक्ष लावुन त्यांना वाचवण्यात पुर्ण शक्ती लावत असताना किनवट तालुक्यातील प्रधानसांगवी आरोग्य उपकेंद्रातील काही कर्मचा-यांनी मात्र कहरच केला कुणालाच कल्पना न देता गावातील पे्ट्रोलवर चालणा-या मशीन धारकांना गुत्ते देवुन चक्क झाडेच कापुन टाकली.

    याबाबतीत सविस्तर वृत्त असे की,किनवट तालुक्यातील प्रधानसांगवी हे काही वर्षापुर्वी मुख्यमंत्री दत्तक असलेले गाव ज्यात स्मार्ट व्हिलेज या योजनेत दहा लाखांच बक्शीसही मिळवळ. विविध विकास कामे व योजना राबवुन शाळा,अंनवाडी,आरोग्य केंद्रात सर्व सुखसुवीधा पुरवलेल्या आहेत.त्यातच काही वर्षा पुर्वी ग्रामपंचायतीने आरोग्य केंद्राच्या आवारात संरक्षक भिंतीच्या कडेने सुंदर वृक्षारोपण करुन ती झाडे वाचवलीसुद्धा चहुबाजुंनी थंडगार सावली देणा-या झाडाखाली उन्हाळ्यात गावकरी,मुले विसावा घेत होती.पण कुठुन दुर्बुध्दी सुचली अन् नियमीत कर्तव्य न बजावता महीण्या पंधरा दिवसातुन क्वचीतच येणा-या डाॅ.ईर्शाद खान,ए.एन.एम खोत व सेवीका राधाबाई मुसळे यांनी संगनमत करुन कटाई मशीनवाल्यांना काही पैसे व निघणारे जळतन तुम्हालाच असा साैदा करत चक्क झाडांची बुंध्यातुनच कत्तल केली.


  हि बाब कळताच गावातील काही पर्यावरण प्रेमी सुजाण नागरीकासह पत्रकार लक्ष्मीकांत मुंडे यांनी संबधीतांना संपर्क केला तर थातुर मातुर उत्तरे देत फोन कट केला याला नेमक जबाबदार कोण ? ग्रामपंचायत,वनविभाग किंवा आरोग्य विभागातील कुणाची परवाणगी घेतली का? स्वताच कर्तव्यात कसुर करुन सतत गैरहजर राहणारे कर्मचारी एवढी मोठी झाडे कुणालाच कल्पना न देता कशी तोडु शकतात? या प्रकरणात संबधीत यंत्रणेने लक्ष घालुन जर काही कार्यवाही नाही केली तर गावातील नागरीकांसह पत्रकार लक्ष्मीकांत मुंडे हे लवकरच उपोषण ही करतील असे त्यांनी तालुका आरोग्य अधीकारी,वनपरीक्शेत्र अधीकारी यांना कळविले आहे.आता 'झाडे लावा झाडे जगवा' म्हणनारे प्रशासन काय कार्यवाही करणार याकडे तमाम पर्यावरण प्रेमीजनतेचे लक्ष लागले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...