Skip to main content

खासदार हेमंत पाटील यांनी पीक नुकसानीची पाहणी करून तात्काळ आर्थिक मदत देण्याचे दिले निर्देश



हिंगोली/वसमत/नांदेड:

नुकत्याच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या मान्सूनच्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यात केळी व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याअनुषंगाने वसमत तालुक्यातील   गिरगाव, खाजमापूर येथील नुकसानग्रस्त शेतीची खासदार हेमंत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पाहणी केली व  नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत  देण्यासाठी अधिकाऱ्यांना निर्देशित केले.                 

      यावेळी खासदार हेमंत पाटील म्हणाले की , अवकाळी पावसामुळे, मागील सहा दिवसांपासून वीजपुरवठा नसल्याने पिण्याच्या पाण्याचा व विजेचा गंभीर प्रश्ननिर्माण झाला आहे. संबंधित अधिकारी यांनी विजेच्या तुटलेल्या तारा व विजेच्याखांबांची झालेली नासधूस तात्काळ दुरुस्त करण्यास सुरुवात करावी व शेतकऱ्यांनादिलासा द्यावा. विजेचा प्रश्न निर्माण झाल्याने अधिकारी फोन उचलत नसल्याच्या अनेकतक्रारी आल्या असून अधिकाऱ्यांनी शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या अडीअडचणीलाप्राधान्य देऊन काम करावे असेही ते म्हणाले.वादळी वाऱ्यामुळे खाजमापूर वाडी येथीलघरांवरील पत्रे उडाल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत त्या सर्व कुटुंबीयांचीभेट घेऊन  तातडीने मदत करण्याच्या सुचनातहसीलदारांना   दिल्या. तसेच अनेकशेतकऱ्यांचे  शेतातील सौरऊर्जा सोलारपॅनलचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना देखील शासनाच्या वतीने मदत मिळवून द्यावी अशा सूचना खासदार हेमंत पाटील यांनी संबंधितांना दिल्या.हवामानाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून, यासंदर्भात शेतकऱ्यांना पुरेपुर मदत मिळवून देण्यासाठी लवकरच राज्याचे मुख्यमंत्रीउद्धवजी ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे  खासदार हेमंत पाटील म्हणाले . तालुक्याचेतहसीलदार, महावितरण विभागाचे अधिकारी,  कृषी अधिकारी,पिक विमा अधिकारी व एजंट यांनारविवारी सुट्टीच्या दिवशी शेतकऱ्यांच्या बांधावर बोलावून शेतकऱ्यांच्या शेतीपिकांची विशेषतः भुईसपाट झालेल्या केळी पिकांचे पंचनामे करून तात्काळ मोबदलामिळवून देण्यासाठी खासदार हेमंत पाटील यांनी निर्देशित करून शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी  क्लेम केल्यास  त्यांना पीकविमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी तातडीने मदत मिळवून द्यावी असेही ते म्हणाले.    यावेळीशिवसेना वसमत तालुका प्रमुख राजू चापके,औंढा तालुका प्रमुख अंकुश आहेर, गिरगांवसरपंच देविदास पाटील कऱ्हाळे, कुरुंदा सरपंच राजेश पाटील इंगोले, माजीजिल्हा परिषद सदस्य रवी पाटील नादरे,माजी सरपंच कुरुंदा दत्तारामजीइंगोले,पंढरीनाथ क्षीरसागर ,लक्ष्मीकांत देशमुख , रेडगावसरपंच धनंजय पवार, युवासेना सरचिटणीस व्यंकटेश कऱ्हाळे, संभाजीसिद्धेवार, प्रमोद भुसारे,शिवराज यशवंते,रोडगासरपंच भद्रीनाथ कदम, बाबा अफूने,वसमत तहसीलदार अरविंद बोलंगे , तालुकाकृषि अधिकारी कल्याणपाड, उपाभियंता परचाके व असंख्य गावकरी,शेतकरी उपस्थित होतेयांच्यासह  शिवसेना  कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...